Categories

Aeroplanes

Aeroplanes

Monday, 20 July 2009

स्व. राजीव गांधी पार्क [ कात्रज स्नेक पार्क ]

तसा प्लान पु. ल. देशपांडे गार्डन [याकोहामा] पाहण्याचा होता.... मात्र गेटवर पोहोचल्या नंतर समजलं की बागेची टायमिंग आहेत- सकाळी ८-११ आणि ४-६ असं काही [नक्की आठवत नाहीत]..... मग वळालो - पेशवे पार्क कडे, तर तिथंही टाइम - १-२ बंद..... आता एकच पर्याय होता - स्व. राजीव गांधी पार्क [ कात्रज स्नेक पार्क ]... आणि हा उघडा असतो याची मला पुर्ण खात्री होती!


.... छोकरीला बरोबर घेऊन हा पार्क पहिल्यांदाच बघितला... तसे बॅचलर असताना त्याच्या समोरच्याच सोसायटीत रहायचो.. त्यामुळे बर्‍याचदा तिकडेच पडिक असायचो आम्हीं. झाली या गोष्टीला आता जवळ - जवळ ६-७ वर्षे! असो.. साप बघितले - पुन्हा एकदा... पण कमी वाटले.. सुसर, मगर, कासव.. असेच काही....! आता पार्क बराच मोठा आणि मस्त बनवलाय... पांढरा वाघ, हत्ती, कोल्हा, लांडगा, अस्वल, निलगाय, हरिण, सांबर..... आणि बरेचसे प्राणी आहेत! यांची इंग्रजी नावं तिला सांगता सांगता मी माझे इंग्रजीचे दिवे पाजळत होतो!

चालतच सगळा पार्क फिरलो... जाताना छोकरी मस्त धावत पळत होती.. परतीला मात्र तिला उचलुन घ्यावं लागलं... बायको म्हणते - "तुझा अजुन एक ट्रेक झाला असं समज ;) " .... तसं आतमध्ये असलेल्या गाडीनेही - तिकिट काढुन - फिरता येतं!

बॅचलर असताना बर्‍याचदा आम्ही पाच-सहा मुलं या पार्क मध्ये उनाडक्या करायचो... म्हणजे कोपरे गाठुन बसलेल्या आणि चाळे करणार्‍या लव्ह - बर्डस् ना डिस्टर्ब करणे हाच हेतु असायचा. त्यापाठीमागे आमच्या प्रत्येकांची वेगवेगळी कारणं असायची.. काहींना वाटायचे .. साला आपल्याला जोपर्यंत गर्ल - फ्रेंड मिळत नाही... तो पर्यंत आपण अशांना डिवचायचे ... काहींजण उगाच मज्जा म्हणुन ... मी ही त्यांच्यातलाच एक.. पण मला वाटायचं [वाटतं] की हा पार्क [वा कुठलाही] चाळे करण्यासाठी असु नये.... येथे लहान - थोर - वयस्क लोकं येतात.. कीमान त्यांची तरी इज्जत राखा.... लहान मुलांच्या समोरच 'गुटर - गुं' चालायचं...! तेंव्हा स्कार्फ घालुन मुली स्वतःला सेफ करायच्या... तेच आजही आहे! पण बरंच कमी झालेलं दिसलं!


अधुन - मधुन पावसाच्या सरी येतच होत्या.. मात्र आम्ही ऐंजाय केला... ! सिंहगड रोडवरची पु. ल. देशपांडे गार्डन मस्त आहे असं ऐकलंय... बघु.. नेक्स्ट विकेंड!

मी.... ब्राउजर्स आणि इंटरेनेट एक्सप्लोरर ६!


तुम्ही कोणता ब्राउजर [वर्जन सहित] वापरता? फायरफॉक्स [३.५+]... आय.ई. [७ - ८]... सफारी [३+]... ओपेरा [९.५].. गुगल क्रोम [२.०]...फ्लॉक [२.५]... की आय. ई ६? तसा हा जरा टेक्निकल प्रश्न / मुद्दा आहे.. कारण, ब्राउजर अपडेट करणे किंवा आय.ई. सोडुन इतर कोणताही ब्राउजर आहे / वापरणे हे बर्‍याच लोकांना माहित नसते. म्हणजे सगळेच काय नेट सॅव्ही असतात असं नाही..! बरं काही लोकांना तर इंटरनेट म्हणजेच आय.ई. असं समिकरण माहित आहे! त्याचं कारण पण आहे. आय.ई. ने अनेक वर्षं ब्राउजर्सच्या दुनियेत राज्य केलं आहे. फार इतिहास सांगत नाही... पण जवळ-जवळ २००४ - २००५ पर्यंत जो पर्यत फायरफॉक्स ब्राउजर आला नव्हता तो पर्यंत तरी आय.ई. चीच चलती होती. तसा नेटस्केप, मोझिला हे होतेच... असो. सांगायचा मुद्दा हा आहे की, तुम्ही जर अजुनही आय.ई.६ वापरत असाल तर - इट्स टाइम टु स्विच टु न्यु वन!

आय.ई. ६ च्या नंतर आय.टी. [ब्राउजर्स टेक.] मध्ये बराच बदल झालाय.. तो अ‍ॅक्सेप्ट करणं आय.ई. ६ मध्ये बर्र्‍याच अंशी शक्य नाही.. त्यामुळं आय.ई.६ वायरस, सिक्युरीटी थ्रेट्स वगैरे साठी अधिकच प्रोन आहे. बर्‍याच वेबसाइटवर याबद्द्ल माहिती मिळेल. इव्हन, त्याचं आयुष्यही काही महिनेच राहीलंय! खाली लिंक्स देतोय, वाचुन बघा आणि आय.ई. ६ ला तिलांजली द्या!


नविन ब्राउजर्सची नावं वरती दिलीच आहेत... तुमच्या आवडीचा ब्राउजर डाउनलोड आणि इंस्टाल करा... तसा प्रत्यक ब्राउजरचा आपले - आपले प्लस - मायनस प्वांटस आहेत...!

तुम्ही जर आय.ई. वरतीच राहु इच्छित असाल तर किमान नविन वर्जन [७ किंवा ८] इंस्टाल करा!

मी तर फायरफॉक्स [३.५.१] च वापरतो... त्यासाठी बरीच कारणे आहेत.. जसं ओपन सोर्स... टॅब्स [आता आय.ई. आणि इतर ब्राउजर्स मध्येही आहेत].. फास्ट... सेक्युअर.... आणि अनेक कारणे!

सफारीचा एक खास वर्ग आहे... मॅक वाले... सध्या विंडोजसाठीही मिळतो म्हणे.. मस्त ब्राउजर आहे!

ओपेरा ही मस्त फास्ट ब्राउजर आहे.

आणि गुगल क्रोम तर काय सांगावे - त्याची "इनकाग्निटो" प्रायव्हेट ब्राउजिंग सुविधा मस्त आहे! मात्र सध्या ती फायरफॉक्स [३.५+] मध्येही आहे!!

फ्लॉक - एक सोशल ब्राउजर आहे.. त्यात ब्लौगिंग, सोशल नेटवर्किंग , फोटो - मिडिया मॅनेजमेंट, इ-मेल मॅनेजमेंट असे बरेच फिचर्स आहेत.

बर्‍याच वेबसाइट्सनी आय.ई. ६ ला मुठमाती दिली आहे.. जर युजर आय.ई. ६ वापरत असेल तर वेबसाइटवरती - अपडेट दाखवणारे मेसेज दाखवतात. असाच एक मेसेज माझ्या या ब्लौगवरतीही आहे.... तुम्ही जर आय.ई. ६ वापरत असाल तर तुम्हाला तो नक्किच बघायला मिळेल.... किंवा तुमच्या वापरात असलेल्या ब्राउजरचे नविन वर्जन असेल तर एक छोटासा मेसेज अगदी वरच्या हाताला - उजव्या बाजुला दिसेल!

असे काही अपडेटस - मेसेज जर तुम्हालाही तुमच्या वेबसाइट / ब्लौग वर - दाखवायचे असतील तर ही पोस्ट वाचा!

एवढं सगळं सांगण्यामागे अजुन एक कारण आहे - ते म्हणजे एक डेवलपर म्हणुन एखादी वेबसाइट / वेब प्रोजेक्ट आय.ई. ६ कंपॅटिबल करताना आमचे कसे !@#$%^&* होतात ते आम्हालाच माहिती आहे. इंटरेस्टिंगली आमच्या कार्पोरेट साइटचे २४% विजिटर्स आय.ई.६ वापरतात...आता बोला!
[ग्राफिक्सः ripie6 flickr]