Categories

Aeroplanes

Aeroplanes

Tuesday 22 February 2011

संस्कृत भाषा वाचवा....


संस्कृत भाषा पृथ्वीवरील प्राचीन, समृद्ध आणि शास्त्रीय भाषा मानतात. ही भाषा हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन धर्मांची उपासनेची भाषा असून ती भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही ह्या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्ञ "पाणिनी"ने इ. स. पूर्व काळात "अष्टाध्ययी" या ग्रंथात संस्कृताची पुनर्रचना केली. संस्कृत भाषेतील शब्दांनाच भारतीय भाषांमध्ये योजले आहे. संस्कृतमधूनच इतर भारतीय भाषा जन्मल्या आहेत. - विकिपीडिया

एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे. भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल.

माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहिलाच पण "अवगत असलेल्या भाषा" मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा आणि पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा वापरतो. संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत.

हि भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. कारण मागील सर्वेक्षणात संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते.

उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही राज्यात अगदी ठरवूर ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत. मृत भाषा घोषित झाली की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जात नाही. आणि मग आपली ही पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल.

तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो. आज आपल्याच भाषेवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली नाही जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा.

मला मिळालेल्या ई-मेल वरुन - जसंच्या तसं - आपल्या माहितीसाठी.

Monday 7 February 2011

व्हॅलेन्टाईन्स डे - गिफ्ट आयडीयाज...

या व्हॅलेन्टाईन्स डे ला एकमेकांना काय भेट द्यावं - हा दरवर्षीचा महाप्रश्न! सगळ्यांसमोरचा म्हणत नाही - पण "व्हॅलेन्टाईन" ना नक्कीच पडत असावा. साध्या सोप्या प्रकारात म्हटलं तर - एखादं ग्रिटींग + गुलाबाचं फुल = व्हॅलेन्टाईन्स भेट! नेहमीच्या भेट-प्रकारात अंदाजे खालील गोष्टी असतात:

  • तिच्यासाठी फुलांचा गुच्छ + चॉकलेट्स + टेडी बेअर + की-चेन वगैरे
  • सोबत सिनेमाला जाणे...
  • त्याच्यासाठी वॉलेट किंवा परफ्युम...
  • तिच्यासाठी पर्स किंवा परफ्युम...
  • संध्याकाळी एखाद्या हॉटेलात जेवण!

मात्र यावर्षी जरासं वेगळं भेट दिलं तर? मी काही जादुचा मंत्र किंवा अफलातुन "आयडियाची कल्पना" देत नाहीये - मात्र जरासं नाविन्य सुचवतोय, एवढंच.

  • टी-शर्टः जरासं वेगळंपण असणारे टी-शर्ट "ओकाका" या संकेतस्थळावर पाहिले. मराठीपण मिरवण्याचा हा वेगळा प्रकार खरंच आवडला. यामध्ये आपण त्याच्यासाठी आणि तिच्यासाठी असं दोघांसाठीही टी-शर्ट मागवु शकता.
  • पुस्तकः हो, एखादं प्रेमकथा असणार पुस्तक [ उदा. तिच्यासाठी - बकुळा- आणि त्याच्यासाठी - दुनियादारी- ] आपण त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी नक्कीच मागवु शकता. यासाठी फ्लिपकार्ट किंवा रेडिफ या संकेतस्थळावरुन आपणांस "विनामुल्य घरपोच" पुस्तकं मागवता येतील. मराठीतील पुस्तकं रसिक साहित्य किंवा सह्याद्री बुक डेपो वरुनही मागवता येतील.
  • गेम्सः गेमाड्या व्हॅलेन्टाईन्स साठी काही परवडणार्‍या गेम्सही आपण फ्लिपकार्ट वरुन मागवु शकता.
  • रोमँटीक गाण्याचा सेटः संपुर्ण रोमॅंटीक गाण्यांचा सी.डी. सेटही एक भेट रोमॅंटीक ठरेल. यामध्ये पंचमदा पासुन सध्याच्या गाण्यापर्यंत आपणांस निवड करता येईल.
  • नियतकालिक [मॅगझिन] ची वर्गणी: त्याच्या किंवा तिच्या आवडीनुसार वर्षभरासाठी तुम्ही एखादं नियतकालिक [मॅगझिन] मागवु शकता. यामध्ये इतर नियतकालिकेही असतील - अगदी 'माझी सहेली' ते 'गृहशोभिका'. काही वाचनीय नियतकालिके तुमच्या पेपरवाल्याकडेही मिळतील. त्यातल एखादं बायकोसाठीही मागवता येईल.
  • यावर्षी व्हॅलेन्टाईन्स डे - पुढच्या सोमवारी येतोय - म्हणजे एक आठवडा आहे - बघा सोमवारची सुट्टी मिळतेय का.. एखादी मस्त विकेंड-ट्रीप होवुन जाईल - कसं?

याशिवायही तुमच्या काही [ भन्नाट ] आयड्या असतीलच... जमलं तर शेअर करा.. इतरांनाही फायदाच होईल.

यासंदर्भात वाचावं असं काही:
त्याच्यासाठी: महेंद्र कुलकर्णीं लिखित = "रोमॅंटीक आयडीयाज.."
तिच्यासाठी: कांचन कराई लिकित = "रोमॅंटीक आयडीयाज.. माझ्याही"
व्हॅलेन्टाईन्स डे – शुभेच्छापत्रे: = "मराठी ग्रिटींग"

"व्हॅलेन्टाईन्स डे" साजरा करायचा की नाही - यावर वादा-वादी होतेच - दरवर्षी!! मला वाटतं - प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही दिवसाची किंवा अशा सणाची गरज नाही.

Wednesday 2 February 2011

"जोर का झटका" - तद्दन फालतु!

परवा चुकुनच हा कार्यक्रम पाहिला. एएक्सएन् वरचा वाईप-आउट चांगला वाटला होता. मात्र "जोर का झटका" पाहुन अपेक्षाभंगच झाला.

[छायाचित्र - "जोर का झटका" संकेतस्थळावरुन]


या कार्यक्रमातील सहभागी आहेत - आकाशदीप सहगल, अमित सरीन, आशिमा भल्ला, बख्तियार ईरानी, क्लाउडिया सेस्ला, देबीना बनर्जी, डिम्पी महाजन, गौरव चोपड़ा, ग्रेसियस डीकोस्टा, हनीफ हिलाल, जेनिफर विंजेट, करिश्मा तन्ना, कृष्णा पाटिल, कुशल पंजाबी, मानस कत्याल, मनोज कुमार, मिंक ब्रार, नारायणी शास्त्री, नताशा सूरी, पायल रोहतगी, प्रियदर्शनी सिंह, राजा चौधरी, रोहित वर्मा, सिमरन कौर मुंडी, सोनिका कालीरमन, एनी, विंदु दारा सिंह व वृजेश हिरजी.. हुश्श..!

यातली कीती नावं आणि कोण ओळखीचं वाटतंय त्याचा विचार नका करु.. एक - दोन सोडले तर एकही नाव - चेहरा ओळखीचा वाटत नाही. शाहरुख फक्त कमेंटींग करतानाच दिसतो...

यापेक्षा चांगला कार्यक्रम "पोगो टी.व्ही" वर येतो. "टकेशि'ज कॅसल" नावाचा - त्यात जावेद जाफरीचा आवाज आहे. कॉमेडी म्हणुन तरी "टकेशि'ज कॅसल " या "जोर का झटका" पेक्षा कधीही चांगला आहे. किमान हसु तरी येतं. "जोर का झटका" पाहुन हसावं की रडावं - हेच कळत नाही!!

जाऊ दे... च्यायला - आपला "टकेशि'ज कॅसल" किंवा "सी.आय.डी" कधीही चांगला - हसायला तरी मोकळे..!

ता.क - ही टिपणी म्हणजे शा.खा. [शारुख हो!] च्या असंख्य - अगणित चाहत्यांना वाईट वाटावे किंवा त्यांनी हा कार्यक्रम पाहु नये यासाठी नाही! शा.खा. ला या कार्यक्रमासाठी शुभेच्छा!

Tuesday 1 February 2011

सावधान - इंकम टॅक्स रिफंड - फ्रॉड मेल!

टॅक्सपेअर, आपल्याला रु. ३२,७२०.०० इंकम टॅक्स रिफंड मिळणार अशी ई-मेल पाहताच काय आश्चर्याचा धक्का बसतो ना? एक तर टॅक्स भरायची मारामारी, त्यात भरलेल्या टॅक्सवर रिफंड मिळणार.. व्वॉ!


.... तर अशा प्रकारच्या ई-मेल सध्या जोर धरु लागल्यात. मार्च एन्ड जवळ आलाय - टॅक्स सेविंग - फायालिंग या सार्‍या धांदलीत अशीच एखादी ईमेल येते आणि नकळत आपण रिफंडच्या मागणीसाठी तयार होतो.

असाच एक मेल, माझा मित्र सचिनला आला. मात्र यातील बारकावे लक्षात घेवु:
१. हा ई-मेल आलेला ई-मेल आयडी सरकारी खात्याच्या डोमेनवर असल्याचं दिसतं - मात्र असे ई-मेल-एलियास बनवता येतात.
२. "क्लिक हिअर" ही लिंक भलत्याच डोमेनवर जाते. अशा लिंकवर क्लिक करायच्या आधी फक्त माऊस-ओवर केलं तरी - स्टेटस बार मध्ये त्या ती लिंक दिसते. ती लिंक इंकमटॅक्स च्या वेबसाईट्ची नक्कीच नाही.
३. थोडं पुढं जाऊन - क्लिक करुन - पाहिलं तर अगदी इंकमटॅक्स च्या वेबसाईट्ची नक्कल दिसते - मात्र वरती अ‍ॅड्रेस बार मध्ये - लिंकचा पत्ता पहा - तो नक्कीच इंकमटॅक्स च्या वेबसाईट्चा नाही.

.... यापुढच्या स्टेप्स मध्ये आपणाकडुन आपल्या बॅंक खात्यात लॉगिन करवुन घेतलं जातं - हे सगळंही नकलीच - मात्र अगदी खरं भासावं असं!

तर मंडळी - अशा फसव्या ई-मेल पासुन सावधान!

अधिक माहिती - या संकेतस्थळावर आहे.