Categories

Aeroplanes

Aeroplanes

Thursday, 3 January 2008

धन्य त्या नामर्दांची मर्दानगी ...!

नविन वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबई - जुहु - प्रकरणाने आपल्या बिघडत चाललेल्या संस्कॄतीचे उदाहरण दिले... [ दारु पिऊन ?] दोन महिलांचा विनयभंग करणा-या सुमारे ४० जणांविरुद्ध अखेर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला... सकाळच्या बातमीनुसार:
जुहू येथील विनयभंगप्रकरणी ४० जणांच्याविरोधात गुन्हा - पोलिस आयुक्त

मुंबई, ता. २ - जुहूच्या जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलसमोर मध्यरात्रीच्या सुमारास नववर्ष स्वागतासाठी आलेल्या दोन तरूणींच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांनी ४० जणांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ....
विनयभंग झालेल्या तरूणी पुढे न आल्याने तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांना अखेर आज तक्रार नोंदवावी लागली. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या वृत्तपत्र प्रतिनिधींची या प्रकरणी मदत घेणार असून छायाचित्रांच्या आधारे आरोपींचा शोध लावणार आहोत अशी माहिती पोलिस आयुक्त धनंजय जाधव यांनी दिली.

नववर्ष स्वागतासाठी जुहूच्या जे डब्ल्यू मॅरिएट या पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्या जोडीदारांसोबत गेलेल्या दोन तरूणींचा रस्त्यावर चाळीसहून अधिक तरूणांच्या गटाने विनयभंग केल्याची घटना आज उघडकीस आली. नववर्षाच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास हा प्रकार घडत असताना वृत्तपत्राच्या छायाचित्रकारांनी तातडीने पोलिसांच्या लक्षात हा प्रकार आणून दिला होता. तेथे आलेल्या पोलिसांनी त्या तरूणांच्या गटाला हाकलवून लावले. नंतर या दोघींना पोलिसांनी जुहू पोलिस ठाण्यात आणले. मात्र या तरूणींनी कोणतीही तक्रार न दिल्याने कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र आज वृत्तपत्रात आलेल्या बातमीनंतर पोलिसांनी वृत्तपत्राचे छायाचित्रकार सतीश शंकर बाटे (३०) यांना फिर्यादी बनवून ४० जणांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

गेल्या वर्षी गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या अशाच प्रकारानंतर याठिकाणी तसेच शहरातील गर्दीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती असे, जाधव म्हणाले. अनिवासी भारतीय तरूणी असलेल्या या दोघींनी मद्यप्राशन केले होते, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.


याच प्रकारात मोडणारा : मुलींची छेड काढल्याप्रकरणी लालूंच्या मुलांना बेदम चोप

नवी दिल्ली, ता. २ - रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या दोन मुलांना, तरुणींची छेड काढल्याप्रकरणी जमावाने बेदम मारहाण केली. नव्या वर्षाच्या स्वागतादरम्यान ही घटना घडली. ....
लालूंचे दोन चिरंजीव तरुण आणि तेजपाल हे दोघेही पार्टीसाठी अशोका हॉटेलमध्ये गेले होते. तेथे त्यांनी तरुणींची छेड काढली. त्यानंतर ते कॅनॉट प्लेस भागात आले. तेथेही त्यांनी छेडछाड केली. तेथून ते पार्टीसाठी दिल्ली-हरियाना सीमेवरील चत्तरपूर येथे गेले. तेथून त्यांनी परतताना फार्म हाऊसवर पार्टी करणाऱ्या मुलींबाबत अनुदार उद्‌गार काढले. मात्र या वेळी त्यांना तरुणांच्या गटाने बेदम चोप दिला. त्यांच्याबरोबर असलेल्या सुरक्षारक्षकांनी या दोघांची ओळखही सांगितली नाही. जखमी अवस्थेतील तरुण आणि तेजपाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या सुरक्षारक्षकाने सर्व्हिस पिस्तूल हरवल्याची तक्रार दिली आहे.

नेटसर्फिंग करताना "WHAT SARAH SAID" या वेबसाईट वरचा हा लेख वाचला... कदाचित तुम्हीही वाचला असेल... सांगायचा मुद्दा हाच की ... विनयभंग असो वा बलात्कार, महिलांना कितपत जबाबदार धरायचे? जुहु प्रकरणात म्हणे महिलाही मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत होत्या.... म्हणजे त्यांचा विनयभंगास किंवा होणा-या प्रकारास होकार होता असे नक्कीच नाही ...

४० लोकांमध्ये, एकातही विवेकबुध्दी शिल्लक राहिली नसावी का? एखाद्याचेही मन बंड करुन कसे उठले नाही? आपण काहीतरी चुकीचे करतोय.. हा गुन्हा आहे... पाप आहे असे एकाच्याही मनाला वाटले नाही ..?

धन्य त्या नामर्दांची मर्दानगी ...!

[ छायाचित्रः एल.ए.सी.ए.ए.डब्लु. / सारा ]

...भुंगा!