पोस्ट किंवा एखादे आर्टिकल लिहिताना ब्लॉगर्सना गरज पडते ती संबधित फोटो किंवा इमेजची. शिवाय फोटोसहित लिहिलेली पोस्ट दिसायला आणि वाचायलाही छान असते! असा फोटो नेटवर शोधणे तसं फार अवघड नाही, मात्र बर्याचदा कॉपी-राइट च्या प्रकरणात गुंतण्याची शक्यता असते. तसं भारतामध्ये ही प्रकरणं तशी "किरकोळ" जरी समजण्यात येत असली तरी हा फार मोठा इश्शु आहे - होऊ शकतो. तर यावर "झिमॅटा" नावाची वेबसाइट - फायरफॉक्स प्लगिन आपल्या फार उपयोगी पडतं. कसं ते या डेमो मध्ये पहा!
तुम्ही जर फायरफॉक्सचे युजर [मी तर फॅन आहे!] असाल तर फायरफॉक्सचे हे प्लगिन इंस्टाल करा. तुमचा ग्राफिक्सचा प्रश्न सुटलाच म्हणुन समजा!
कसे वापरावे:
एकदा झिमँटा इंस्टाल झाले की तुम्ही ब्लॉगर किंवा वर्डप्रेस ला लॉगिन करा. पोस्ट लिहिण्याच्या उजव्या बाजुला ते दिसेल. तुम्ही काही पोस्ट संबंधित ओळी लिहिल्या की ते तुम्हाला संबंधित ग्राफिक्स आणि लिंक्सही दाखवेल. संबधित इमेजवर क्लिक केलं की ती इमेज तुमच्या पोस्ट मध्ये जाईल.. सोप्प ना! झिमँटा हे, विकि - फ्लिकर्, नेट वरच्या कॉपी राइट्स फ्री - इमेजेस दाखवतं म्हणजे आपण त्या वापरायला मोकळे. आता तुम्ही मराठी किंवा हिंदीत लिहित असाल तर संबधित ग्राफिक्ससाठी काही शब्द/ ओळी इंग्रजीत लिहा म्हणजे तुम्हाला योग्य ग्राफिक्स सापडेल. नंतर पब्लिश करण्याआधी ते शब्द / ओळी डीलीट करायला विसरु नका!
आता, ग्राफिक्स डाव्या [डिफॉल्ड सेटींग] बाजुला जातात.. ते तुम्ही उजव्या बाजुलाही सेट करु शकता. पोस्टच्या खाली - रीब्लॉगचे बटन येते. ते तुमच्या विजिटर्सनी पुन्हा ती पोस्ट पब्लिश करण्यासाठी मदत करतं. तुम्हाला ते नको असेल तर HTML टॅब मध्ये जाउन तो कोड डिलिट करा.
शिवाय तुमच्या पोस्टशी निगडीत काही इतर पोस्टच्या लिंकही त्या ग्राफिक्सच्या खाली दिसतात. त्यावर क्लिक केलं की ती लिंक तुमच्या पोस्ट मध्ये टाकली जाते. तसेच पोस्टमध्ये वापरलेले शब्द आपण लेबल्स म्हणुनही क्लिक करुन टाकू शकता. हे प्लगिन जवळ - जवळ सर्व ब्राउजर्स [फायरफॉक्स, आय.ई वगैरे] आणि ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मसाठी [ब्लॉगर, वर्डप्रेस वगैरे] आहे. आणि हो! हेच प्लगिन मेल [जीमेल किंवा याहु] साठीही चालतं! सही ना?
हुम्म..! तर, आशा आहे आपणांस हे वाचुन ब्लॉगिंगसाठी मदत होईल. चला तर मग - लागा तयारीला! शिवाय तुम्हाला एखादी माहिती हवी असेल तर सांगा - हॅपी टु हेल्प!
11 comments:
मस्त रे.. पते की बात बतायी दोस्त.. वापरुन बघतो
अरे वा! नक्कीच पाहिन. मला आवडते पोस्ट बरोबर एखादा फोटो किंवा स्वत:चे रेखाटन टाकायला. पण चित्र तितक्या वेगाने काढता येत नाहीत मग नाईलाज होतो. आता झिमॆटा वर जाऊन पाहिन. धन्यवाद.
अवांतर: महेंद्रच्या ब्लॊगवर माझ्या ब्लॊगचे बनविलेले विजेट चांगले आहे.:)
@अनिकेत, @ भानस,
झिमँटा मुळे कॉपी - राईट फ्री ग्राफिक्स / लिंक्स शोधणे आणि आपल्या ब्लॉगमध्ये टाकणे अगदी सोपं होतं... !
@भानसः ब्लॉग विजेट - आपण चांगले म्हटलात - विजेट सफल झाले!
प्रतिक्रियेबद्दल आभार!
@विक्रम,
हा एरर मेसेज, आपण झिमँटा इंस्टॉल केल्या नंतर येतोय की त्याशिवाय येतो हे नाही सांगितलं. कदाचित आपण जो HTML कोड पोस्टमध्ये लिहिला आहे तो चुकीचा असावा, त्यामुळेच असा मेसेज येऊ शकतो. आपण पोस्ट मध्ये काय कोड टाकला होता ते सांगाल का?
या आधी हि एकदा हि अडचण आली होती परंतु नन्तर नाही आली
आता हे इंस्टाल केल्यावर सारखी अडचण येत आहे
परंतु हे कशामुळे होत असावे ?
आणि मी कोणताही कोड पोस्ट मध्ये टाकला नाही
@विक्रम,
म्हणजे "मराठी ब्लॉग्ज" ची विजेटची तर एरर नाही? ते विजेट काही वेळ काढुन - कोड आधी नोटपॅड मध्ये सेव करा - तो पुन्हा वापरता येईल. आणि आता एक नविन पोस्ट लिहुन बघा. एरर येत नसेल तर प्रोब्लेम "मराठी ब्लॉग्ज" च्या इमेज विजेटमध्ये असु शकतो.
महत्त्वाचे - जर आपण झिमॅटा वापरत असाल तर - "मराठी ब्लॉग्ज" वर आपली पोस्ट दिसण्यास अडचण येऊ शकते. कारण "मराठी ब्लॉग्ज" वर फक्त आपल्य पोस्ट मधुन सुरुवातीचे शब्द घेतले जातात. मात्र ते शब्द "कोड" असेल तर ती पोस्ट वगळली जाते!!!
पर्याय - पोस्टच्या HTML टॅब मध्ये जाऊन झिमँटा ने टाकलेला कोड - अगदी पहिला
"डिव" ते शेवटचा "डिव" हा कोड कट करुन तो पहिल्या काही - मराठी ओळी सोडुन पेस्ट करा. म्हणजे - आपले ग्राफिक्स - इमेज पोस्ट मध्ये राहिलचा आणि "मराठी ब्लॉग्ज" वर आपले लिखाणही दिसेल.
मी त्यांनतर झिमॅटा चा वापर ना करता हि पोस्ट टाकण्याचा प्रयत्न केला परंतु झाले नाही
marathi widget ला अडचण असती तर बाकीचे पोस्ट झालेच नसते ना ?
@विक्रम,
म्हणजे - प्रॉब्लेम झिमॅटा किंवा मराठे ब्लॉग्ज विजेट नाही! आपण काही सेटींग्ज चेंज केलेत का? किंवा टेंप्लेट चेंज वगैरे?
कदाचित आपण नविन टेंप्लेट वापरुन बघा. कदाचित या टेंप्लेटच्या कोड मध्ये काही अडचण असु शकते. जर नविन टेंप्लेट चालले तर नंतर आपण आपले जुने टेंप्लेट पुन्हा टाकु शकता.
बर मी पाहतो
अजून एक मला जर तुमचा ब्लोग माझ्या ब्लोग वर आवडता ब्लोग म्हणून नोद्वायचा असेलतर तो नोंदवावा ?
नाही जमले बहुतेक
माझा ब्लॉग बघा म्हणजे समजेल तुम्हाला
तुम्ही gtak वर आहात का ?
@विक्रम,
काही वेळासाठी मी ऑनलाइन आहे!
ID: mebhunga[at]gmail.com
Post a Comment