Categories

Aeroplanes

Aeroplanes

Monday 29 November 2010

दृष्टीकोनः फोटोग्राफर्स@पुणे

छायाचित्रांची आणि ते टिपणार्‍या छायाचित्रकारांची एक वेगळीच दुनिया असते. त्यांची ही रंगबिरंगी दुनिया पहायला येताय ना?
अधिक माहिती: पंकज झरेकर
दि. ३ ते ५ डिसेंबर २०१०
ठिकाणः न्यू आर्ट गॅलरी, घोले रोड पुणे
संपर्क: ९९२१८४५१५१, ९८९०४९२८१९, ९८५००३६२७५

Thursday 25 November 2010

भावपूर्ण श्रद्धांजली...!


"शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा"
- शहीद रामप्रसाद बिस्मिल.

वरील ग्राफिक्स तुमच्या ब्लॉग/ वेबसाईटवर लावण्यासाठी खाली दिलेला कोड कॉपी-पेस्ट करा.
<img border="0" src="http://goo.gl/pChSR" />

Saturday 20 November 2010

स्टार माझा - ब्लॉग माझा स्पर्धा - ३ चे निकाल

‘स्टार माझा’चं स्लोगन आहे ‘नव्या मराठी माणसाचं, नवं न्यूज चॅनल’. जगभरात पसरलेल्या याच मराठी मंडळींसाठी आम्ही ‘ब्लॉग माझा’ स्पर्धा सुरू केली. हे या स्पर्धेचं तिसरं वर्ष. तुम्हीही भरभरून प्रतिसाद दिलात.


शुभेच्छापत्र  - मराठीग्रिटींग्ज.नेट वरुन साभार!

यंदा तर कतार ते कल्याण, इटली ते इंदापूर आणि न्यूयॉर्क ते नागपूर इथून मराठी ब्लॉगर्सनी प्रवेशिका पाठवल्या. विषयाची रेंजही अशीच वैविध्यपूर्ण. महाभारत, भटकंती, खवैय्येगिरी, वाचन, कविता, सामाजिक, राजकीय, आयटी....इ. आपले परीक्षक लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी), विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक, सा. ‘साधना’) आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) यांनीही उत्तम ब्लॉग निवडले. या दर्जेदार ब्लॉग्जची यादी आम्ही सहर्ष जाहीर करत आहोत. वस्तुत: तीन विजेते आणि दहा उत्तेजनार्थ ब्लॉगर्स जाहीर करण्याचं ठरलं असताना, इतके चांगले ब्लॉग्ज तुम्ही दिलेत की आम्ही सहा विजेते आणि तीस उत्तेजनार्थ ब्लॉगर्स निवडले. ज्यांचा समावेश या यादीत होऊ शकला नाही, त्यांचेही ब्लॉग्ज चांगलेच आहेत. पण, शेवटी परीक्षकांनाही निवडण्याची अवघड कामगिरी पार पाडायची असते. पुन्हा एकदा सर्व ब्लॉगर्सचे या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल अभिनंदन, विजेत्यांचं कौतुक आणि ब्लॉगच्या माध्यमातून अशाच प्रकारे मराठीचे वैश्विक पातळीवर संवर्धन आणि प्रसारण करण्यासाठी शुभेच्छा.

विजेते ब्लॉग्ज

१. रोहन जगताप http://www.2know.in
२. प्रभाकर फडणीस www.mymahabharat.blogspot.com
३. सुनील तांबे http://moklik.blogspot.com/
४. नरेंद्र गोळे http://nvgole.blogspot.com/
५. मधुकर रामटेके http://mdramteke.blogspot.com/
६. तन्वी अमित देवडे www.sahajach.wordpress.com


उत्तेजनार्थ ब्लॉग्ज

१. अनघा निगावेकर http://restiscrime.blogspot.com/
२. विशाल कुलकर्णी http://magevalunpahtana.wordpress.com
3. गंगाधर मुटे http://gangadharmute.wordpress.com
४. सुहास झेले http://suhasonline.wordpress.com/
५. विवेक वसंत तवटे http://vivektavate.blogspot.com
६. एकनाथ जनार्दन मराठे http://ejmarathe.blogspot.com
७. सौरभ सुरेश वैशंपायन http://sahajsuchalamhanun.blogspot.com
८. रोहन कमळाकर चौधरी. http://mazisahyabhramanti.blogspot.com/
९. श्रद्धा भोवड www.shabd-pat.blogspot.com
१०. ओंकार सुनील देशमुख http://pune-marathi-blog.blogspot.com/
११. विठ्ठलराजे बबनराव निंबाळकर http://vitthalraje.blogspot.com/
१२. हेरंब ओक http://www.harkatnay.com/
१३. विनायक पंडित http://vinayak-pandit.blogspot.com
१४. मंदार शिंदे http://aisiakshare.blogspot.com
१५. आशिष अरविंद चांदोरकर http://ashishchandorkar.blogspot.com
१६. शंकर पु. देव http://www.shankardeo.blogspot.com/
१७. अमोल सुरोशे http://www.mukhyamantri.blogspot.com/
१८. नचिकेत गद्रे http://gnachiket.wordpress.com
१९. पंकज झरेकर http://www.pankajz.com/
२०. रणजीत शांताराम फरांदे http://zampya.wordpress.com/
२१. श्रेया देवेंद्र रत्नपारखी http://majhimarathi.wordpress.com
२२. जगदीश अशोक भावसार http://chehare.blogspot.com/
२३. मीनल गद्रे. http://www.pankajz.com/
२४. शंतनू देव http://maplechipaane.blogspot.com/
२५. विद्याधर नीलकंठ भिसे. http://thebabaprophet.blogspot.com
२६. प्रवीण कुलकर्णी http://gandhchaphyacha.blogspot.com
२७. नचिकेत कर्वे http://www.muktafale.com
२८. जयश्री अंबासकर http://jayavi.wordpress.com/
२९. कविता दिपक शिंदे http://beautifulblogtemplates.blogspot.com
३०. परेश प्रभु http://www.marathipatrakar.blogspot.com/

माहितीसाठी - स्टार माझावरुन...

वैयक्तिकः मला तरी हा निकाल तितकासा योग्य वाटला नाही. मला कुणाचीही वैयक्तिक बाजु मांडायची नाही, पण काही मुद्दे असे जसं: व्यावसायिक किंवा फक्त तंत्रज्ञानावरील वेबसाईट्स ऐवजी लेखनामध्ये विविधता असणारे ब्लॉग यांची निवड अधिक असायला हवी होती शिवाय कधीतरी एखादी पोस्ट असणार्‍या ब्लॉग ऐवजी वारंवारीता असणारे ब्लॉग असायला हवे होते. असो, निकाल तर लागलाच आहे - विजेत्यांचे मन:पुर्वक अभिनंदन!!

Monday 15 November 2010

इंसाफ की कायदा व न्यायदेवता यांची कुचेष्टा?

आदरणीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन.डी. टीवी व "राखी का इंसाफ" मालिकेचे सर्व लोक. सर्वप्रथम मला एका प्रश्नाचं उत्तर द्या - "राखी का इंसाफ" ही मालिका आपल्या घरी - कुटुंबासह - पाहता का?


परवा टी.व्ही. वर कार्यक्रम चाळताना ही मालिका पाहण्याचे अहोभाग्य लाभले. काय ती बया... काय तिचे कपडे...काय ती भाषा अन् काय ती मालिका! एन्.डी.टी.व्ही. सारख्या चांगल्या चॅनलने स्वत:च्या व लोकांच्या आब्रुची अशी लख्तरं काढावीत - खरं नाही वाटलं! मला हेच कळत नाही - नवरा - बायको, प्रेमी-प्रेमिका यांसारखी नाती काय अशी चव्हाट्यावर डिस्कस करावीत ? हां, आता बर्‍यापैकी हा भाग एक पब्लिसिटी स्टंट असु शकेल, टी.आर.पी. वाढवण्याचे प्रयोगही असतील - नाही असं नाही. मात्र त्या भागातल्या एकांनं आत्महत्या करावी इतपत हे प्रकरण जावं ? तो भाग पाहताना त्यातील एकालाही अक्कल नावाचा प्रकार असल्याचे जाणवले नाही. म्हणे एका बाईने "मामा" विरुध्द बळजबरीची केस केलेली - त्यात तिचा नवरा साथ न देता म्हणे त्रास देत होता. त्यावर बाईसाहेबांची कमेंट - नामर्द - नपुंसक अशी होती. बिचारा - समाजात - पै-पाव्हण्यांत लाजं-काजं नाही जगु शकला - गेला!

ही लोकं - टी.व्ही. वर दिसणार या विचारांनच एवढी हुरळुन जातात की आपणच आपल्या आब्रुची लख्तरं काढतोय याचं जराही भान त्यांना नसतं. भांडणं आहे - अडचणी आहे तर पोलिसांत जा - न्यायालयात दाद मागा - असल्या भिकारड्या कार्यक्रमात कसं काय जाऊ शकता? एकमेकांना शिव्या देत - कुठला इंसाफ वाटला जातो तेच नाही कळत.

न्यायमुर्ती म्हणुन किमान तुम्ही पुर्ण पोषाखात तरी असावं.. भाषा स्वच्छ असावी. टीचभर कापडात आणि अकलेला पत्ताही नसलेल्या व्यक्तिकडुन स्वत:ची अक्कल गहान ठेवुन कसला इंसाफ मागताहात! स्वत:च्या लग्नाचा व लफड्यांचा मोजमाप नसणार्‍याने - प्रेम - संबंध - लग्न संस्था यांसारख्या विषयांवर काहीही बरळावं? वा रे वा!

आपापसांतील मत-भेद - भांडणावर आधारीत "आपकी कचेरी" नावाचा किरण बेदींचा कार्यक्रम यायचा/ येत असेल. बर्‍याचदा पाहिलाय. शांतपणे दोन्ही बाजुंची मतं ऐकुन विचारपुर्वक निकाल देणार्‍या बेदींबद्दल कमालीचा आदरही वाटायचा/ वाटतो.

वकिलांनी ही मालिका बंद करण्याची याचिका दिली तर बाईसाहेब म्हणतात - कदाचित मी त्यांच्या प्रोफेशन मध्ये आले तर म्हणुन वकिलांना असुरक्षितता वाटायला लागलीय!!
अरे वा! असा कुणीही उठ-सुठ वकिल अन् न्यायाधिश होतो काय? काय मस्त जोक मारतात ना, बाईसाहेब?

असो - आपण तर एन.डी.टी.व्ही. ब्लॉक केलाय. गटारीत पडण्यापेक्षा गटार बंद केलेली कधीही चांगली! तुमचं तुम्ही बगा!