Categories

Aeroplanes

Aeroplanes

Friday 31 July 2009

भिमाशंकर - जंगल ट्रेक...

...... ट्रेक वरुन आल्यानंतरच व्यवस्थित लिहिन म्हणतो... तरीपण तुम्ही जावेळेस हे वाचत असाल [शनिवार - १आँगस्ट २००९], त्यावेळी मी मित्रांसोबत भिमाशंकरचा जंगल ट्रेक करत असेन. तुमच्या शुभेच्छा असु द्यात! चला तर - सोमवारी विस्तारपुर्वक बोलु..
तो पर्यंत - बोला - बम भोले.... बम - बम भोले!


भीमाशंकर - पुर्ण लेख लिहिलाय!

Wednesday 29 July 2009

ट्रेकिंग: टेक केअर दोस्त..!

मंडळी...
हा सारांश मी म.टा. च्या वेबसाइटवरुन घेतलाय.. प्रगतींनी फारच छान आणि महत्त्वाचं लिहिलंय... सारंच इथं पेस्ट करत नाही... मात्र तुम्ही ते आर्टिकल अवश्य वाचा आणि इतरांनाही सांगा!


हाय...!

पाऊस मुक्कामी आलाय! पण काही म्हणा, आपल्या शहरांतल्या पावसाला गर्दीचा एक तक्रारखोर आवाज असतो. इथे तो भेटतो तेव्हा लेट झालेल्या ट्रेनच्या गर्दीत शिव्या खात असतो किंवा रस्ते तुंबवून गुडघाभर साचलेल्या पाण्यात रिपरिप करत आपल्याला चिडवत राहतो...या पावसाला सरळ टांग मारायची. वीकेण्डला सॅक पाठीवर टाकायची. कॅमेरा लटकवायचा. रेनीवेअर अडकवायचं, कंपूला फोनाफोनी करायची, लोकलच्या वेळा नीट बघायच्या, नाहीतर सरळ गाडी काढायची आणि पावसाला भेटायला रानात जायचं....अस्साच प्लॅन करताय ना? पण मंडळी, या मान्सून पिकनिकपूर्वी लेट मी शेअर वन थिंग.
- प्रगती बाणखेले
ट्रेकिंग - पिकनिक च्या वेळी काळजी घेणं आणि सामाजिक - नैतिक जबाबदारी निभावणं या दोन्ही वेगवेगळया गोष्टी [दिसत - वाटत] असल्या तरी त्या आपल्याच कर्त्यव्याचा एक भाग आहेत, हे विसरुन चालणार नाही, हो ना?

पुर्ण लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा. [सचिन - या आर्टिकच्या माहितीबद्दल अनेक आभार]

क्रेडिट कार्ड रजिस्टर केलं का?

आर.बी.आय. च्या नोटीफिकेशन नुसार आपण आपले [भारतामध्ये दिले गेलेले] क्रेडिट कार्ड १ ऑगस्ट २००९ च्या आधी "वेरिफाइड बाय विजा" किंवा "मास्टर कार्ड ३डी सेक्युर" साठी रजिस्टर करणे आवश्यक आहे. १ ऑगस्ट २००९ पासुन ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी आपणास हा कोडही द्यावा लागेल. आपण जर क्रेडिड कार्ड होल्डर असाल तर कधाचित आपणास बँकेने या आधीच ही सुचना दिली असेल'च. तरीही माहिती नसल्यास खात्री करुन घ्या.

मला आलेल्या मेलच्या आधारे खाली काही बँकाची नावे आणि रजिस्ट्रेशनच्या साठी दिली आहेत
ए.बी.एन. अ‍ॅम्रो
आंध्रा बँक
अ‍ॅक्सिस बँक
सिटी बँक
एच्.डी.एफ्.सी. बँक
एच.एस्.बी.सी. बँक
आय्.सी.आय्.सी.आय. बँक
कोटक महिंद्रा बँक
स्टँडर्ड चँर्टर्ड
स्टेट बँक
करुर वैश्य बँक
डच बँक

Tuesday 28 July 2009

जय हो!


तुम्ही गांधीवादी असा अगर नसा.... मात्र.... गेल्या १८ वर्षात - स्टेट आणि सेंट्रल गव्ह. चे अंदाजे ४५० कार्यक्रम - प्रोजेक्टस् हे म. गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि पं. नेहरु यांच्या नावाने आहेत!

इथे अधिक माहिती वाचा...

स्टँप्स योगदान: इंडियापिक्स

Sunday 26 July 2009

नविन वाचन - बिंदुसरोवर

२०२३ साली चीनचे सैनिक तिबेटमध्ये घुसले अणि अनेक मंदिरांचा, गूढ ठिकाणांचा त्यांनी विध्वंस आरंभला. त्या मोहिमेत त्यांच्या हाती लागलं संस्कृतमधलं एक प्राचीन हस्तलिखित. हरियाणा विद्यापिठाकडुन त्यांनी त्या हस्तलिखिताचा अनुवाद करुन घेतला आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटले! कारण त्या हस्तलिखितात लिहिलं होतं, भारतात एका गुढ ठिकाणी अशी एक वस्तू आहे की जी हाती लागली तर तिच्या सहाय्याने संपुर्ण विश्वाची रह्स्यं उघडतील.माणुस संपुर्ण विश्वावर ताबा मिळवू शकेल! कर्मधर्मसंयोगानं त्या वस्तूचा ठावठिकाणा चिनी लोकांना लागला आणि मग सुरु झाला एक जीवघेणा पाठलाग! एक गट निघाला ती वस्तू मिळवायला तर दुसरा त्या वस्तूचे विसर्जन करायला - बिंदुसरोवरात. कुठे आहे ते बिंदुसरोवर? कोणती रहस्यं दडली आहेत त्यात?
वास्तवाकडुन अदभुततेकडे नेणारी आणि प्रतिक्षणी उत्कंठा वाढवणारी सर्वस्वी अनोखी कादंबरी!


नावः बिंदुसरोवर
लेखकः राजेन्द्र खेर
किंमतः रु. १६०/-
ऑनलाइन खरेदी: रसिक किंवा मायबोली

..... तुम्ही काय वाचताय?

कारगिल शहिदांना सलाम!


एक संवेदना.. हजारो वर्षांसाठी आम्हां भारतीयांच्या मनावर कोरली गेलेली!
एक आठवण .. त्या ५०० जवानांची...! एक साक्ष... विजयाची... हिम्मतीची आणि मर्दानगीची!!
शहिद जवानांना आदरपुर्वक श्रद्धांजली...! जय हिंद!

Thursday 23 July 2009

गोल दुनियेमध्ये सगळे कनेक्टेड आहेत...!

काही विनोद भलतेच भन्नाट असतात... आता हेच पहा ना - गोल दुनियेमध्ये सगळे कसे कनेक्टेड आहेत:

बॉसने सेक्रेटरीला फोन केला, 'एका आठवड्यासाठी आपण बाहेरगावी चाललो आहोत. त्यासाठीची सगळी व्यवस्था कर.'
सेक्रेटरीने नव-याला फोन केला, 'एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे बॉसबरोबर.'
नव-याने प्रेयसीला फोन केला, 'एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार आहे. तू माझ्या घरीच राहायला ये.'
प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला, 'मी एका आठवड्यासाठी बाहेर चालले आहे. तुला ट्यूशनला सुट्टी.'
विद्यार्थ्याने बाबांना फोन केला, 'बाबा, माझ्या ट्यूशनला आठवडाभर सुटी आहे. मला कुठेतरी घे‌ऊन चला ना फिरायला.'
बाबांनी त्यांच्या सेक्रेटरीला फोन केला, 'हा आठवडा मी माझ्या मुलाबरोबर घालवणार आहे. बाहेरगावी जाणे रद्द.'
सेक्रेटरीने नव-याला फोन केला, 'बाहेरगावी जाणे रद्द.'
नव-याने प्रेयसीला फोन केला, 'आपली भेट रद्द.'
प्रेयसीने विद्यार्थ्याला फोन केला, 'माझे जाणे कॅन्सल झाले आहे. तुझी ट्यूशन सुरूच राहील.'
विद्यार्थ्याने बाबांना फोन केला, 'ट्यूशन सुरूच राहणार आहे. आपलं जाणं रद्द.'.
..... ........ ........
बाबांनी पुन्हा सेक्रेटरीला फोन केला, 'माझा प्लॅन बदललाय. आपण बाहेरगावी जात आहोत !!

[ई-मेल]

Tuesday 21 July 2009

नंदन निलकेणींची - फुल्ली इंटिग्रेटेस कार्ड सिस्टम

नंदन निलकेणींनी प्रपोज केलेली सिस्टम भारतात लागल्यानंतर - काय होईल हे एका पिझ्झाच्या किस्यावरुन जाणुन घ्या. कदाचित हे संभाषण २०१५ सालचे आहे असे गृहीत धरुन चालु..

ओपरेटर - पिझ्झा हट ला फोन केल्याबद्द धन्यवाद! मी आपली काय सेवा करु शकतो?
कस्टमर - अं.. हां.. मला हवंय...
ओपरेटर - एक मिनिट सर, आपण मला आधी आपला बहुउद्देशिय कार्ड नंबर सांगाल का?
कस्टमर - हां. ओके.. ८८९८६१३५६१०२०४९९९८-४५-५४६१०
ओपरेटर - हां, मि. सिंग! आपणे १७, "जल वायु" मधुन बोलत आहात. आपल्या घरचा नं. २२६७८८९३ , औफिस नं. २५०७६६६६६ व मोबाइल नं. ०९८६९७९८८८८ आहे. आपण कोठुन बोलत आहात?
कस्टमर - घरुन! पण तुम्हाला हे सारे नंबर कुठुन मिळाले?
ओपरेटर - आम्ही "सिस्टमला" जोडलेलो आहोत, सर!
कस्टमर - ओके. मला एक सी-फुड पिझ्झा मागवायचा आहे.
ओपरेटर - माफ करा, पण आपणासाठी ही कल्पना चांगली नाही.
कस्टमर - कशी काय?
ओपरेटर - आपल्या मेडिकल रेकार्डस वरुन - आपल्याला हाय बी.पी. व हाय कॅलेस्टेराल आहे, सर!
कस्टमर - काय??..... अच्छा! मग काय मागवु?
ओपरेटर - एखादा लो-फॅट पिझ्झा ट्राय करा सर, आपल्याला आवडेल तो!
कस्टमर - लो-फॅट? तुम्हाला काय माहिती - मला आवडेल ते?
ओपरेटर - गेल्याच आठवड्यात आपण नॅशनल लायब्ररीमधुन "पौप्युलर डिशेस" चे पुस्तक आणले आहे, सर!
कस्टमर - ओके. ओके, ठीक आहे. बस्स आता! मला तीन फॅमिली साइजचे पिझ्झा द्या. कीती झाले त्याचे?
ओपरेटर - हां, आपल्या पाच लोकांच्या फॅमिलीसाठी हे पुरेसे आहे. सगळे मिळुन ५०० रु. झाले, सर!
कस्टमर - अच्छा. मी क्रेडीट कार्ड ने पे करु शकतो ना?
ओपरेटर - माफ करा - आपणास कॅश द्यावी लागेल, सर! आपले क्रेडीट कार्ड लिमिट्च्या वरती वापरले गेले आहे आणि गेल्या वर्षीच्या आक्टो. महिन्यांपासुन आपण बँकेचे २३०००.७५ देणे आहात. आणि यामध्ये आपल्या हाऊसिंग लोन चे लेट पेमेंट चार्जेस लावले नाहीत, सर!
कस्टमर - मला वाटतं, पिझ्झा येइइपर्यंत मी शेजारच्या ए.टी.एम. मधुन पैसे काढुन आणतो.
ओपरेटर - माफ करा, सर! पण आपण आपले आजचे "डेली विड्रावल" लिमिट पार केले आहे!
कस्टमर - ठीक आहे, माझ्याकडे तेवढी कॅश आहे. तुम्ही पिझ्झा पाठऊन द्या. कीती वेळ लागेल?
ओपरेटर - ४५ मि. सर! पण आपणास लागलीच हवा असल्यास - आपण आपल्या नविन नॅनो मधुन येऊन घेऊन जाऊ शकता!
कस्टमर - का.... य?
ओपरेटर - हां सर! आमच्या सिस्टमच्या रेकार्डनुसार - आपणाकडे महा.-०५-अब-११०७ नंबरची नॅनो आहे!
कस्टमर - ???
ओपरेटर - मी अजुन काही मदत करु शकतो, सर?
कस्टमर - काही नाही! अरे हां, त्या पिझ्झाबरोबर मला कोकच्या ती फ्री बाटल्या मिळतीलच ना?
ओपरेटर - हो सर, शक्यतो आम्ही देतोच. पण रेकार्डनुसार आपण डायबेटीक सुद्धा आहात!
कस्टमर - @#$@#$#$%@#$
ओपरेटर - तोंड सांभाळुन बोला, सर! १५ जुलै २०१० साली आपणास "शिविगाळ" केल्याप्रकरणी शिक्षा झाली होती, हे लक्षात आहे ना?
कस्टमर - चक्कर येऊन पडतो!!

मला आलेल्या इंग्रजी इमेल वर आधारीत!

आज "गटारी - अमावास्या" आहे?

अरे हां.... श्री महालक्मी दिनदर्शिकेनुसार आज "गटारी - अमावास्या" आहे.... उद्यापासुन श्रावण महिना सुरु होणार आहे..... ह्या वर्षी मी श्रावण महिना अंडी - मांस - मच्छी न खाता - "पाळायचा" - ठरविला आहे... दुपारीच मस्त बिर्यांणी झोडली आहे..... आज संध्याकांळी .... सासरवाडीहुन चिकन खाण्यास आमंत्रण आहे... मी हा महिना - यावर्षी तरी पाळु शकेन असं मला वाटतयं.... मात्र खात्रीशिर सांगता येत नाही.... बघु..... ;)

Monday 20 July 2009

स्व. राजीव गांधी पार्क [ कात्रज स्नेक पार्क ]

तसा प्लान पु. ल. देशपांडे गार्डन [याकोहामा] पाहण्याचा होता.... मात्र गेटवर पोहोचल्या नंतर समजलं की बागेची टायमिंग आहेत- सकाळी ८-११ आणि ४-६ असं काही [नक्की आठवत नाहीत]..... मग वळालो - पेशवे पार्क कडे, तर तिथंही टाइम - १-२ बंद..... आता एकच पर्याय होता - स्व. राजीव गांधी पार्क [ कात्रज स्नेक पार्क ]... आणि हा उघडा असतो याची मला पुर्ण खात्री होती!


.... छोकरीला बरोबर घेऊन हा पार्क पहिल्यांदाच बघितला... तसे बॅचलर असताना त्याच्या समोरच्याच सोसायटीत रहायचो.. त्यामुळे बर्‍याचदा तिकडेच पडिक असायचो आम्हीं. झाली या गोष्टीला आता जवळ - जवळ ६-७ वर्षे! असो.. साप बघितले - पुन्हा एकदा... पण कमी वाटले.. सुसर, मगर, कासव.. असेच काही....! आता पार्क बराच मोठा आणि मस्त बनवलाय... पांढरा वाघ, हत्ती, कोल्हा, लांडगा, अस्वल, निलगाय, हरिण, सांबर..... आणि बरेचसे प्राणी आहेत! यांची इंग्रजी नावं तिला सांगता सांगता मी माझे इंग्रजीचे दिवे पाजळत होतो!

चालतच सगळा पार्क फिरलो... जाताना छोकरी मस्त धावत पळत होती.. परतीला मात्र तिला उचलुन घ्यावं लागलं... बायको म्हणते - "तुझा अजुन एक ट्रेक झाला असं समज ;) " .... तसं आतमध्ये असलेल्या गाडीनेही - तिकिट काढुन - फिरता येतं!

बॅचलर असताना बर्‍याचदा आम्ही पाच-सहा मुलं या पार्क मध्ये उनाडक्या करायचो... म्हणजे कोपरे गाठुन बसलेल्या आणि चाळे करणार्‍या लव्ह - बर्डस् ना डिस्टर्ब करणे हाच हेतु असायचा. त्यापाठीमागे आमच्या प्रत्येकांची वेगवेगळी कारणं असायची.. काहींना वाटायचे .. साला आपल्याला जोपर्यंत गर्ल - फ्रेंड मिळत नाही... तो पर्यंत आपण अशांना डिवचायचे ... काहींजण उगाच मज्जा म्हणुन ... मी ही त्यांच्यातलाच एक.. पण मला वाटायचं [वाटतं] की हा पार्क [वा कुठलाही] चाळे करण्यासाठी असु नये.... येथे लहान - थोर - वयस्क लोकं येतात.. कीमान त्यांची तरी इज्जत राखा.... लहान मुलांच्या समोरच 'गुटर - गुं' चालायचं...! तेंव्हा स्कार्फ घालुन मुली स्वतःला सेफ करायच्या... तेच आजही आहे! पण बरंच कमी झालेलं दिसलं!


अधुन - मधुन पावसाच्या सरी येतच होत्या.. मात्र आम्ही ऐंजाय केला... ! सिंहगड रोडवरची पु. ल. देशपांडे गार्डन मस्त आहे असं ऐकलंय... बघु.. नेक्स्ट विकेंड!

मी.... ब्राउजर्स आणि इंटरेनेट एक्सप्लोरर ६!


तुम्ही कोणता ब्राउजर [वर्जन सहित] वापरता? फायरफॉक्स [३.५+]... आय.ई. [७ - ८]... सफारी [३+]... ओपेरा [९.५].. गुगल क्रोम [२.०]...फ्लॉक [२.५]... की आय. ई ६? तसा हा जरा टेक्निकल प्रश्न / मुद्दा आहे.. कारण, ब्राउजर अपडेट करणे किंवा आय.ई. सोडुन इतर कोणताही ब्राउजर आहे / वापरणे हे बर्‍याच लोकांना माहित नसते. म्हणजे सगळेच काय नेट सॅव्ही असतात असं नाही..! बरं काही लोकांना तर इंटरनेट म्हणजेच आय.ई. असं समिकरण माहित आहे! त्याचं कारण पण आहे. आय.ई. ने अनेक वर्षं ब्राउजर्सच्या दुनियेत राज्य केलं आहे. फार इतिहास सांगत नाही... पण जवळ-जवळ २००४ - २००५ पर्यंत जो पर्यत फायरफॉक्स ब्राउजर आला नव्हता तो पर्यंत तरी आय.ई. चीच चलती होती. तसा नेटस्केप, मोझिला हे होतेच... असो. सांगायचा मुद्दा हा आहे की, तुम्ही जर अजुनही आय.ई.६ वापरत असाल तर - इट्स टाइम टु स्विच टु न्यु वन!

आय.ई. ६ च्या नंतर आय.टी. [ब्राउजर्स टेक.] मध्ये बराच बदल झालाय.. तो अ‍ॅक्सेप्ट करणं आय.ई. ६ मध्ये बर्र्‍याच अंशी शक्य नाही.. त्यामुळं आय.ई.६ वायरस, सिक्युरीटी थ्रेट्स वगैरे साठी अधिकच प्रोन आहे. बर्‍याच वेबसाइटवर याबद्द्ल माहिती मिळेल. इव्हन, त्याचं आयुष्यही काही महिनेच राहीलंय! खाली लिंक्स देतोय, वाचुन बघा आणि आय.ई. ६ ला तिलांजली द्या!


नविन ब्राउजर्सची नावं वरती दिलीच आहेत... तुमच्या आवडीचा ब्राउजर डाउनलोड आणि इंस्टाल करा... तसा प्रत्यक ब्राउजरचा आपले - आपले प्लस - मायनस प्वांटस आहेत...!

तुम्ही जर आय.ई. वरतीच राहु इच्छित असाल तर किमान नविन वर्जन [७ किंवा ८] इंस्टाल करा!

मी तर फायरफॉक्स [३.५.१] च वापरतो... त्यासाठी बरीच कारणे आहेत.. जसं ओपन सोर्स... टॅब्स [आता आय.ई. आणि इतर ब्राउजर्स मध्येही आहेत].. फास्ट... सेक्युअर.... आणि अनेक कारणे!

सफारीचा एक खास वर्ग आहे... मॅक वाले... सध्या विंडोजसाठीही मिळतो म्हणे.. मस्त ब्राउजर आहे!

ओपेरा ही मस्त फास्ट ब्राउजर आहे.

आणि गुगल क्रोम तर काय सांगावे - त्याची "इनकाग्निटो" प्रायव्हेट ब्राउजिंग सुविधा मस्त आहे! मात्र सध्या ती फायरफॉक्स [३.५+] मध्येही आहे!!

फ्लॉक - एक सोशल ब्राउजर आहे.. त्यात ब्लौगिंग, सोशल नेटवर्किंग , फोटो - मिडिया मॅनेजमेंट, इ-मेल मॅनेजमेंट असे बरेच फिचर्स आहेत.

बर्‍याच वेबसाइट्सनी आय.ई. ६ ला मुठमाती दिली आहे.. जर युजर आय.ई. ६ वापरत असेल तर वेबसाइटवरती - अपडेट दाखवणारे मेसेज दाखवतात. असाच एक मेसेज माझ्या या ब्लौगवरतीही आहे.... तुम्ही जर आय.ई. ६ वापरत असाल तर तुम्हाला तो नक्किच बघायला मिळेल.... किंवा तुमच्या वापरात असलेल्या ब्राउजरचे नविन वर्जन असेल तर एक छोटासा मेसेज अगदी वरच्या हाताला - उजव्या बाजुला दिसेल!

असे काही अपडेटस - मेसेज जर तुम्हालाही तुमच्या वेबसाइट / ब्लौग वर - दाखवायचे असतील तर ही पोस्ट वाचा!

एवढं सगळं सांगण्यामागे अजुन एक कारण आहे - ते म्हणजे एक डेवलपर म्हणुन एखादी वेबसाइट / वेब प्रोजेक्ट आय.ई. ६ कंपॅटिबल करताना आमचे कसे !@#$%^&* होतात ते आम्हालाच माहिती आहे. इंटरेस्टिंगली आमच्या कार्पोरेट साइटचे २४% विजिटर्स आय.ई.६ वापरतात...आता बोला!
[ग्राफिक्सः ripie6 flickr]

Wednesday 15 July 2009

भटकंती - विकटगड [पेब]


पावसाची वाट बघत बघत जुन महिना कधीचाच संपला.. त्यात कामाचं निमित्त... हे रिलीज - ते रिलीज... हा पॅच - तो पॅच... आणि बरंच काही...! आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना!..... ट्रेकींग - भटकंतीला मुहुर्तच लागत नव्हता... गेल्या आठवड्याचा - ४ जुलै चा प्लान होता-होता रद्द झाला.. आता असे प्लान रद्द होणे काही नविन नाही ;) असो... तर गेल्या शनिवारी विकटगड उर्फ पेबला जाऊन आलो. औफिसातले सतिश आणि अर्नब तयार झाले... जुन्या औफिसातुन सुरिंदर, त्याचा मित्र गौरव, ज्यो आणि तिचा नवरा ललित... तर मुंबईहुन विशाल आणि उपेंद्रजी.... चांगले नऊ लोक जमले!

सकाळी ६ ला घरुन निघण्याचा प्लान होता... पण गाडीच आली नाही.. ड्रायव्हर साहेबांना फोन लाऊन लाउन मोबाइलची बॅटरी लो झाली पण साहेबांनी फोनच उचलला नाही.... झाले..! सात - सव्वासातला तो माझ्याकडे - पहिला पिकअप - आला.... चला.. कीमान आला तरी म्हणुन सुरुवात झाली.... रस्त्यात गौरव आणि सुरिंदरला घेऊन आम्ही सतिश आणि अर्नबला पिक-अप केले... आता शेवटचा पिकअप - हिंजवडीचा - ज्यो - ललित... अंदाजे आम्ही आठ वाजता एक्सप्रेसवे पकडला आणि गाडी खोपोली - नेरळ च्या मार्गे [विशाल आणि उपेंद्रजींना घेऊन] माथेरान कडे निघाली... कुठेही न थांबता १० वाजता माथेरानला पोहोचलो. हिरवेगार माथेरान माणसांच्या झुंबडीने गलबलुन गेलं होतं! अगदी बाजार भरल्यासारखं... त्यातच गाईड अन् घोडेवाले यांची विचारपुस! गाडी पार्किंगला लाऊन मस्त नाष्टा केला.... तिकिटं घेऊन [ रु. २५/माणसी, फक्त.] आम्ही ट्रेकला सुरुवात केली..!
विकटगडचा ट्रेक, खरं तर माथेरान च्या जरा खाली, लाइन नं. १३२ किंवा "वौटर पाईप" या ठीकाणी सुरु होतो.. मात्र आम्हाला १३२ नं. - न सापडल्यामुळे आम्ही माथेरानच्या मुख्य एन्ट्री तुन आत गेलो. चालत जाताना मिनिरेल्वेचा ट्रॅक जिथं लागतो, तिथुन उजव्या हाताला वळलं की नं १७८ पासुन, त्या पटरीबरोबर नं. १५७ [अंदाजे] पर्यंत त्याच ट्रॅक वरुन - धबधब्यांच्या बाजुने चालत रहायचं. थोड्याशा पावसानेही सगळं शिवार कसं हिरवंगार झालं होतं.. मधेच येणारे धुक्याचे ढग... छोटे - छोटे धबधबे.. वा! मस्तपैकी फोटो काढत आम्ही चालत होतो.. सतत पडणारा पाऊस मात्र फोटो काढायला अडथळा आणत होता.... पण तशातही आमची कलाकारी चालुच होती...!
नं. १५७ च्या जवळ एक छोटीशी कमान आहे.. म्हणजे या ट्रेकची सुरुवात... कमानीवरची ती छोटी घंटी वाजऊन आम्ही ट्रेकला सुरुवात केली... येथुन खाली उतरावे लागते... पावसामुळे वाट घसरडी झाली होती... त्यामुळे अगदी हळु.. अंदाज घेत आम्ही खाली उतरुन विकटगडाकडे आगेकुच सुरु ठेवली!

गप्पा मारत मारत आम्ही एक-एक टप्पा पार करत होतो... शेवटी गडाच्या मुख्य चढाइला पोहोचलो.. हा पॅच म्हणजे लॅडर - शिडी आहे.. ती पार करुन आम्ही वरती सपाट भागावर पोहोचलो... तिथे पटापट फोटो काढुन गडाच्या मुख्य ठीकाणाकडे निघालो... या पठारी भागावर एक छोटेसे घर[? किंवा मंदिर असावे... आम्ही त्या मार्गे न जाता वळसा घालुन गेलो..!] आहे. त्याच्या समोरुन टेकडी सारख्या भाग पार करुन मुख्य ठीकाणाकडे जाता येते. दुसरा रस्ता खालुन वळसा घालुन जाता येते. म्हणजे.. पठारी भागावर पोहोचल्यानंतर सरळ डाव्या बाजुने चालत रहा... तो रस्ता खाली उतरल्यास गुहेकडे जातो... खाली उतरण्याच्या काही अंतर आधी - अंदाजे ५०० मी. - पाच- सहा दगडी पायर्‍या वरती जाताना दिसतात. या मार्गे वरती दत्त पादुका - मुख्य ठीकाणा - कडे जाता येते. हा रस्ता जरा अवघड आहे. मदतीसाठी एक लोखंडी दोर बांधलेला आहे. त्याचा आधार घेत वरती जाता येते. मात्र पावसात हा रस्ता अगदीच निसरडा असल्याने, तो दोर व्यवस्थित पकडुनच वरती जाता येते. मात्र हा दोर लोखंडी असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे... काही ठीकाणी खचुन त्यातुन तारा बाहेर आल्या आहेत, तेंव्हा जरा जपुन!

दत्त पादुकांच्या पाठीमागे एका लोखंडी पोलवर भगवा आहे. हेच गडावरचे उंच ठीकाण. येथुन दिसणार्‍या निसर्गाचे - सभोवतालचे वर्णन शब्दांत करणे शक्य नाही... हिरव्या गार डोंगरांच्या रांगा.. धुक्यांचे ढर..... काही डोंगरावर पडलेले ऊन आणि काहींवर ढग.... अप्रतिम - अदभुत - अवर्णनिय !! येथुनच माथेरानच्या मिनि-ट्रेनचे ही दर्शन झाले.. सध्या पावसामुळी ही गाडी प्रवाशांसाठी बंद आहे... मात्र आम्हाला तिचे दर्शन झालेच.... कदाचित रुटीनचा भाग - किंवा ट्रॅक चेकिंग असावे.


पादुकांचे दर्शन घेऊन आम्ही त्याच मार्गाने खाली उतरु लागलो... चढताना काहीसा जाणवणारा त्रास, उतरताना फारच होत होता... त्यात ज्यो आणि ललित पहिल्यांदाच असा प्रयत्न करत होते... त्यामुळे त्या दोघांना व्यवस्थित खाली उतरवणे गरजेचे होते. रस्सी बांधुन त्यांना हळु-हळु खाली उतरवले आणि गुहेच्या दिशेने आम्ही चालु लागलो.

धुक्यामध्ये रस्त्याचा अंदाज येत नव्हता.... या ठीकाणी एक रस्ता/ वाट लागलीच खाली जाताना दिसते.. मात्र ही वाट रिस्की आहे... मी थोडं पुढं जाऊन दुसरी वाट सापडते का ते पाहिले आणि सापडली ही! दगडात खणुन पायर्‍या केलेली एक छोटीशी वाट खाली जाताना दिसली... सावकाश खाली उतरल्या नंतर डाव्या हाताला पाण्याचा एक कुंड आहे... त्याखाली हनुमानची एक छोटीशी मुर्ती ..! आता येथुन खाली उतरण्यासाठी एक लॅडर - शिडी आहे. हे शिडी अगदीच उभी आहे.. त्यामुळे खाली उतरताना पाय व्यवस्थित शिडीवर ठेवणे गरजेचे! शिवाय पाण्याचा फ्लो ही शिडीवरुनच खाली वाहतो, त्यामुळे पाण्याचा हलकासा मार खाण्यासही सज्ज रहा! डोंगराच्या बाजु-बाजुने गुहेच्या ठीकाणी जाता येते.

अंदाजे ४ वा. आम्ही गुहेशी पोहोचलो.... आतापर्यंत पोटातले कावळे बोंबलुन बेशिद्ध पडले होते.. सोबत आणलेले स्नॅक्स खाऊन आम्ही १०-१५ मि. विश्रांती घेण्यास बसलो.... तोपर्यत गुहा बघुन झाली.. दोनही गुहा चांगल्या परिस्थितीत आहेत.. रात्री राहण्यास योग्य! मात्र पावसाची आत्ताच सुरुवात असल्याने म्हणा.. किंवा अजुन लोकांचे राहणे सुरु झाले नसल्याने म्हणा... दोनही गुहा बर्‍यापैकी स्वच्छ होत्या.... पैकी डाव्या - मोठ्या गुहेत स्वामी समर्थांचे मोठे पेंटिंग आहे तर दुसर्‍या गुहेत गणेशाचे मुर्तीवजा पेंटिंग. बाहेरच्या बाजुला समर्थांच्या गादी सदृश एक बैठक - टाइल्स बसवुन केलेली आहे... कदाचित येथे येणार्‍यांनी ती स्वतःची समजुन थोडी घाणही केली होती.... मी आणि विशालने जवळच्या पाण्याने जरा स्वच्छ केली. एव्हाणा अंधार होऊ लागला होता... आणि आम्हाला त्या आधी नेरळला पोहोचणे गरजेचे असल्याने आम्ही समर्थांना नमस्कार करुन उतरणीला लागलो..... नेरळला उतरणार म्हणुन माथेरानला पार्क केलेली गाडी - ड्रायव्हरला फोन करुन नेरळ स्टेशनला घेऊन येण्यास सांगितले!

आतापर्यंत सरळ असणारी वाट येथुन पुढे जरा फसवी आहे... बर्‍याच ठीकाणे उप-वाटा असल्यामुळे चांगलीच फसगत होण्याची शक्यता आहे. आमच्या [वाचलेल्या] माहिती नुसार - जर तुम्ही नेरळच्या बाजुने चढत असाल तर - भला मोठा विजेचा खांब - हे रस्ता बरोबर असल्याचे चिन्ह आहे, असं समजण्यास हरकत नव्हती..... आणि आमच्या डाव्या हाताला असा विजेचा खांब दिसत होता... !! तो खांब साक्ष ठेऊन आम्ही चालत होतो. पुढे गेल्यानंतर पुन्हा एक दगडी पॅच येतो.. अंदाजे ७-८ फुटाचा हा पॅच उतरताना अगदी जेरीस आणतो. विशालने आधी खाली उतरुन सर्वांना खाली उतरण्यास मदत केली आणि एक-एक करत आम्ही खाली आलो.... थोडं अंतर गेल्यानंतर एका ठीकाणी छोटासा चौक येतो... हा सर्वात महत्वाचा चौक आहे!
तुम्ही जर गडावरुन खाली उतरत असाल तर तुम्हाला उजव्या बाजुला खाली उतरायचे आहे - नेरळच्या बाजुला.... हे चांगलं लक्षात ठेवा.... सरळ जाणारा रस्ता पुढे बंद होतो.... मी स्वत: चेक केलाय... आणि डाव्या हाताला पनवेल! आता हे मी सांगु शकतोय - कारण आम्ही डाव्या बाजुनेच खाली उतरलो!!!! नेरळच्या बाजुने चढत असाल तर अडचण नसावी. मात्र माथेरान च्या बाजेने चढुन - नेरळच्या बाजुला उतरत असाल तर हा - उजवा - रस्ता पक्का लक्षात ठेवा!
डाव्या हाताला दिसणार्‍या त्या विजेच्या खांबावर भरोसा ठेऊन डाव्या बाजुने खाली उतरायला सुरुवात केली... रस्ता अगदीच सरळ होता.. मात्र छोटासा आणि निसडाही! त्या मोठा विजेच्या खंबाच्या खालुन चालत आम्ही वळणा-या वाटेने सुमारे एक दिड तासाने खाली उतरलो... अंदाजे ७ वाजता! सुरुवातीलाच काही घरे लागली... एक माणुस जवळच भेटला... म्हटले चला... नेरळचा रस्ता विचारु! आणि.. आणि.. त्याने सांगितले की - आम्ही नेरळच्या बाजुने नाही - तर - पनवेलच्या बाजुने खाली उतरलो आहोत...हे "सत्ती" नावाचे गाव आहे! नेरळकडे जाण्यासाठी वरच्या त्या छोट्या चौकात आम्ही उजव्या बाजुने खाली उतरायला पहिजे होते!!! अगदी विजेचा झटका लागल्या सारखे झाले.... म्हणजे आता परत जंगलातुन त्या पहिल्या विजेच्या खांबापर्यंत वरती जायचे??? नाही...s s s s s s s s s s s s!!!

............................ s s s s s! फोन करुन गाडीच इकडे मागवावी असं मत झाले.... फोन करण्यासाठी मोबाइल काढला तर नेटवर्क गायब! शेवटी त्याच माणसाला विचारले - आता पनवेलला कसे जाता येईल ?... सात वाजता एस.टी. बस येते... सगळ्यांचा नजरा घड्याळावर.. ७.१० झालेले.. म्हणजे - बसही गेली असणार! तो माणुस म्हणाला - कधी कधी बस थांबतेही... तेंव्हा तुम्ही समोरच्या गावात - माळढुंगे - जाऊन तिथुन बस पकडा.. किंवा सिक्स सीटर मिळाले तर बघा! आता आली का पंचाईत? आम्हाला वाटले की बस याच गावातुन आहे.... पण आता बस १५-२० मि. अंतरावर असणार्‍या "माळढुंगे" गावातुन होती.... आधीच अंधार पडायला लागला होता...आणि पुन्हा रस्ता चुकु नये म्हणुन - विशालने त्याच माणसाला रस्ता दाखवण्यासाठी येणास विचारले... नाही - नाही म्हणत अखेर ५० रु. तो बस थांब्यापर्यंत येण्यास तयार झाला.... तो पुढे आणि आम्ही त्याच्या मागे.... चलो माळढुंगे!!
बसच्या ठीकाणी पोहोचलो.... तर कळाले की... आजुन बसच आली नाही.. म्हटले चला.. अजुनही होप आहे... पण आमची ही होप जास्त वेळ नाही टिकली... आज बसच येणार नसल्याचे समजले! आता? सगळ्यांचा मनात एकच - वी आर लौस्ट - मुझे इस जंगल से बचावो... वगैरे - वगैरे...!
एव्हाना.... सगळ्यांनाच चहाची तलफ झाली होती.... वहानाची वाट बघत - चहाची सोय होते का ते विचारले... तर कोरा चहा - ब्लॅक टी - मिळेल असे सांगितले... दुधाचा का नाही - तर - सगळा गावच असा कोरा चहा पितो असं कळालं! चला - कोरा तर कोरा.... गरमा - गरम चहा तर मिळाला - यावरच आम्ही हुरळुन गेलो! आता चर्चा सुरु झाली... पुढे काय... ? येथुन जवळचे ठीकाण म्हणजे - पनवेल - १२ कि.मी.... पण... पनवेलला कसे पोहोचायचे?.. की या गावातच मुक्काम करायचा?

चहा संपता - संपता, एक सिक्स सीटर आली... आणि आमच्या जिवात जीव आला...आता जबाबदारी त्या सिक्स सीटरवाल्याला - पनवेलला सोडण्यासाठी पटवणे... ६०० वरुन ४०० मध्ये तो १२ कि.मी. - पनवेलला सोडण्यास तयार झाला..... सगळे बसलो.... अन आता - चलो पनवेल....! माथेरान वरुन - नेरळला बोलवलेली गाडी आता पनवेलला बोलावणे गरजेचे होते.... पण नेटवर्कच नसल्याने - काहीच करु शकत नव्हतो...! पाच - सहा कि.मी. गेल्यानंतर मोबाइला रेंज मिळाली आणि पटकन ड्रायव्हरला फोन केला...! आणि गाडी - जुन्या पनवेल बस स्टेशनला मागवली.... सर्वांच्या जिवात जीव!
ज्यो आणि ललित साठी तर हा प्रकारही ट्रेकिंग इतकाच नविन होता... जंगल.. ट्रेक... रस्ता चुकणे... कोरा चहा.... सिक्स सीटरच प्रवास...! सर्वच..!!पण दोघांची काहीही तक्रार नव्हती.... एंजाय करतोय असं त्यांचं मत होतं!
अंदाजे ९ वा. आम्ही पनवेलला पोहोचलो.... गाडी येण्यास अजुन एक तास तरी लागणारच होता.. तोपर्यंत - "विनम्र" मध्ये खाऊन घेण्याचे ठरले... मस्तपैकी चिकन कोल्हापुरी खाल्ले...गौरवने मात्र व्हेज मागवले... नंतर समजले - चतुर्थी आहे...! असो... आमच्या देवाला चालते म्हणुन मस्त खाऊन घेतले... १०.३० ला गाडी पनवेलला पोहोचली... विशाल - उपेन्द्रजींना बाय-बाय करुन आमची सोमु [सुमो!] पुण्याच्या मार्गाला लागली....!

दुसरे जातात म्हणुन मलाही जायचे आहे, म्हणुन " उठला अन् ट्रेकला सुटला " असं मात्र करु नका....!!
  • ट्रेकला जाण्यासाठी आधी तयारी करा...ट्रेकिंगचे शुज [एक्शन्चे ट्रेकिंग शुज चांगले आहेत.] असणे हे फार महत्त्वाचे!... दोर - रोप नेहमी जवळ ठेवा.
  • ट्रेकिंगच्या जागेची पुर्ण माहिती मिळवा... त्या जागेचे महत्त्व ... इतिहास जाणा..
  • गडांवर मस्तीसाठी जाऊ नका... मोठमोठ्याने ओरडणे.. गाणी लावणे हे टाळा... त्यासाठी स्वत:चे घर किंवा पब्स आहेतच ना!
  • आपण बरोबर नेलेला कचरा.. प्लीज.. प्लीज आपल्या बरोबरच खाली आणा!
  • गडांवरील बरीचशी ठिकाणं काळाच्या ओघात जीर्ण झाली आहेत... तेंव्हा अशा ठीकाणी खेळ आणि पळापळ करुन उगाचच रिस्क घेऊ नका...!
  • ट्रेकिंगच्या ठीकाणी असलेल्या झाडांना - फुलांना जपा...!
सर्वांना सोडत - सोडत मला घरी पोहोचायला रात्रीचे २ वाजले.... थोडसं तेल अंगाला चोळुन .. मस्त गरमा - गरम पाण्यात अंघोळ केली अन् अंथरुणात घुसलो...!

नेहमीप्रमाणे फोटो येथे आहेतच!!

Tuesday 14 July 2009

वॉट ऍन आयडिया...!

handy little iPhoneImage by Leeks via Flickr

महेंद्रजींची पोस्ट वाचुन मला ही माझा किस्सा सांगावासा वाटला, म्हणुन अर्ध्यात सोडलेली हे पोस्ट पुर्ण करतोय!

तर किस्सा असा- माझ्या मोबाइल सर्विस - आयडियाचा, झिरो बॅलन्सचा प्लान आहे. साहजिकच कैलिंग रेट जरा महाग आहेत. शिवाय गेली पाच वर्षे सर्विसधारक असल्यामुळे - सो-कौल्ड - गोल्ड [की प्लॅटिनम? कसलं डोंबलाचं!!] लेबल असंच लावलेलं ... त्याचं आपल्याला काय? असो.. मग मी जरा चौकशी केली अन् कळालं की मी जर ५९ रु. मंथली पॅकेज घेतलं तर कौलिंग रेट अर्धा पडेल. मी म्हटलं चला.. काही हरकत नाही.... आजच जोडुन दे [१ जुन]... तर तो आउटलेटवाला म्हणाला की मंथली बिलिंग सायकलच्या वेळीच हा चेंज करता येइल. बरं .. माझी दर महिन्याची १५ तारीख बिलिंग सायकल! तेंव्हा तो म्हणाला १३ ला शनिवारी या... पॅकेज जोडुन देतो.. १५ पासुन चालु होइल. मी ठीक आहे ... १४ ला रविवार आहे, शनिवारी १३ ला [जुन] येतो...आणि बाहेर पडलो.

१३ जुनला जाउन, माझ्या दोन्ही मो. नंबरांना पॅकेज जोडुन घेतले. १५ जुन पासुन चालु होण्याच्या खात्रीवर!.... जुनचे बिल आले तेंव्हा त्यात हे १२० रु. [+टॅक्स] जोडुन आलेले!! शिवाय ज्या मो. नंबरसाठी जी.पी.आर.एस. चालु नाही त्यासाठीही ६० पैसे लावुन!! आयडियाच्या कौल सेंटरला फोन लावला.. तर नेहमीप्रमाणे "आमचे सर्व प्रतिनिधी साध्या इतर ग्राहकांना मदत करण्यात व्यस्त आहेत. कृपया प्रतीक्षा करा" आणि त्यानंतरची ती जाहिरातीची टेप सुरु... ५-७ मिनिटांनी फोन लागला! नशिब!! मी माझी तक्रार त्या प्रतिनिधिला संगितली, तर कळाले की "तो प्लान" १३ जुन पासुनच चालु झाला आहे आणि मला १३-१४ तारखेसाठी १२० रु. द्यावे लागतील! मी म्हटलं. तु मला तुझ्या मॅनेजरशी फोनवर जोडुन दे, तर तसं करता येणार नाही असं म्हटला... ठीक आहे.. तक्रार लिहुन घे - घेतली...आमचे प्रतिनिधी २४ तासांत फोन करतील म्हणाला.... ठीक आहे म्हणुन फोन कट केला.


दुसर्‍या दिवशी फोन आला....
ती: सर, तुमच्या तक्रारी साठी हा फोन करण्यात आला आहे. आपली काय तक्रार आहे?
मी: मी जे पॅकेज जोडले आहे, ते दोन दिवस आधी जोडुन त्यासाठी पुर्ण महिन्याचे चार्ज लावण्यात आले आहेत. हे कसं?
ती: सर, तुम्ही १३ तारखेला पॅकेजची रीक्वेस्ट केली होती. गोल्ड मेंबर असल्यामुळे ती ताबडतोब पुर्ण करण्यात आली आहे.
मी: पण मी १ जुनला चौकशी केली, तेंव्हा का नाही जोडुन दिले - गोल्ड मेंबर म्हणुन?
ती: ......... सर, ती रीक्वेस्ट आम्हाला १३ जुनला मिळाली.
मी: मग आयडिया आउट्लेट उघडुन बसलेले "ते" लोक कोण आहेत? त्यांनी मला चुकीची माहिती का दिली? आणि गोल्ड मेंबर म्हणुन तुम्ही दोन दिवसाचा डिस्काउंट का नाही दिला?
ती: ........!.... सर मी आमच्या मॅनेजरला विचारुन तुम्हाला परत फोन करते.
मी: ठीक आहे!!

काही वेळांनी...
ती: सर, तुमची तक्रार आणि कारण ग्राह्य धरुन आम्ही १२० रु. रीवर्ट करत आहोत.
मी: आभारी आहे!
....................................
ती: तुमची अजुन काय तक्रार आहे का?
मी: हो, आहे ना... माझ्या दुसर्‍या मो. नंबरसाठी ज्यावर जी.पी.आर.एस. चालु नाही त्यासाठी ६० पैसे कसे लावलेत?
ती: माफ करा... किती चार्ज लावलाय?
मी: ६० पैसे, फक्त!
ती: ................ चुकुन लागला असेल सर! आणि ही अमाउंट काही मोठी नाही!!
मी: तुमचे किती कस्टमर्स असतील हो... अंदाजे?
ती: जवळ - जवळ ८ लाख..!
मी: जर तुम्ही त्यातील ५ लाख लोकांना ६० पैसे "चुकुन" लावले तर होणारी अमाउंट नक्कीच मोठी असेल, नाही?? वाट ऍन आयडिया, मॅडमजी!!
ती: ...................... माफ करा सर. तुमची अमाउंट रीवर्ट करण्यात येत आहे!!
मी: मी आपले लाख - लाख आभार मानतो!

................ तर असा हा किस्सा... नाइस आइडिया, हो ना!




Reblog this post [with Zemanta]

Sunday 12 July 2009

निळु भाऊ: देव तुम्हाला चिरशांती देवो!

मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये जिवंत खलनायक उभा करणारे निळु फुले आज आपल्यात राहिले नाहित.



त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो!

फोटो - म.टा.

आइस-एज ३, पाहिला?

"फादर्स डे" ला मी माझ्या छोकरीला "आइस-एज- ३" दाखवण्याचं प्रौमिस केले होतं... आज मुहुर्त लागला..! सिनेमा तसा मस्त आहे... हिंदी वर्जन बघितला.. उगिचच आपली इंग्रजीची अक्क्ल पाजळायला नको म्हणुन... आणि खरं सांगायचं तर यातील विनोद आणि काही टपोरी संवास हिंदीमध्येच ऐकायला चांगले वाटतात... :)


फोटो - आइस - एज: रामा'ज सक्रीन
तर.. एकंदरीत मस्त वाटला सिनेमा... जरा छोटासा आहे... पण छकास... !
चला.. डोळयाची झापडं बंद होताहेत....कालच्या "पेब विकटगड ट्रेकची" सुस्ती अजुनही आहे... नंतर भेटु...!

Monday 6 July 2009

भटकंती - अधिक माहिती ...

भटकंतीच्या अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळे जरुर पहा:
ट्रेकक्षितिज
सह्याद्री वरील पुस्तके
सह्याद्री
भटकंती
ट्रेकडी
युवाशक्ती
भ्रमंती
पुणे - आसपास
दिपक चौधरी आणि अभिजित अवलसकर

बाकी.... जर तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर जरुर लिहा ...!

पुणे - गड आणि किल्ले - माहिती...

पावसाच्या सुरुवातीबरोबर माझ्यासारख्या बर्‍याच भटक्यांना सह्याद्रिच्या भटकंती / ट्रेकिंचे भुत लागते. पुणे आणि आसपासचे गड-किल्ल्यांची माहिती गोळा करता करता नाकी - नऊ येते...! पाठीमागे एकदा नेटवरती सापडलेली ही फाइल माझ्या चांगल्याच कामी आली.... पुण्यातील बहुतांशी गडांची माहिती या मध्ये आहे.. कसे जावे... राहण्याची सोय वगैरे माहिती - मराठी मध्ये असणारी ही फाइल तुम्हालाही मदतगार ठरेल असे समजुन येथे देत आहे.

पुणे गड - किल्ले - माहिती

सदर फाइल नेटवर सापडल्यामुळे - मालकाची माहिती नाही

Thursday 2 July 2009

ये रे.. ये रे.. पावसा!

आज दोन दिवस झाले, आमच्या सोसयटीमध्ये पाणी नाही.. तसे पण कार्पोरेशनचे पाणी अजुन आले नाही आणि टँकरवाले पाणीच नाही म्हणताहेत! पिण्याच्या पाण्यासाठी बिसलरी चालु आहे..धुण्या- भांड्यासाठी पाणीच नाही... आई-बाबा वैतागुन गावी निघुन गेले... :(

Rain on an umbrella from passing showersImage via Wikipedia

"लगान" चे सिन राहुन - राहुन डोळ्यासमोर येताहेत.... !

चिंब पावसात भिजुन जमाना झाला असं वाटतयं... गरमा-गरम वडा-पाव आणि वाफाळणारा अमृततुल्य चहा.... लोणावळ्याचे - राजमाची - ट्रेकिंग साठी आणि पाण्याच्या मस्तीशी - भुशी डॅम यांना अगदी आसुसलोय... पावसा... राजा .. नको रे असा अंत पाहु..!

.. ये बाबा... आता तरी ये..!