गुगलची एनालॅटिक्स ही सुविधा तुम्हाला तुमच्या विजिटर्स बद्दल सारी माहीती देते, म्हणजे, तुमच्या ब्लॉग/ साइटवर रोज/ आठवडयात/ महिन्यात कीती लोक आले - कुठुन आले, काय शोधुन आले, कोणत्या सर्च इंजिन मधुन किंवा ब्लॉग/साइटवरुन आले, ते कोणती ओ.एस. किंवा ब्राऊजर वापरता... आणि अशी बरीच माहिती. प्रोफेशन ब्लॉगर्स ही माहिती गोळा करुन आपली पोस्ट/ लेख लिहितात.
तर, तुम्ही ही सुविधा कशी वापराल?
१. गुगल एनालॅटिक्सला - जीमेलच्या लॉगिन - पासवर्डने लॉगिन करा.
२. ही अशी स्क्रीन दिसेल. साइनअप क्लिक करुन पुढे जा
३. आता या स्क्रीनवर तुमच्या ब्लॉगची माहीती भरा आणि कंटीन्यु क्लिक करा.
४. पुन्हा तुमचे डिटेल्स भरा आणि कंटीन्यु क्लिक करा.
५. "Yes, I agree to the above terms and conditions. " पुढे चेक करा आणि "Create new account" क्लिक करा.
६. या स्क्रीनवरुन बॉक्समध्ये दिसणारा कोड कॉपी करा आणि नंतर "Finish" क्लिक करा.
आता, ब्लॉगरला लॉगिन करा.
१. "Layout" टॅब वरुन "Edit HTML" वर क्लिक करा.
२. या पानांवरचा कोड स्क्रोल करुन शेवटी जा व जिथे
</body>दिसेल त्याच्या लगेच वरती... वरच्या स्टेप मध्ये कॉपी केलेला कोड पेस्ट करा.
३. आता सेव करा. झालं.
यानंतर पुन्हा
१. गुगल एनालॅटिक्सला - जीमेलच्या लॉगिन - पासवर्डने लॉगिन करा.
२. ही अशी स्क्रीन दिसेल.
३. "View report" वर क्लिक करा आणि आता तुम्हाला रीपोर्ट दिसेल.
४. हा पहा सॅपल रेपोर्ट.
आता या पानावर थोडं इकडं तिकडं क्लिक करुन पहा - म्हणजे तुम्हाला कळेल की विजिटर कोठुन आले... काय सर्च करुन आले... कोणत्या साइट वरुन आले.. वगैरे - वगैरे!
वर्डप्रेसच्या फ्री होस्टेड सर्विसमध्ये हा कोड टाकता येणार नाही... मात्र तुमचा स्वहोस्टेड ब्लॉग/ साइट असेल तर मात्र तो कोड याच स्टेप्स वरुन वापरता येईल.
गुगल एनालॅटीक्स माझ्या माहितीनुसार तुम्हाला हिट - स्टॅट काऊंटर देत नाही... मला वाटतं जर हिटकाऊंटर ५००००+ नसेल तर तो दाखवण्यात काही तथ्य नाही. उगाचच ब्लॉगचे इंप्रेशन खराब होतं!
मात्र जर तुम्हाला हीट काऊंटर दाखवायचाच असेल तर स्टॅट काऊंटर, वेबमास्टरएप्स म्हणुन वेबसाइट आहे.. त्यावर रजिस्टर करा ... प्रोसेस सोपी आहे. तो कोड तुम्हाला ब्लोगरच्या गॅजेट मध्ये टाकुन ते दाखवता येईल!
तुमचे प्रश्न - कमेंट्स?
15 comments:
दिपक
या वर्डप्रेस मधे काहिच करता येत नाही. साधं टेम्प्लेटपण बदलता येत नाही. वर्डप्रेस साईटला दिलेल्या ३०-४० पैकी एक वापरावं लागतं. त्यामुळे ब्लॉगच्या सौंदर्यीकरण करता येत नाही.
@महेंद्रजी,
खरंय, म्हणुनच मी लागलीच ब्लॉगरवर शिप्ट झालो होतो!
'गुगलची एनालॅटिक्स' .. मस्त रे ... अश्या पोस्ट वाचून खुप माहिती मिळते... आणि ही पोस्ट वाचून तूच 'प्रोफेशनल ब्लॉगर' झाला आहेस असे वाटते आहे. :D
धन्यवाद
छान माहिती
मी लागलीच ADD केले आहे
धन्यवाद !!!! झकास पोस्ट आहे !!!
गुगल एनालॅटिक्सवर रजिस्टर केल्यानंतरचा रिपोर्ट पाहायला मिळेल. रजिस्टर करण्यापूर्वीचा रिपोर्ट नसेल. म्हणजेच जो कोणी रजिस्टर करेल त्याला प्रथमदर्शनी रिपोर्ट NILL दिसेल. बरोबर?
वा, छान माहिती आहे , अशा ब्लॉगचा खुपच फायदा होतो. धन्यवाद !
इट्स ओके दिपक भाऊ, थॅंक यू फॉर गिव्हिंग धिस व्हॅल्युएबल इन्फो.....
आवडली, पण मी अल्रे्डी http://www.geovisite.com/en/ येथील एक विझेट जोडलयं.... त्यामध्ये सर्वात खाली एक आडवी बार येते मोझिला अन आय.इ. वर... आणि त्यात डेलि स्टॅट, आय.पी ऍड्रेस, ओ.एस., ब्राउजर, ऑनलाइन, आणि इतर खुप माहिती दिसते...
एक वेळ बघा भेट देऊन... www.vishaltelangre.tk
@सिध्दार्थ,
हो बरोबर. जेंव्हा तुम्ही या सर्विससाठी रजिस्टर करता आणि तो कोड तुमच्या ब्लॉग मध्ये टाकता, तेंव्हापासुन ट्रॅकिंग सुरु होते. अंदाजे एक दिवसानंतर तुम्हाला तुमच्या रिपोर्ट मध्ये सगळे डिटेल्स दिसु लागतात.
@मनमौजी, नरेंद्र प्रभु, विशाल.
आपल्याला पोस्ट वाचुन मदत झाले - आनंद वाटला.
आभार!
@ विशाल,
ब्लॉग बघितला. चांगला आहे. मात्र या पोस्ट मध्ये म्ह्टल्याप्रमाणे जरा जास्तच "भरगच्च" वाटतोय! ब्लॉगचे डिझाइन साधे सोपे - वाचण्यास सरळ असावे. अनावश्यक गॅजेट्स - विजेट्स विजिटर्सना इरीटेट करतात.
नमस्कार दीपक भाऊ तुम्हाला अस नाही वाटत कि गुगल हे एक हेकर चे काम करत आहे...
आपल्या विजिटर्स ची सम्पूर्णपने माहिती देतो म्हणजे काही तरी गड़बड़ असेलच ना..
मी गूगलचा रिपोर्ट बघितला.तो आपल्याला स्क्रीन रिजोल्यूशन पण सांगतो... हे म्हणजे फारच झाल..
@मंदार,
फक्त स्क्रीन रीझॉल्युशनच नाही, अजुनही बरीच माहिती तुम्हाला मिळते! आता हे हॅकिंग आहे किंवा नाही, हे सांगणं माझ्यासाठीतरी कठीण आहे. कीती लोक गुगल ची कोणतीही [अगदी जीमेल पासुन ब्लॉगर पर्यंत!] सर्विस वापरताना त्यांच्या टर्मस् आणि कंडिशनवाचतात? त्यात अशा प्रकारच्या ट्रॅकिंगबद्दल [हॅकिंग नव्हे!] लिहिलंच आहे! शिवाय, तुम्ही याच कॅटेगरीतला कोणताही सर्विस देणारा बघितला तर तोही हेच करतो.
एक साधं उदाहरण देतो - बर्याचदा वेब डेव्हलपर्स, क्लायंटच्या मशिनचे स्क्रीन रीझॉल्युशनच चेक करुन त्याप्रमाणे डिझाइन लोड करण्यासाठी कोड लिहितात. म्हणजे तुमची स्क्रीन १२८० असेल तर त्या साइजचे ग्राफिक्स किंवा डिझाइन आप्लाय करणे, वगैरे वगैरे! आता हे काही हॅकिंग नव्हे!
बरेच दिवस ठरवलं होतं शेवटि आज ही सुविधा टाकुन पाहिली आहे. छान माहिती आहे. स्वतः हे सर्व शोधण्याचे कष्ट या ब्लॉगमुळे वाचलेत. त्यामुळे प्रचंड धन्यवाद. keep it up...
@अपर्णा,
गुगल एनलॅटिक्समुळे आपणास आपल्या विजिटर्स बद्द्ल माहिती मिळते, जिच्याआधारे आपण त्यांचा कल - आवड - निवड जाणुन घेऊ शकतो. आपणास ही माहिती उपयोगी पडली, आनंद आहे!
भुंगा,
खरंतर बराच मोठा इमेल टाइप केला होता. मात्र 'मी माझा'वरून तो जात नाहीये.. प्रथमच इकडे प्रतिक्रिया देतोय.. माझ्या नव्या ब्लॉगची अर्ध्याहून अधिक बांधणी ही भुंगावरील माहितीवरून झालीये.. त्यामुळे सध्या तरी खूप खूप धन्यवाद इतकंच म्हणेन इथे.. बाकी अजून खूप काही बोलायचंय..भेटतच राहू यापुढे.. लगे रहो..
आपल्या ब्लॉगचा चाहता,
http://full2dilse.blogspot.com/
Post a Comment