Thursday 15 March 2012

आळीमिळी -गुपचिळी...

... शिवरायांच स्मारक जमीनीवर उभारण्यास जागा नाही म्हणुन समुद्रात उभाराचे वादे.. १९९५ सालापासुन जनतेला अक्षरशः चुना लावत चाललेलं हे स्मारकाचं राजकारण... हजारो एकरचे ग्रहप्रकल्प करण्यासाठी यांच्याकडे जमीन आहे... नसेल तर बळकवायचीही तयारी... पर्यावरणाच्या गोष्टी फक्त स्मारकासाठीच लागु का?... त्या ग्रह प्रकल्पांसाठी पर्यावरण खात्याची परवानगी मिळवण्यासाठी राजकारण्यांची कामगिरी वाखानण्याजोगी.. मग स्मारकासाठीच का आळीमिळी? आयुष्यभर राजांच्या नावाचं राजकारण करणारे नेमके याच बाबतीत गप्प का?



शिवरायांचे स्मारक, स्मृती आमच्या हृदयात आहे... उगाच राजकारण करु नका... राजकारणी म्हणुन आपण लायक नाहीत हे सर्वांनाच माहिती आहे.. त्याची प्रचितीही आलीच आहे.. मग आता काय 'सर्टीफाय' होण्याची वाट पाहताहात का?


सचिन व त्याच्या कामगिरीची बाराखडीही माहिती नसलेले, उगाचच त्याच्या 'त्या' शतकाची कुचेष्टा करताहेत.. सोशल नेटवर्किंगवरुन आपल्या अकलेचे दिवे पाजळताहेत... का.. कशासाठी..? आपल्या आयुष्यात आपण असे किती दिवे लावलेत ज्यासाठी आपण सचिनच्या रेकॉर्डची वाट पहात आहात...?

3 comments:

शिवाजी महाराजांच्या समुद्र्यातील स्मारकास पर्यावरण खात्याने परवानगी नाकारली.
मात्र लावासा आणि आदर्श पर्यावरणास पूरक असे प्रोजेक्ट्स.

वा रे सरकार ! खोट्या आश्वासनानं मतं मिळतात आणि ख-या लवासा ने पैसा... म्हणजे झालं

अगदी खरे आहे..... पूर्णपणे सहमत........!