समजा तुम्ही एखादा मस्त फोटो काढलाय किंवा एखादी सिच्युएशन दाखवणारा फोटो काढलाय आणि तुम्हाला तो इतरांना दाखवायचा आहे. साहजिकच तुम्ही मित्रांना तो एम्.एम्.एस. / एस.एम्.एस. कराल. मात्र तेच जर तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर टाकायचा असेल तर - साहजिकच तुम्ही तो ब्लु टुथ ने मशिनवर ट्रान्सफर कराल आणि मग ब्लॉग कराल. मात्र तुम्ही तुमच्या मोबाईलवरुनही [जी.पी.आर.एस - आवश्यक!] ब्लॉगिंग करु शकता हे आपणास माहित आहे का?
"
ब्लॉगर मोबाईल" ही सुविधा पुरवते.
तर, मोबाईल ब्लॉगिंग कसे कराल?१. ब्लॉगर ला लॉगिन करा.
२. "सेटींग्ज" टॅब मध्ये जाऊन "Email & Mobile" वर क्लिक करा.
३. त्या पेज वर "Mobile Devices" च्या समोर "Add mobile device' वर क्लिक करा आणि पॉप मध्ये आलेला कोड "go@blogger.com" वर मेल करा.
बाकीच्या पुढच्या स्टेप्स ब्लॉगर करेल.
अधिक माहिती पहा!
जर तुमचा मोबाईल
सोनी - एर्रिक्सनचा असेल तर, त्याच्या काही मॉडेल्स मध्ये ही सुविधा
इन-बिल्ट आहे. फक्त तुम्हाला त्याचे सेटींग्ज करावे लागतात.
ई-मेल ब्लॉगिंगमोबाईल पेक्षा ई-मेल ब्लॉगिंग सोपं आहे. म्हणजे तुम्हाला फक्त तो फोटो किंवा लिखान मेल करावं लागतं, बस्स एवढंच.
१. ब्लॉगर ला लॉगिन करा.
२. "सेटींग्ज" टॅब मध्ये जाऊन Email & Mobile" वर क्लिक करा.
३. "Email Posting Address" च्या समोरच्या बॉक्स मध्ये तुमचा मोबाईल ब्लॉगिंगसाठीचा शब्द टाका. म्हणजे तो एक पुर्ण ई-मेल एड्रेस तयार होईल.
उदा. bloggerID.NEWWORD@blogger.com
४. त्याच्या खाली असणार्या रेडिओ बटन्स पैकी:
Publish emails immediately - लागलीच प्रकाशित करण्यासाठी
Save emails as draft posts - पुन्हा प्रकाशित करण्यासाठी
Disabled - सेवा बंद करण्यासाठी
- जे योग्य असेल त्यावर क्लिक करा
५. आता तुम्ही या ई-मेल वरती पाठवेलेला मेल हा तुमची नविन ब्लॉग पोस्ट असेल!
....
अधिक माहिती - ब्लॉगरवर आहेच!
वर्डप्रेस मधुन ई-मेल ब्लॉगिंग करण्यासाठी:१. वर्डप्रेसला लॉगिन करा.
२. "Dashboard" वर क्लिक करुन "My Blogs" लिंक वर क्लिक करा.
३. तुमचे सारे रजिस्टर्ड ब्लॉग दिसतील. ज्याच्यासाठी ई-मेल ब्लॉगिंग सुरु करायचे आहे त्याच्यासमोर असणार्या "Post by Email" कॉलमधील "Enable" या बटनवर क्लिक करा.
४. तुमच्यासाठी एक खास - युनिक ई-मेल एड्रेस तयार होईल.
५. आता त्या ई-मेलवर पाठवलेले मेल्स - म्हणजे तुमची नविन पोस्ट
काही मुद्दे:ब्लॉगर च्या मोबाईल - ईमेल ब्लॉगिंग मध्ये तुम्हाल लेबल किंवा कॅटेगरी लिहिने, पोस्ट डीले - स्केड्युल करणे अशा गोष्टी करता येत नाहीत. मात्र वर्डप्रेस मध्ये तशी सोय आहे. वर्डप्रेसच्या
ई-मेल ब्लॉगिंग बाबत अधिक माहिती.
ब्लॉगिंगचा ई-मेल एड्रेस सिक्रेट ठेवा. तो कुणाला देऊ नका. नाही तर तुमच्या ब्लॉगवर कोणीही पोस्ट करु शकते!
चला तर... आता तुम्ही कधी ही ब्लॉगिंग करु शकता!