.... आजकाल दिवस जरा मोठे झालेत काय हो... जसा जसा परतायची वेळ जवळ येतेय... दिवस जातच नाही.... :( .. कदाचित परतायची ओढ जरा जास्तच लागलीय ... असो... ! आठ्वडा नेहमीप्रमाणेच कामात गेला....!
... हा ..... शनिवार मस्त लोळत काढला... इकडे टी.व्ही. वर भारतीय कार्यक्रमांचा जरा दुष्काळच आहे... त्यामुळे
तेलगु मधला "गजनि" लॅपटौपवरच बघितला.... काय बोलताहेत हे समजत नव्हतं , मात्र एकंदरीत स्टोरी समजण्यासाठी फार त्रास झाला नाही....मस्त वाटला सिनमा.... आता डायलौग्ज आणि गाणी यासाठी
अमिर दादांचा सिनमा बघायचा .. !
रविवारी मात्र आम्ही इकडे भल्या पहाटे ९.०० वा. उठुन अभ्यंगस्नान केले.... दोन मैतर लंडन वरुन आले होते.. त्यांना केंब्रिज - केंब्रिज खेळायचे होते - म्हणजे पहायचे होते.. गाडी काढली आणि सरळ केंब्रिज.. !
फेमस कौलेजेस आणि फोटोग्राफिनंतर ते
फित्सविलियम म्युझिअम पाहता - पाहता मस्त २-३ तास गेले.... मग थोडा वेळ सिनेवल्ड मध्ये गेम्स पाहण्यात घालवला... आणि
नान्डो'ज मध्ये मस्त चिकन वर ताव मारला.. [शाकाहारी लोकांनी कृपया - व्हेज बर्गर आणि फिंगर चिप्स असे वाचावे..!]...
बस्स.... बाकी काय... सातच्या आत घरात ...!
...भुंगा!