Categories

Aeroplanes

Aeroplanes

Tuesday 30 June 2009

नंबर्सचे लौजिक...

रोजच काही ना काही शिकायला मिळतं.... आत्ताच एका मित्राची मेल आली... नंबर्सचे लौजिक...अर्थात आपण जे १,२,३ अंक लिहितो [इंग्रजी मध्ये!] , त्यांना वन, टु, थ्री... का म्हणतो... किंवा त्यांचा आकार तसा का आहे.. किंवा वन ला टु आणि टु ला थ्री का म्हणत नाही? त्याच्या पाठीमागे अँगल्सचे लौजिक असतं म्हणे.. आजच कळाले!

वन या इंग्रजी अक्षरामध्ये एकच अँगल असतो.. टु मध्ये दोन, थ्री मध्ये तीन आणि अशाप्रकारे नाइन मध्ये नऊ अँगल्स असतात... तर झीरो एकही अँगल नसल्यामुळे गोल आहे!

हे प्रेझेन्टेशन पहा.. म्हणजे लक्षात येइल, मला काय म्हणायचे आहे ते..

वांद्रे-वरळी सी लिंक आणि राजकारण!

...राजकारण गेलं चुलीत म्हणतात ते काही खोटं नाही.. एवढा चांगला लिंकरोड झाला... लोकांची सोय झाली.. आणि राजकारण्यांना चेव चढलाय - नामांतराचा!



मला मात्र एक गोष्ट समजत नाही... नामांतरावरुन एवढा गोंधळ का? कशासाठी... ? राजीव गांधी किंवा सावरकरजी - दोघांच्याही नावाचे राजकारण करण्याची गरज नाही. सत्तारुढ पक्षाने "राजीव गांधी" असे नामकरण केले तर विरोधी पक्षाचे आक्षेप.... मात्र हाच पक्ष सत्तारुढ असता आणि सत्तारुढ विरोधी पक्ष असतात तर ही हे प्रकरण असेच रंगले असते.. तेंव्हा हा पक्ष योग्य आणि तो अयोग्य असे होत नाही ना? एखाध्याने चांगलं काम केलं तर त्यात पाय आडवा आणायलाच पाहिजे का? नामकरण ज्यांच्या म्हणण्याप्रमाणे झाले नाही तर असे लोक या रोडचा वापर करण्याचे सोडतील का? किंवा, सावरकरांचे नाव दिले तर सत्तारुढ पक्षाचे नेते या रोडवरुन येणे-जाणे वर्ज करतील.... दोन्हीही प्रश्न्नाचे उत्तर नाही, असेच आहे! मग वाद कशाला?
.... स्वदेस, सिनेमातला तो "मेलाराम" आणि त्याची मोहनला [शाहरुख खान] दिलेली पार्टनरशीपची औफर आठवतीय का.. त्यात तोही "मेलाराम का मोहन ढाबा" किंवा "मोहन का मेलाराम ढाबा" असे सुचवितो! मात्र शेवटी तोच हा विषय सोडुन देतोच ना!

असो... वादावादी कीतीही चालो... आपण मात्र मुंबईला गेलो कि या रोडवरुन एक चक्कर जरुर मारणार! आतापर्यत परदेशात आणि सिनेमातच पाहिलेलं असे रोड आता आमच्या भारतात - मुंबईत ही आहे, असं अभिमानाने सांगण्यासाठी आणि तो अनुभव घेण्यासाठी!

Monday 29 June 2009

वारीचे फोटो..

सकाळची सुरुवात चांगली झालीय... मित्राने वारीच्या फोटोची लिंक्स पाठवल्या होत्या..


[वरील फोटो - सुहास च्या पालखी या आल्बममधला आहे]

  • सुहास: सुहासच्या वेबसाइटवर "पालखी" आणि इतर आल्बम्स - गॅलरीज - खास बघण्यासारखे!

वेळ मिळाला तर एक नजर टाका.. ;)

Friday 26 June 2009

ब्लॉग कँप - पुणे

परवाच्या अपघातामुळे - पायावर सुज असल्याने - मी आजचा पुणे ब्लौग कॅप अटेंन्ड नाही करु शकत... :(

या वर्षीही नाही... कधाचित पुढच्या वर्षी..!
आयोजक - प्रायोजक - संयोजक आणि हजर राहणारे ब्लौगर्स - सर्वांना धन्यवाद - शुभेच्छा!

Thursday 25 June 2009

मायकल जॅक्सन - मे युर सोल रेस्ट इन पिस!

खास फॅन नसलो तरी.. बर्‍याचदा मित्राबरोबर तुझी गाणी ऐकली आहेत...
मंगेश राव [आमचे खास मित्र जे मायकल साहेबांचे अतिशय जबरी फॅन - एसी म्हणा हवं तर - आहेत] - आम्ही तुमच्या दु:खात सहभागी आहोत.



मायकल - तुम्हाला चिरशांती लाभो!

Wednesday 24 June 2009

मी माझाच अपघात पाहिला....!

पेट्रोल भरुन पंपाच्या बाहेर पडत होतो... अगदी १०-२० चे स्पीड.. इंडिकेटर लाऊन... तेवढ्यात..१८-१९ वर्षाचा एक नमुना... [ |- <- असा] जोरात येऊन माझ्या गाडीला ठोकतो... त्याच्या बाइकचे पुढचे चाक - माझ्या बाइकची बौडी यांच्या मध्ये माझा उजवा पाय...! मी गाडी बाजुला लावली... हेल्मेट काढुन खाली पाय ठेवला... तशी सर्रकन.. पायाची कळ चमकुन गेली... आतापर्यंत दाबुन ठेवलेला राग अन् शांतपणे सांगण्याचे मत - तिथेच संपले... खाड-खाड अशा तीन-चार त्याच्या कानाखाली वाजवल्या... तरीही राग शांत होत नव्हता... मात्र लोक म्हणाले - जाऊ दे..! त्याला त्याच्या वडिलांचा नंबर विचारुन फोन लावला.. तर नमुन्याने घरचा नंबर दिला.. आणि बघायला त्याचा भाऊ आला... आणि तोही धाकटा..!! वडील कोठे आहेत तर म्हणे बाहेर गेलेत.... तुझ्याकडे ड्रायव्हींग लायसेन्स आहे..... नाही..... मग तु असा गाडी घेऊन आलाच कसा ... वडिलांनी सांगितले - पेट्रोल भरुन आणायला.. धन्य!!
त्याच्या गाडीकडे पाहिले - पुढचे चाक बर्‍यापैकी वाकलेले..... हॅडलचा सेंट्रल बोल्ट - तुटलेला... एकंदरीत त्याच्या स्पीडची जाणीव करुन देत होते... पेट्रोल पंपावर एन्ट्री करताना एवढा स्पीड...अ‍ॅक्सिडेंडच्या जागेपासुन पेट्रोलची मशिन अगदी पाच - दहा फुटावर.. अर्थात .. त्याने माझ्या बाइकला ठोकले नसते तर त्या मशिनचे नक्कीच उदघाटन झाले असते! कदाचित मोठा बाका प्रसंग उदभवला असता..!


.... पुन्हा गाडीला कीक मारली आणि औफिसला पोहोचलो... संध्याकाळपर्यंत पाय सुजला होता.... एक पेनकिलर खाउन थोडा आराम मिळाला होता... मात्र चालताना पायात चांगलीच कळ मारत होते..!
उद्या विकेन्डला एक्स-रे काढावा म्हणतोय.. फ्रॅक्चरची उगाचच शंका नको...!

Tuesday 23 June 2009

मी आमच्या हा. सोसायटीच्या मिटींगला हजर राहतो!

बर्‍याच दिवसांपासुन असलेली तक्रार - मी आमच्या हा. सोसा. च्या मिटींगला नसतो.. तसा मी काही कमिटी मेंबर वगैरे नाही....!
काल संध्याकाळची मिटींग चांगलीच दोन तास रंगली... बरेच वाद - प्रश्न एकायला मिळाले... आणि कळाले.. या दुनियेत [सोसायटीमध्ये] फक्त आपण एकटेच त्रस्त नाही आहोत!

असो... वालंटियर मेंबर म्हणुन माझे नाव घालण्यात आलय... पुन्हा रविवारी मिटींग आहे.. बघुयात.. काय होतय!

Friday 19 June 2009

पालखी: ज्ञानेश्वर माऊली.. ज्ञानराज माऊली तुकाराम!

भलेही मला कधी पालखीमध्ये सामिल होण्याची संधी मिळाली नाही... आणि मीही कधी तसा प्रयत्न केला नाही.. मात्र आज तसा योग आलाच! सकाळी औफिसला जाण्यासाठी निघालो आणि सोलापुर - हडपसर रस्त्यावर पालखीसाठी रस्ता बंद..!! मग काय... रस्ता खुला होण्याची वाट पहाण्याशिवाय पर्यायी मार्गच नव्हता... मोबाइल वरुन औफिसला सदर मेल टाकली... थॅक्स टु मोबाइल इंटरनेट!! गाडी बाजुला लाऊन पालखि बघत उभारलो... काही फोटोही काढले आणि पालखीबरोबर थोडा चाललोही... तेवढीच मनाची समजुत... पांडुरंगाला नमस्कार सांगुन बाजुला झालो..!



बरेच लोक पालखीवाल्यांना केळी आणि तिळाचे लाडु वाट होते... किमान पुण्य मिळवण्याचा तो एक पर्यायच वाटला.. असो, ज्याची त्याची श्रद्धा! एक - दोन ठीकाणी वारक-यांची मोफत डोळे तपासणी आणि चष्मे वाटप चालु होते... मात्र स्पिकरवरती मोठ - मोठ्याने त्यांच्या स्पौन्सर्सची नावे आधी सांगुनच!

आणि मग - पुण्याच्या वाहतुकीचे कौतुक काय सांगावे... समोर रस्ता बंद आहे असं बेंबीच्या देठापासुन सांगुनही जेंव्हा लोक तसेच आपली दुचाकी पुढे रेटत होते.. बराच वेळ सांगुनही माझे पेशन्स संपले होते.. मग काय... चांगला मध्येच जाऊन उभारलो... आणि कधी प्रेमाणे.. तर कधी अक्षरशः ढकलुन गाड्या बाजुला करत होतो... काही वयस्क मंडळीही साथ होती... आणि अशीच काही "वयक्स" मंडळी दवाखाण्याचे कारण सांगुन पुढे जायला बघत होती.... कमाल आहे ना?

असो.. तीन तासानंतर रस्ता खुला झाला... पाठमो-या पालखिला नमस्कार करुन हडपसरहुन निघालो... आणि आत्ताच औफिसात पोहोचलो... लगेच पटापट हे लिहिले.... चला आता कामाला लागतो..!

बोला - ज्ञानेश्वर माऊली.. ज्ञानराज माऊली तुकाराम!...
ज्ञानेश्वर माऊली.. ज्ञानराज माऊली तुकाराम!...
पंढरीनाथ महाराज की जय!


Wednesday 17 June 2009

वेब सर्व्हे आणि डोनेशन्स!

ब-याचवेळा अशा ओनलाइन सर्व्हेच्या मेल येतात.. तुम्हालाही येतच असतील.. मात्र आज लिन्क्ड-इन ची मेल आली.. आणि महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी $२० मिळणार असे लिहिले होते.. मात्र ते कुपनच्या स्वरुपात किंवा चॅरिटेबल ला दान करता येणार होते.. म्हटले चला दानच करु.. आणि सर्व्हेला सुरुवात केली.. पण काय.. पोपट झाला ना राव.. पहिल्या प्रश्नावलीतच त्यातुन बाद ... कारण क्लायंटची रिक्वायरमेंट मी दिलेल्या उत्तराशी मेळ खात नव्हती!

मात्र तरीही - केलेल्या एफर्टससाठी €1 मिळाला आणि तो "अनिता बोर्ग" संस्थेला दान केला... चला... आज काहीतरी चांगले काम केल्याचा आनंद !



अरे हां.. तुम्हाला जर अशी संधी मिळाली तर बघा ट्राय मारुन... कदाचित तुम्ही यापेक्षाही जास्त दान करु शकाल :-)

Saturday 6 June 2009

वटपौर्णिमा:"झाडे लावा - झाडे जगवा"

झाडांचे महत्त्व सांगणारे - आणि अनुषंगाने त्याचे परिणामही दर्शविणारे हे चित्र किती बोलके आहे, नाही का?



सत्यवानाला यमदेवाकडून परत मिळविण्यासाठी सावित्रीने याच दिवशी वडाची पूजा केली व आपले सौभाग्य राखले अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या महिन्यात सर्व सवाष्णी सौभाग्यरक्षणासाठी वडाची मनोभावे पूजा करतात. सातही जन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात. (मग तो कितीही दुर्गुणी का असेना.)

Wednesday 3 June 2009

कोंकण यात्रा...

गेल्या आठवड्यात फॅमिलिसह कोंकण - तरकारली बीच - सिंधुदुर्ग - यशवंत गड - अंबोळगड आणि गगनगड [बावडा] [श्री. गगनगिरी म. आश्रम] - अशी यात्रा केली.. ! मस्त झाली.. कामाचा क्षीण घालवण्यासाठी अगदी हवी-हवी असणारी सुट्टी अशी कारणी लावली ;)

नेहमीप्रमाणे फोटो [भरपुर!] काढले.. अन् काही निवडक आल्बम खाली दिलेत..

Monday 1 June 2009

कोणत्याही वेबसाईट्वर भारतीय भाषेत लिहा..!

१. वेबसाइटवर किंवा ब्लौग वर मराठी - भारतीय भाषेत कसे लिहता येईल? माझ्या ब-याच मित्रांनी मला ब-याचदा विचारलेला प्रश्न!
उत्तर सोपे आहे.. अगदी काहीच इंस्टाल न करता गमभन या वेबसाइटवर तुम्हाला मराठी - बांगला - गुजराथी - पंजाबी - कन्नड - मल्यालम - उडिया - तमिल - तेलगु - उर्दु या भाषांमध्ये लिहिता येईल.
त्या साइटवर टाइप करा आणि तुमच्या ब्लौग वर कौपी-पेस्ट करा.. शिवाय ब्लौगरच्या पोस्टींग मध्ये मराठी - हिंदी टायपिंगची सोय आहेच!

२. कोणत्याही वेबसाइटवर मराठी किंवा हिंदीमधुन प्रतिक्रिया - कमेंटस् कशा देता येतील?
यासाठी वरील पर्याय आहेच, शिवाय हे बौक्स - मराठी - हिंदी - फायरफौक्स ब्राऊजरच्या बुकमार्कस बार वर ड्रॅग - ड्रोप करा. मग ज्या साइटवर तुम्हाला कमेंट द्यायची असेल त्या साइटवर जाऊन ते बटन एकदा दाबा - ट्रान्सलेशन सक्रिय होइल आणि मग तुम्ही इंग्रजी मधुन शब्द लिहित जा.. स्पेस बार दाबला की तो शब्द मराठी किंवा हिंदी मध्ये रुपांतरीत होइल..!

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हीडिओ पहा...! [संदर्भ - डिजिटल इंस्पिरेशन]