च्यायला [...शिवी असो वा नसो!].... वैताग आलाय नुसता.... नाही तर काय? किती दिवस झाले, एखादी पोस्ट लिहिन म्हणतोय.. पण कामाच्या *** घो! हो.. तुम्ही म्हणाल आता पोस्ट लिहायला तसा किती वेळ लागतो.. खरंय हो.. पण 'कंटाळा' नावाचाही एक प्रकार असतो... सगळ्यांकडेच.. कमी - जास्त प्रमाणात!
हां.. तर काय म्हणत होतो... ते - चेपेन - चेपेन.... आता हेच बघा ना:
काल त्या महान आय.सी.आय.सी.आय. बँकेने ई.सी.एस. न क्लिअर झाल्याने २७६ रु. [२५० + टॅक्स]चा चुना लावला. पण २५० रु. दंड जरा[?] जास्तच नाही का होत... आम्ही काय मुद्दामुन असं करतो काय?. तिकडे एच.डी.एफ.सी. ने ही १००रु. जास्त लावुन ई.एम्.आय. घेतला. लाईट-बिल चे "ऑटो - पे" मधेच उद्भवलं आणि होम-लोनच्या ई.सी.एस.ला काही रुपये कमी पडले. कदाचित वरती जेवढा दंड भरावा लागला ना.. तेवढेच असतील. च्यायला... चेपा - चेपा!
मार्च एंड आहे... जरां बँकानीही समजुन घ्यायला पाहिजे नां... पण असं कसं... बँक काय आमच्या 'बा'ची नाही... झालं... दंड भरला... शिवाय आता 'क्रेडीट हिस्टरी'वर ही ठपका लावला असेल या महान लोकांनी! चेपा - चेपा!
आणि आज सकाळी.. सोलापुर रोडवरुन एक महाशय - आपल्या टुकार [हो.. टुकारच.. नाहीतर काय एच.डी. म्हणु?] बाईकवर बायको आणि पुढं पोरगा बसवुन मस्त - सायकल ट्रॅक वरुन निघाले. पुढच्या चौकात मी डाव्या बाजुला - इंडिकेटर लावुन - वळत होतो - तर हे साहेब सरळ जाण्यासाठी अगदी समोर च आले. मीच थांबलो.. म्हटलं उगाच चिरडायला नको... तर हे अतिशहाणे - माझ्याकडेच अगदी खुन्नस खाऊन बघु लागले... बापरे... मी तर जाम घाबरलो... याचे डोळे फुटले - बिटले तर!! एक तर काडी पैलवान.. च्यायला एक ठोसा दिला तर होत्याचा नव्हता व्हायचा.. मागे बायको असली की अशांना जरा जास्तच जोर येतो... त्यात 'वहिणीसाहेब' तर दुर गेल्यावरही मोठे डोळे करुन अगदी 'प्रेमाणे' पहात होत्या... जणु म्हणतच होत्या - चेपा - चेपा!
अहो, महाराणी सायबा, जरा आपल्या सायबांनाच सांगा - "कारभारी दमानं..." एक तर बिगर हेल्मेट... त्यात सायकल ट्रॅक वरुन.. आणि त्यातल्या त्यात - डावीकडे वळणार्या वाहणांना न पाहता जणु सारे - सरळच निघालेत या तोर्यात निघालेत! मी आपला उगाचच स्वतःला समजावत होतो - "मामु... शांत! अंदर के शैतान को मत जगाव.. शांत बुलेटधारी... शांत...!"
हे एकच नाही... असे बरेच किस्से रोजच पाहतो... काही वेळा तर अगदी पॅरलल गाडी चालवत जाणारे यार - दोस्तही दिसतात. असे हे लोक... पण एक आहे... असे लोक त्यांच्या मित्रांमध्ये आवडते असतात... मलाही आवडतात... काही दिवसांनी ते इतरांचेही आवडते होतात.... आणि मग शेवटी 'देवाचेही आवडते' होतात.... आमच्यासारखे फक्त नाममात्र - कारणमात्र होतात!
स्वाहा!