पोस्ट किंवा एखादे आर्टिकल लिहिताना ब्लॉगर्सना गरज पडते ती संबधित फोटो किंवा इमेजची. शिवाय फोटोसहित लिहिलेली पोस्ट दिसायला आणि वाचायलाही छान असते! असा फोटो नेटवर शोधणे तसं फार अवघड नाही, मात्र बर्याचदा कॉपी-राइट च्या प्रकरणात गुंतण्याची शक्यता असते. तसं भारतामध्ये ही प्रकरणं तशी "किरकोळ" जरी समजण्यात येत असली तरी हा फार मोठा इश्शु आहे - होऊ शकतो. तर यावर "झिमॅटा" नावाची वेबसाइट - फायरफॉक्स प्लगिन आपल्या फार उपयोगी पडतं. कसं ते
या डेमो मध्ये पहा!
तुम्ही जर फायरफॉक्सचे युजर [मी तर फॅन आहे!] असाल तर फायरफॉक्सचे हे प्लगिन इंस्टाल करा. तुमचा ग्राफिक्सचा प्रश्न सुटलाच म्हणुन समजा!
कसे वापरावे:एकदा झिमँटा इंस्टाल झाले की तुम्ही ब्लॉगर किंवा वर्डप्रेस ला लॉगिन करा. पोस्ट लिहिण्याच्या उजव्या बाजुला ते दिसेल. तुम्ही काही पोस्ट संबंधित ओळी लिहिल्या की ते तुम्हाला संबंधित ग्राफिक्स आणि लिंक्सही दाखवेल. संबधित इमेजवर क्लिक केलं की ती इमेज तुमच्या पोस्ट मध्ये जाईल.. सोप्प ना! झिमँटा हे, विकि - फ्लिकर्, नेट वरच्या कॉपी राइट्स फ्री - इमेजेस दाखवतं म्हणजे आपण त्या वापरायला मोकळे. आता तुम्ही मराठी किंवा हिंदीत लिहित असाल तर संबधित ग्राफिक्ससाठी काही शब्द/ ओळी इंग्रजीत लिहा म्हणजे तुम्हाला योग्य ग्राफिक्स सापडेल. नंतर पब्लिश करण्याआधी ते शब्द / ओळी डीलीट करायला विसरु नका!
आता, ग्राफिक्स डाव्या [डिफॉल्ड सेटींग] बाजुला जातात.. ते तुम्ही उजव्या बाजुलाही सेट करु शकता. पोस्टच्या खाली - रीब्लॉगचे बटन येते. ते तुमच्या विजिटर्सनी पुन्हा ती पोस्ट पब्लिश करण्यासाठी मदत करतं. तुम्हाला ते नको असेल तर HTML टॅब मध्ये जाउन तो कोड डिलिट करा.
शिवाय तुमच्या पोस्टशी निगडीत काही इतर पोस्टच्या लिंकही त्या ग्राफिक्सच्या खाली दिसतात. त्यावर क्लिक केलं की ती लिंक तुमच्या पोस्ट मध्ये टाकली जाते. तसेच पोस्टमध्ये वापरलेले शब्द आपण लेबल्स म्हणुनही क्लिक करुन टाकू शकता.
हे प्लगिन जवळ - जवळ सर्व ब्राउजर्स [फायरफॉक्स, आय.ई वगैरे] आणि ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मसाठी [ब्लॉगर, वर्डप्रेस वगैरे] आहे. आणि हो! हेच प्लगिन मेल [जीमेल किंवा याहु] साठीही चालतं!
सही ना?
हुम्म..! तर, आशा आहे आपणांस हे वाचुन ब्लॉगिंगसाठी मदत होईल. चला तर मग - लागा तयारीला! शिवाय तुम्हाला एखादी माहिती हवी असेल तर सांगा - हॅपी टु हेल्प!