Categories

Aeroplanes

Aeroplanes

Monday, 15 November 2010

इंसाफ की कायदा व न्यायदेवता यांची कुचेष्टा?

आदरणीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन.डी. टीवी व "राखी का इंसाफ" मालिकेचे सर्व लोक. सर्वप्रथम मला एका प्रश्नाचं उत्तर द्या - "राखी का इंसाफ" ही मालिका आपल्या घरी - कुटुंबासह - पाहता का?


परवा टी.व्ही. वर कार्यक्रम चाळताना ही मालिका पाहण्याचे अहोभाग्य लाभले. काय ती बया... काय तिचे कपडे...काय ती भाषा अन् काय ती मालिका! एन्.डी.टी.व्ही. सारख्या चांगल्या चॅनलने स्वत:च्या व लोकांच्या आब्रुची अशी लख्तरं काढावीत - खरं नाही वाटलं! मला हेच कळत नाही - नवरा - बायको, प्रेमी-प्रेमिका यांसारखी नाती काय अशी चव्हाट्यावर डिस्कस करावीत ? हां, आता बर्‍यापैकी हा भाग एक पब्लिसिटी स्टंट असु शकेल, टी.आर.पी. वाढवण्याचे प्रयोगही असतील - नाही असं नाही. मात्र त्या भागातल्या एकांनं आत्महत्या करावी इतपत हे प्रकरण जावं ? तो भाग पाहताना त्यातील एकालाही अक्कल नावाचा प्रकार असल्याचे जाणवले नाही. म्हणे एका बाईने "मामा" विरुध्द बळजबरीची केस केलेली - त्यात तिचा नवरा साथ न देता म्हणे त्रास देत होता. त्यावर बाईसाहेबांची कमेंट - नामर्द - नपुंसक अशी होती. बिचारा - समाजात - पै-पाव्हण्यांत लाजं-काजं नाही जगु शकला - गेला!

ही लोकं - टी.व्ही. वर दिसणार या विचारांनच एवढी हुरळुन जातात की आपणच आपल्या आब्रुची लख्तरं काढतोय याचं जराही भान त्यांना नसतं. भांडणं आहे - अडचणी आहे तर पोलिसांत जा - न्यायालयात दाद मागा - असल्या भिकारड्या कार्यक्रमात कसं काय जाऊ शकता? एकमेकांना शिव्या देत - कुठला इंसाफ वाटला जातो तेच नाही कळत.

न्यायमुर्ती म्हणुन किमान तुम्ही पुर्ण पोषाखात तरी असावं.. भाषा स्वच्छ असावी. टीचभर कापडात आणि अकलेला पत्ताही नसलेल्या व्यक्तिकडुन स्वत:ची अक्कल गहान ठेवुन कसला इंसाफ मागताहात! स्वत:च्या लग्नाचा व लफड्यांचा मोजमाप नसणार्‍याने - प्रेम - संबंध - लग्न संस्था यांसारख्या विषयांवर काहीही बरळावं? वा रे वा!

आपापसांतील मत-भेद - भांडणावर आधारीत "आपकी कचेरी" नावाचा किरण बेदींचा कार्यक्रम यायचा/ येत असेल. बर्‍याचदा पाहिलाय. शांतपणे दोन्ही बाजुंची मतं ऐकुन विचारपुर्वक निकाल देणार्‍या बेदींबद्दल कमालीचा आदरही वाटायचा/ वाटतो.

वकिलांनी ही मालिका बंद करण्याची याचिका दिली तर बाईसाहेब म्हणतात - कदाचित मी त्यांच्या प्रोफेशन मध्ये आले तर म्हणुन वकिलांना असुरक्षितता वाटायला लागलीय!!
अरे वा! असा कुणीही उठ-सुठ वकिल अन् न्यायाधिश होतो काय? काय मस्त जोक मारतात ना, बाईसाहेब?

असो - आपण तर एन.डी.टी.व्ही. ब्लॉक केलाय. गटारीत पडण्यापेक्षा गटार बंद केलेली कधीही चांगली! तुमचं तुम्ही बगा!