Sunday 17 January 2010

आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत!


गेल्या काही दिवसांपासुन महाजालावरती चर्चिला जाणारा "मराठी ब्लॉगर्स मेळावा" आज पार पडला. मी जास्त काही लिहित नाही, कारण यावर आधीच - प्रभास, पेठे काका, अनिकेत, पंकज, हरेकृष्णाजी आणि काही मान्यवरांनी, ट्विटर वरुन लिहिले आहे. मला फक्त आपणा सर्वांचे आभार मानायचे आहेत :)

आजचा हा मेळावा सफल करण्यासाठी आपण दिलेले योगदान, आयोजक, सहकारी, आलेले - न आलेले ब्लॉगर्स, वाचक, पत्रकार यांचे मनःपुर्वक आभार आणि अभिनंदन!

22 comments:

चुकवला रे ... :( हरकत नाय ... अजून एक करू लवकरच ... हेहे... ;) डोंगरात.

भुंगा या स्नेह मेळाव्याला प्रत्यक्ष हजर नसले तरीही मनाने होतेच. अतिशय आनंद झाला आहे. सगळ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.:)

मजा आली असेन ना!!! एक वेगळाच अनुभव...चला प्रत्यक्ष नाही तरी तुमच्या लेखनातून आणि फोटोतून पहातो आम्ही..........

तुम्ही मांडलेले मुद्देही अगदी व्यवस्थित आहेत...
तेव्हा लगे रहो!!! हम तुम्हारे साथ है!!!!

मराठी पाऊल पडते पुढे .. मराठी पाऊल पडते पुढे .. !!!!
आपल्याला व आपल्या सहकार्यांना हार्दिक धन्यवाद ...

"मराठी ब्लॉगर्सचा एक फॉर्मल ग्रुप स्थापन करुन त्याअन्वये मराठी भाषा, मराठी ब्लॉगींगचा प्रचार आणि अनेक कार्य करण्याचा मानस आहे. ह्या स्नेहमेळाव्यानंतर आयोजक आणि काही प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत अश्या अनेक घटनांचा उहापोह करण्यात आला, ज्याबद्दल सविस्तर माहीती नजिकच्या काळात प्रसिध्दीस देण्यात येईल."

हे तर खूपच स्तुस्त आहे.

पुन्हा एकदा आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन !!!

सोहळ्याचे वृत्तांत वाचले. भुंगोबा, अभिनंदन! सोहळा सुरेख व यशस्वीरित्या पार पाडलात. आता पुढे बरंच काम आहे. आमचा सहभाग, पाठिंबा आणि मदत तर नेहमीच असेल.

@रोहन,
हो, पुढच्या मेळाव्यात जेवणाची सोय पण आहे म्हणे.. मात्र पंकज तो मेळावा - ढाक-बहिरीच्या गुहेत घ्यायचा म्हणतोय :)

@भानस,
हो, तुम्हा सर्वांचेही यात सहभाग आहेच की... तुमचेही अभिनंदन!

@तन्वी,
मज्जा तर आलीच :) सारे जेंव्हा आपली खरी ओळख देत होते तेंव्हा .. पुढ्च्या मेळाव्यात भेटुच!

@सचिन,
हो.. प्लान तर भरपुर आहेत.. आपण सारे सोबत आहात... चला मराठीसाठी काही तरी करुयात!

@कांचन,
हां.. आता तर खरी तयारी सुरु करायचीय... आपण मदतीला आहातच याचा अभिमान वाटतो.

अरेरे .. अमेरिकेत असण्याचे जे तोटे आजपर्यंत सहन केले , त्यापैकी‌ हा एक ! एका चांगल्या कार्यक्रमाला मी मुकलो ... पण मला सकाळ वरील बातमी, गुरूव्हिजनवरील उद्यान नोट वाचून समजले .. स्नेहमेळावा एकदम भन्नाट झाला ! अभिनंदन ..

http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/2010/01/blog-post.html

yaa thikani mi vruttant takalay re

Neeraja

@मी
हां, फारच छान झाला कार्यक्रम... सर्वांना भेटता आलं... तरीही काहींशी बोलणं राहुनच गेलं... पुढच्या वेळी.. :)

@निरजा,
हो, आत्ताच वाचला तुझा वृतांत..! छान वाटलं आपणा सर्वांना भेटुन!

Good Going Bhunga.
Thanks a lot for organizing such wonderful event (though I couldnt attend it).
60+ ppl in first meet is in indeed an achievement.

ब्लॉगर्सच्या मेळाव्याला यायचे सकाळी ठरविले. पण अचानक महत्वाचे काम उपटले आणि राहून गेले. तुम्ही मंडळी ह्या निमित्ताने मराठीची जाण आणि पोज वाढवित आहेत याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन. माझा ब्लॉग निमित्त आहे.www.subhashinamdar.blogspot.com तुमच्या कार्यात पहभागी होण्याची इच्छा आहे. माझा उपयोग झाला तर आनंदच वाटेल. पुढची प्रगती जरूर कऴवा. त्यासाठी माझा मेल आहे..subhashinamdar@gmail.com

हॆहॆहॆ! आभार कसले मानता राव आपलच कार्य आहे!

मस्त झाला ना कार्यक्रम :)

तुम्ही भेटला आनंद झाला मला खरतर तुम्ही माझे पहिले ब्लॉगर मित्र आहात आणि हो यामुळे तुमच्या बुलेटवर बसून फिरायलाहि मिळाले

@सलील,
हो, ६०+... अगदी ५० नोंदणी झाल्यावरही.. मानलं मराठी मंडळींना!

@सुभाषजी,
चालायचंच... पुढच्या मेळाव्याला आपण नक्की भेटु. संबंधित विचार आणि सुचनांची देवाण-घेवाण नक्कीच होईल.

@प्रकाशजी,
जसं माफी मागितल्यावर मोकळं वाटतं न् तसंच [मला ] आभार मानले की जरा मनालाही हलकं वाटतं... :) सारे बरोबर असल्यासारखं वाटतं... :)

@विक्रम,
हो.. आपल्या भेटुन आनंद झाला :) पुन्हा नक्की भेटु!

असेच भेटत रहा. कळवत जा सर्व वृतांत. मीट यशस्वी केलीत सर्वांचे मनापासून कौतुक!! येऊ आम्ही ही...... दर महिन्याला भेट ठेवा. जून मध्ये मी पण असेन.

मी चुकवला कार्यक्र्म. पिल्लाचं बोरनहाण झालं काल. पण मजा आली असेल ना? पुढच्यावेळेस नक्की.

सगळ्या ब्लॉग वरचा वृत्तांत वाचायला आता वेळ मिळला.. सकाळपासुन थोडा बिझी होतो कामात. खुपच छान झाला मेळावा. फोटॊ पण पाहिलेत पण कुठला कोणाचा हेच समजलं नाही. प्रॉपर टॅग करुन पुन्हा पोस्ट करा नां..

नमस्कार,
मराठी ब्लॉगर्सचा हा पहिला मेळावा आयोजित करून यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन!
मी या मेळाव्याला येऊ शकले नाही याचे वाईट वाटते आहे.

@अनुक्षरे,
आम्ही तयारच आहोत... सारेजण पुन्हा भेटुच!

@शिनु,
पुढच्या वेळेस नक्की या... हो, मज्जा आली तर!

@महेंद्रजी,
सार्‍यांचा एक कॉमन फोटो टाकिन म्हणतो.. टॅग लाऊन....!
शिवाय विनायक सरांकडुन ते वि.डी.ओ. शुट्स यायचे आहेत ना!

@डी.डी.
काही हरकत नाही... पुढच्या वेळेला भेटुच!

... आपणा सर्वांची कमी या वेळी जाणवली... आपण असता तर आणखी मजा आली असती.... पुढच्या मीटला नक्की भेटुयात!

लवकर टाका पोस्ट वाट पहातोय :)

अरे डोंगरात कुठेही बोल ... बाय-द-वे. मी मस्करी नाही करत हा... पुढचा कार्यक्रम असाच हटके जागी हवा... हवतर थेट रायगडावर करू.. हर हर महादेव.. :)

»» त्या दिवशी अंघोळ केली नसल्याने तसं पारसं येणं मला जरा ऑड वाटत होतं...(!) ;) पण ट्विटरवर प्रभास मास्तरांचे लाईव्ह ट्विट्स वाचून एखाद्या फुटबॉलच्या मॅचसारखा रोमांचित झालो होतो... या वेळी मुकलो.. पण पुढल्या वेळी एक दिवस अगोदरच अंघोळ करून ठेविन... लक असलं तर मीही तुम्हां लोकांसोबत असेल, ढाक बहिरीच्या गुहेत...!!! हा..हा.. ;D
»» मीसुद्धा याबद्दल इथे एक पोस्ट टाकलिय..

- विशल्या!