Categories

Aeroplanes

Aeroplanes

Tuesday 14 July 2009

वॉट ऍन आयडिया...!

handy little iPhoneImage by Leeks via Flickr

महेंद्रजींची पोस्ट वाचुन मला ही माझा किस्सा सांगावासा वाटला, म्हणुन अर्ध्यात सोडलेली हे पोस्ट पुर्ण करतोय!

तर किस्सा असा- माझ्या मोबाइल सर्विस - आयडियाचा, झिरो बॅलन्सचा प्लान आहे. साहजिकच कैलिंग रेट जरा महाग आहेत. शिवाय गेली पाच वर्षे सर्विसधारक असल्यामुळे - सो-कौल्ड - गोल्ड [की प्लॅटिनम? कसलं डोंबलाचं!!] लेबल असंच लावलेलं ... त्याचं आपल्याला काय? असो.. मग मी जरा चौकशी केली अन् कळालं की मी जर ५९ रु. मंथली पॅकेज घेतलं तर कौलिंग रेट अर्धा पडेल. मी म्हटलं चला.. काही हरकत नाही.... आजच जोडुन दे [१ जुन]... तर तो आउटलेटवाला म्हणाला की मंथली बिलिंग सायकलच्या वेळीच हा चेंज करता येइल. बरं .. माझी दर महिन्याची १५ तारीख बिलिंग सायकल! तेंव्हा तो म्हणाला १३ ला शनिवारी या... पॅकेज जोडुन देतो.. १५ पासुन चालु होइल. मी ठीक आहे ... १४ ला रविवार आहे, शनिवारी १३ ला [जुन] येतो...आणि बाहेर पडलो.

१३ जुनला जाउन, माझ्या दोन्ही मो. नंबरांना पॅकेज जोडुन घेतले. १५ जुन पासुन चालु होण्याच्या खात्रीवर!.... जुनचे बिल आले तेंव्हा त्यात हे १२० रु. [+टॅक्स] जोडुन आलेले!! शिवाय ज्या मो. नंबरसाठी जी.पी.आर.एस. चालु नाही त्यासाठीही ६० पैसे लावुन!! आयडियाच्या कौल सेंटरला फोन लावला.. तर नेहमीप्रमाणे "आमचे सर्व प्रतिनिधी साध्या इतर ग्राहकांना मदत करण्यात व्यस्त आहेत. कृपया प्रतीक्षा करा" आणि त्यानंतरची ती जाहिरातीची टेप सुरु... ५-७ मिनिटांनी फोन लागला! नशिब!! मी माझी तक्रार त्या प्रतिनिधिला संगितली, तर कळाले की "तो प्लान" १३ जुन पासुनच चालु झाला आहे आणि मला १३-१४ तारखेसाठी १२० रु. द्यावे लागतील! मी म्हटलं. तु मला तुझ्या मॅनेजरशी फोनवर जोडुन दे, तर तसं करता येणार नाही असं म्हटला... ठीक आहे.. तक्रार लिहुन घे - घेतली...आमचे प्रतिनिधी २४ तासांत फोन करतील म्हणाला.... ठीक आहे म्हणुन फोन कट केला.


दुसर्‍या दिवशी फोन आला....
ती: सर, तुमच्या तक्रारी साठी हा फोन करण्यात आला आहे. आपली काय तक्रार आहे?
मी: मी जे पॅकेज जोडले आहे, ते दोन दिवस आधी जोडुन त्यासाठी पुर्ण महिन्याचे चार्ज लावण्यात आले आहेत. हे कसं?
ती: सर, तुम्ही १३ तारखेला पॅकेजची रीक्वेस्ट केली होती. गोल्ड मेंबर असल्यामुळे ती ताबडतोब पुर्ण करण्यात आली आहे.
मी: पण मी १ जुनला चौकशी केली, तेंव्हा का नाही जोडुन दिले - गोल्ड मेंबर म्हणुन?
ती: ......... सर, ती रीक्वेस्ट आम्हाला १३ जुनला मिळाली.
मी: मग आयडिया आउट्लेट उघडुन बसलेले "ते" लोक कोण आहेत? त्यांनी मला चुकीची माहिती का दिली? आणि गोल्ड मेंबर म्हणुन तुम्ही दोन दिवसाचा डिस्काउंट का नाही दिला?
ती: ........!.... सर मी आमच्या मॅनेजरला विचारुन तुम्हाला परत फोन करते.
मी: ठीक आहे!!

काही वेळांनी...
ती: सर, तुमची तक्रार आणि कारण ग्राह्य धरुन आम्ही १२० रु. रीवर्ट करत आहोत.
मी: आभारी आहे!
....................................
ती: तुमची अजुन काय तक्रार आहे का?
मी: हो, आहे ना... माझ्या दुसर्‍या मो. नंबरसाठी ज्यावर जी.पी.आर.एस. चालु नाही त्यासाठी ६० पैसे कसे लावलेत?
ती: माफ करा... किती चार्ज लावलाय?
मी: ६० पैसे, फक्त!
ती: ................ चुकुन लागला असेल सर! आणि ही अमाउंट काही मोठी नाही!!
मी: तुमचे किती कस्टमर्स असतील हो... अंदाजे?
ती: जवळ - जवळ ८ लाख..!
मी: जर तुम्ही त्यातील ५ लाख लोकांना ६० पैसे "चुकुन" लावले तर होणारी अमाउंट नक्कीच मोठी असेल, नाही?? वाट ऍन आयडिया, मॅडमजी!!
ती: ...................... माफ करा सर. तुमची अमाउंट रीवर्ट करण्यात येत आहे!!
मी: मी आपले लाख - लाख आभार मानतो!

................ तर असा हा किस्सा... नाइस आइडिया, हो ना!




Reblog this post [with Zemanta]