Categories

Aeroplanes

Aeroplanes

Friday 28 March 2008

... महत्वाची सुचना..!


जर तुमच्या वेबसाईटवर किंवा ब्लौग वर "please see here" अशी लिंक असेल तर त्यावर क्लिक करु नका...
[URL = http:// xp-protect-2008. com]

केलेच तरः ही लिंक तुमचा ब्राउजर मिनिमाईज करुन एक आलर्ट मेसेज दाखवतो व ती लिंक फ़ाईल स्कॅन करु लागते... ताबडतोब ब्राउजर बंद करा ...

काळजी म्हणुन एकदा पुर्ण मशिनचे वायरस स्कॅन करुन घ्या..!

कदाचित हा कम्प्युटर वायरस असु शकतो... किंवा त्या खोडसाळाचा "एप्रिल फ़ुल" ..

मात्र काळजी म्हणुन शक्यतो तुम्ही तुमचे महत्वाचे पासवर्डस बदला...

नेहमी या गोष्टी लक्षात ठेवाः
१. ब्राउजर म्हणुन शक्यतो "फ़ायरफ़ौक्स" वापरा व तो "डीफ़ौल्ट " म्हणुन ठेवा.
२. ब्लौग किंवा वेबसाईटवर "कमेंट्स" ना "प्री-ऍप्रुवल" ठेवा.. म्हणजे नको असलेल्या लिंक्स आणि डाटा यावर बंधन राहिल.
३. शक्यतो काम झाल्यावर, ब्राउजरचा संपुर्ण प्रायव्हेट डाटा क्लीयर करा.
४. आपले "लौगिन डीटेल्स" सेव करु नका.
५. आपल्यापैकी कुणाला या प्रकाराबद्दल अधिक माहिती असल्यास ती इतरांनाही सांगा॥

ताबडतोब उपाय :
गुगल शोध

शोध
करून आलेल्या लिंक्स मधून " त्या " लिंक वर क्लिक करू नका!
फक्त ती माहिती देणा-या वेबसाईट वरच क्लिक करा.

अधिक माहिती


...भुंगा!


भटकंती: प्रतापगड



दि: २९ मार्च २००८
गड़: कल्ले प्रतापगड
भागीदार: मी, सुभाष, व समर ... सोबत सतीश, आणि चंदू
गाडी: बुलेट

.... येतो ... आलो जाऊन ...!

काही फोटो येथे आहेत.


...भुंगा!


Sunday 16 March 2008

तुम्ही तुमचे बँक खाते अपडेट करुन किती दिवस झाले...?

खास काही नाही... म्हणजे तुमचा बँलन्स विचारत नाही... पण असलेला बॅलन्स व्यवस्तित आहे याची खात्री करायला सांगतोय... आजकाल इंटरनेट बँकिंगमुळे ते काही फ़ार अवघड राहिले नाही ... तरीपण आपले बँक खाते आणि त्यातील जमा - वजा रक्कम यांचा ताळमेळ वरचेवर पाहणे गरजेचे बनले आहे...

सांगायचा मुद्दा हाच की गेले दोन - तीन महिने माझ्या खात्यातुन "सर्विस चार्ज" या नावाने दरमहा ५०० रु. कापले जात होते... आज बँकेला फ़ोन करुन आणि तशी मेल पाठवुन चांगलाच जाब विचारला... या आधीही तसा जाब विचारला होताच.... तर उत्तर की माझे "सॅलरी अकाउंट" बंद झाले असुन ते आता "सेव्हींग्ज अकाउंट" मध्ये रुपांतरीत करण्यात आले आहे व ते चालु ठेवण्यासाठी मला रोजचा बॅलन्स १०,००० रु. ठेवणे गरजेचे आहे.... गेल्या महिन्यातील तक्रारीच्या उत्तरादाखल माझे खाते "झीरो बॅलन्स" करण्यात आल्याचे लेखी उत्तर - ईमेल - त्यांनी पाठवला.... आणि तरीपण या महिन्यात पुन्हा पैसे कापले... च्या *** !

नोकरपेशा माणसाला दहा हजाराचा बॅलन्स ठेवुन कसे चालेल... माझे घर आणि खर्च काय यांचा ब** देणार काय? आणि एकदा "झीरो बॅलन्स अकाउंट" करुनही पुन्हा पैसे कापण्याचे कारणच काय..?

... असा तसा सोडणार नाय काय... चांगलाच फ़ैलावर घेतो - सुक्काळीच्यांना ॥!

दि : २६ मार्च 2008
... नाहीच सोडले ...!
..... हा हा हा ... "त्या बँकेकडुन" झालेल्या चुकिबद्दल "लिखित माफीनामा " " पुन्हा अशी चुक होणार नसल्याची खात्री " दोन्ही मिळवले ....! झक्कास ..!!

चला ... बघू आता ..!

...भुंगा!


Friday 14 March 2008

नविन रूप !

... जराशा नव्या रूपात .......!!

... मी भुंगा!