आंबे पूर्णिमा...
9 years ago
From today, painting is dead!
जेवणाचे भरपुर सामान आणि सोबतीला एक कोंबडी अशी जेवणाची जय्यत तयारी करुन आलेला हा ग्रुप गड पहायला आलाय की पिकनिक करायला असा प्रश्न स्वाभाविकच मला पडला... गडभेटीला तुम्ही कोंबडी वगैरे कसे काय नेता राव..? .. अर्थात त्या बरोबर बाटली ही आणलीच असेल नाही का? .. असेलही कदाचित ... त्यांच्या जेवणाची तयारी होईपर्यंत आम्ही झोपायची तयारी सुरु केली होती... सकाळी लवकर उठुन सुर्योदय बघायचा होता ना.. आणि शिवाय राजगडाच्या दिशेने आगेकुच ही ..!!
राजमाचीच्या ट्रेकच्या वेळी, अगदी एक ग्रुप- अंदाजे १७-१९ वयातला असावा... गडावर गाणी लाऊन नाचत होता.. सोबतच्या मुलीही मोठ्-मोठ्याने ओरडुन त्या नाच्यांना प्रोत्साहित करत होत्या ... हे गड - किल्ले आपली संस्कृतीची आधारस्थाने आहेत.. मंदिरे आहेत याची जराही जाणीव या गाढवांना कशी असु नये?
हरिश्चंद्र गडावर एक ग्रुप पिऊन एवढा धुंद होता की विचारु नका... यांचा मोरक्या तर अक्षरश: विवस्त्र - हो... अगदी विवस्त्र .. होऊन शेकोटीसमोर नाचत होता...
एका आय-टी कंपनीचा [माझ्याकडे यांचा व्हीडीओ शुट आणि फोटो सुध्दा आहेत] भला मोठा ग्रुप या ठीकाणी आपल्या कामगारांची "कसली तरी" परिक्षा घेत होता.. आणि त्या अंतर्गत ४-५ लोकांचा एक असे पाच-सहा ग्रुप जोर-जोराने "अल्फा - बीटा" असे ओरडत पळत होते... काय म्हणावे यांना...? हजारो वर्षांच्या जुन्या आणि पवित्र ठीकाणी तुम्हाला तुमच्या असल्या परीक्षा घेताना लाज नाही का वाटली..? ... तोंड वर करुन पळणारे ती माकडे त्या जागेचे पावित्र्य नष्ट करताहेत.. याची साधी जाणीवही होऊ नये..?
त्यांच्यातल्या एका महान गाढवाने सिगारेट पिऊन ते थोटुक वाळलेल्या गवतात निर्लज्यपणे फेकुन दिले आणि एक्-दोन मिनिटातच तिथे आग लागली... हे घडले ते मुख्य गणपती गुहेच्या वरती..!
.... ...... अहो, तुम्हाला असलेच प्रकार करायचे आहेत तर त्यासाठी अनेक ठीकाणे आहेत... मात्र गडांवर- किल्ल्यांवर, मंदिरांच्या जागी जाऊन असला प्रकार करु नका... इतिहास आणि संस्कृतिचा अभिमान असणा-यांच्या सहनशिलतेचा अंत पाहु नका...!
किल्ल्यावर जावंच कशाला?
या प्रश्नाला उत्तर एकच, "किल्ले आहेत म्हणुन तेथे जावं." पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजेआपल्या भुगोलाला पुढील अनेक पिढ्यांनी गौरवानं-अभिमानानं सांगावं असा इतिहास जिथंघडला तिथं जाणं अगत्याचं आहे, प्रत्येक महाराष्ट्रीकाचं ते आद्य कर्तव्य आहे. पण तिथंजाताना तिथल्या इतिहासाची आपल्याला जाणीव हवी. नाहीतर आज तिथं दिसतीलढासळलेले बुरुज, माना टाकलेल्या कमानी, पडलेली तटबंदी अन ओहोरलेली टाकी. पण हीचती ठीकाणे जिथे इये देशीचे पुत्र ताठ मानेने वावरले आहेत. जगण्यातला अर्थत्यांच्या मरणाने आपल्याला मिळाला आहे. उत्तरेकडचे किल्ले धड उभे आहेत. त्यांच्यादगडादगडावर कोरीव काम आहे अन आतल्या भिंती, वाडे, दालने शाबुत आहेत. पण त्याचीकिंमत..? फ़ार भयानक किंमत देऊन हे सारं टिकवलं गेलं आहे! आपल्यामुलीबाळी परधर्मीय जुलमी सत्ताधिशांच्या घरी लोटाव्या लागल्या. नावांत सिंह अनकिताबाने राजे असणारे या किल्ल्याचे माल्क आपली धनदौलत, अब्रु आणि मुख्यम्हणजे स्वातंत्र्य त्या सत्तांध - धर्मांध सुलतानांकडे गहाण टाकुन आले होते. म्हणुन हे असे राहिले! शोकेसमध्ये ठेवलेल्या या नटव्या बाहुल्याच.
पण महाराष्ट्रातल्या या रांगड्या किल्ल्यांच तसं नाही. इथले भग्नावशेष हीच या किल्ल्यांची महावीर अन परमवीर चक्रंआहेत. ज्याला आपण दुषण देतो तीच त्यांची भुषणं आहेत. आपल्या लढाऊ परंपरेची ही जिवंत स्मारकं आहेत. अगदी १९१८ च्या शेवटच्या इंग्लिश-मराठे युध्दातही सिंहगड, वासोटा, रायगडचे किल्ले भांडवल केले गेले. त्यात त्यांच नुकसानझालं. एकावर एक दगड ठेवुन हे किल्ले बांधले नाही गेले. मानसांची मने त्यांशी जखडली गेली होती. हे सारं दुर होण्यासाठी डिकीन्सन आणि एतरांनी बुध्द्याच हे किल्ले ढासळवुन टाकावेत, किल्ल्यावर जाण्याचे मार्गच तोडावेत व स्वातंत्र्याची कारंजी मुळात नष्ट करावीत असे मनी धरुन मोहिम मांडुन हे उध्वस्तीकरण केले. काही प्रमाणात इंग्लिशांना त्यात यशही आले. पण घामाचा पाऊसपाडुन अन रक्ताचा सडा शिंपुन ही दुर्गपुष्पे इये देशी वाढवली गेली-टिकवली गेली हे विसरुन चालणार नाही !
अधिक फोटो येथे आहेत ..!
मुंबई, ता. २ - जुहूच्या जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलसमोर मध्यरात्रीच्या सुमारास नववर्ष स्वागतासाठी आलेल्या दोन तरूणींच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांनी ४० जणांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ....
विनयभंग झालेल्या तरूणी पुढे न आल्याने तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांना अखेर आज तक्रार नोंदवावी लागली. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या वृत्तपत्र प्रतिनिधींची या प्रकरणी मदत घेणार असून छायाचित्रांच्या आधारे आरोपींचा शोध लावणार आहोत अशी माहिती पोलिस आयुक्त धनंजय जाधव यांनी दिली.
नववर्ष स्वागतासाठी जुहूच्या जे डब्ल्यू मॅरिएट या पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्या जोडीदारांसोबत गेलेल्या दोन तरूणींचा रस्त्यावर चाळीसहून अधिक तरूणांच्या गटाने विनयभंग केल्याची घटना आज उघडकीस आली. नववर्षाच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास हा प्रकार घडत असताना वृत्तपत्राच्या छायाचित्रकारांनी तातडीने पोलिसांच्या लक्षात हा प्रकार आणून दिला होता. तेथे आलेल्या पोलिसांनी त्या तरूणांच्या गटाला हाकलवून लावले. नंतर या दोघींना पोलिसांनी जुहू पोलिस ठाण्यात आणले. मात्र या तरूणींनी कोणतीही तक्रार न दिल्याने कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र आज वृत्तपत्रात आलेल्या बातमीनंतर पोलिसांनी वृत्तपत्राचे छायाचित्रकार सतीश शंकर बाटे (३०) यांना फिर्यादी बनवून ४० जणांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
गेल्या वर्षी गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या अशाच प्रकारानंतर याठिकाणी तसेच शहरातील गर्दीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती असे, जाधव म्हणाले. अनिवासी भारतीय तरूणी असलेल्या या दोघींनी मद्यप्राशन केले होते, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
नवी दिल्ली, ता. २ - रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या दोन मुलांना, तरुणींची छेड काढल्याप्रकरणी जमावाने बेदम मारहाण केली. नव्या वर्षाच्या स्वागतादरम्यान ही घटना घडली. ....
लालूंचे दोन चिरंजीव तरुण आणि तेजपाल हे दोघेही पार्टीसाठी अशोका हॉटेलमध्ये गेले होते. तेथे त्यांनी तरुणींची छेड काढली. त्यानंतर ते कॅनॉट प्लेस भागात आले. तेथेही त्यांनी छेडछाड केली. तेथून ते पार्टीसाठी दिल्ली-हरियाना सीमेवरील चत्तरपूर येथे गेले. तेथून त्यांनी परतताना फार्म हाऊसवर पार्टी करणाऱ्या मुलींबाबत अनुदार उद्गार काढले. मात्र या वेळी त्यांना तरुणांच्या गटाने बेदम चोप दिला. त्यांच्याबरोबर असलेल्या सुरक्षारक्षकांनी या दोघांची ओळखही सांगितली नाही. जखमी अवस्थेतील तरुण आणि तेजपाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या सुरक्षारक्षकाने सर्व्हिस पिस्तूल हरवल्याची तक्रार दिली आहे.
1