Categories

Aeroplanes

Aeroplanes

Wednesday, 29 October 2008

दिवाळी - नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.....!!

.... हम्म्म्म्म्म्म ....ब-याच दिवसात काही लिहिणे झाले नाही.... जरा बीझी झालोय... काहीतरीच काय... थोडा आळशी झालोय म्हणा तर... !

... दिवाळी झाली .. मस्त साजरी केली असणार तुम्ही लोकांनी.... हा... माहितय मला... गेल्या वर्षीची घरची दिवाळी आठवतीय मला... या वर्षी पुण्याऐवजी केंब्रिजमध्ये दिवाळी साजरी केली... धुम-धडाक्या नाही... तीच आपली शांत - दिवे लावुन... फटाके मिळाले... मात्र उडवायची पंचाईत... औफिसमधुन माहिती काढली तर समजले की नाही उडवलेले चांगले... उगाचच शेजारच्यांची झोप मोड करणे बरे नाही... काय सांगावे - एखाद्याने तक्रार केली तर आपली दिवाळी सासरच्या लोकांबरोबर - पोलिसांबरोबर - व्हायची ... :)

सकाळी लवकर उठुन तयार झालो... दिवे लावले... मित्र-मंडळी आणि नातेवाईकांना फोन करुन शुभेच्छांची देवाण-घेवाण झाली.... दिवाळी संपली... आणि .. चला कामावर....!

असो... तुम्हा सर्वांना ही दिवाळी अतिशय म्हणजे फारच - खुप - आनंदाची आणि भरभराटीची जाओ... नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.....!!


पुन्हा भेटुच.....

...भुंगा!