Categories

Aeroplanes

Aeroplanes

Wednesday, 9 September 2009

गुगल एनालॅटिक्स: तुमच्या विजिटर्संना ओळखा!

गुगलची एनालॅटिक्स ही सुविधा तुम्हाला तुमच्या विजिटर्स बद्दल सारी माहीती देते, म्हणजे, तुमच्या ब्लॉग/ साइटवर रोज/ आठवडयात/ महिन्यात कीती लोक आले - कुठुन आले, काय शोधुन आले, कोणत्या सर्च इंजिन मधुन किंवा ब्लॉग/साइटवरुन आले, ते कोणती ओ.एस. किंवा ब्राऊजर वापरता... आणि अशी बरीच माहिती. प्रोफेशन ब्लॉगर्स ही माहिती गोळा करुन आपली पोस्ट/ लेख लिहितात.



तर, तुम्ही ही सुविधा कशी वापराल?

१. गुगल एनालॅटिक्सला - जीमेलच्या लॉगिन - पासवर्डने लॉगिन करा.
२. ही अशी स्क्रीन दिसेल. साइनअप क्लिक करुन पुढे जा
३. आता या स्क्रीनवर तुमच्या ब्लॉगची माहीती भरा आणि कंटीन्यु क्लिक करा.
४. पुन्हा तुमचे डिटेल्स भरा आणि कंटीन्यु क्लिक करा.
५. "Yes, I agree to the above terms and conditions. " पुढे चेक करा आणि "Create new account" क्लिक करा.
६. या स्क्रीनवरुन बॉक्समध्ये दिसणारा कोड कॉपी करा आणि नंतर "Finish" क्लिक करा.
आता, ब्लॉगरला लॉगिन करा.
१. "Layout" टॅब वरुन "Edit HTML" वर क्लिक करा.
२. या पानांवरचा कोड स्क्रोल करुन शेवटी जा व जिथे
</body>
दिसेल त्याच्या लगेच वरती... वरच्या स्टेप मध्ये कॉपी केलेला कोड पेस्ट करा.
३. आता सेव करा. झालं.

यानंतर पुन्हा
१. गुगल एनालॅटिक्सला - जीमेलच्या लॉगिन - पासवर्डने लॉगिन करा.
२. ही अशी स्क्रीन दिसेल.
३. "View report" वर क्लिक करा आणि आता तुम्हाला रीपोर्ट दिसेल.
४. हा पहा सॅपल रेपोर्ट.

आता या पानावर थोडं इकडं तिकडं क्लिक करुन पहा - म्हणजे तुम्हाला कळेल की विजिटर कोठुन आले... काय सर्च करुन आले... कोणत्या साइट वरुन आले.. वगैरे - वगैरे!
वर्डप्रेसच्या फ्री होस्टेड सर्विसमध्ये हा कोड टाकता येणार नाही... मात्र तुमचा स्वहोस्टेड ब्लॉग/ साइट असेल तर मात्र तो कोड याच स्टेप्स वरुन वापरता येईल.

गुगल एनालॅटीक्स माझ्या माहितीनुसार तुम्हाला हिट - स्टॅट काऊंटर देत नाही... मला वाटतं जर हिटकाऊंटर ५००००+ नसेल तर तो दाखवण्यात काही तथ्य नाही. उगाचच ब्लॉगचे इंप्रेशन खराब होतं!

मात्र जर तुम्हाला हीट काऊंटर दाखवायचाच असेल तर स्टॅट काऊंटर, वेबमास्टरएप्स म्हणुन वेबसाइट आहे.. त्यावर रजिस्टर करा ... प्रोसेस सोपी आहे. तो कोड तुम्हाला ब्लोगरच्या गॅजेट मध्ये टाकुन ते दाखवता येईल!

तुमचे प्रश्न - कमेंट्स?

रायरेश्वर - केंजळगडच्या आठवणी...

दैनंदिनी: ९ सप्टें. २००९

दोन वर्षांपुर्वी याच महिन्यात रायरेश्वर आणि केंजळगडचे ट्रेक केले होते. पंकजच्या रायरेश्वरची पोस्ट वाचुन रायरेश्वरची आठवण झाली...! रायरेश्वरच्या आठवणी जाग्या केल्यास.... आमचा ट्रेकही मस्त झाला होता... मात्र पायवाटेने पुर्ण राउंड मारायच्या ऐवजी आम्ही मधुनच वर चढलो आणि सोपा ट्रेक अवघड करुन टाकला होता. रायरेश्वर, खरंच स्वर्गाची अनुभुती देणारा आहे.. आता स्वर्ग पाहिलाय कुणी, पण ठामपणे सांगावे वाटते - यापेक्षा सुंदर नसावाच.

शिवाय केंजळगडचा बुलेट ट्रेकही भन्नाट झाला होता. तो वरती बोर्ड आहे ना, तिथंपर्यंत मी बुलेट चढवली होती... हा हा..! आणि हो - या बुलेट ट्रेक ची स्टोरी "रॉयल इनफिल्ड" च्या वेबसाइट ला सबमिट केली होती. त्यांनी ती प्रकाशित केली आणि मला "रॉयल इनफिल्ड" टी शर्टही मिळाला!! त्यामुळे केंजळगड चा ट्रेक खास महत्वाचा!
आज ०९/०९/०९ आहे... सकाळी ०९.०९ पहायचे राहिले.. म्हणुन रात्रीचे ०९.०९ चा आलाराम[!] लाऊन वेळेची आठवण केली!


उद्या - गुगलच्या एनालॅटिक्स वर लिहितोय... तेंव्हा ती पोस्ट जरुर वाचा...

जाता - जाता:
बर्‍याचदा मी विजिटर्सना, मराठी ब्लॉग्जवरती इंग्रजीतुन किंवा इंग्रजीमिश्रित मराठीतुन कमेंटस देताना पाहतो. आता प्रत्येकाकडे मराठीसाठी दुसर्‍या साइटवर [गुगल इंडिक - गमभन] जाऊन लिहिण्याचा वेळ नसतो. अशांनी कॄपया ही - "कोणत्याही वेबसाईट्वर भारतीय भाषेत लिहा" पोस्ट वाचुन त्यावर झटपट तोडगा करावा!

चला, उद्या भेटुच! शुभ रात्री!