मला वाटतं प्रत्येकालाच फोटोगिरी करायला आवडते. अगदी नाही म्हटलं तरी - मोबाईल फोनवरुन तरी आपण क्लिक करतच असतो. बर्यादा आपण फोटो गुगलच्या "पिकासा' किंवा याहुच्या "फ्लिकर" वरती अपलोड करतो. आता हे फोटो आपल्या ब्लॉगवरती किंवा वेबसाइटवरती ही तुम्ही दाखवु शकता. म्हणजे तुमच्या विजिटर्सना तुमचे फोटो पाहण्यासाठी फ्लिकर किंवा पिकासा वरती जावे लागणार नाही. आपण माझ्या ब्लॉगर - वरती अशीच
फोटोगिरी म्हणुन लिंक पाहिलीच असेल?
पिकासा: गुगलने तुमचे फोटो ऑनलाईन साठवण्यासाठी [साठा = १ जी.बी.] दिलेली ही मोफतची सुविधा.
फ्लिकरः आता ही याहु ची कंपनी आहे. आपण येथेही फोटो अपलोड करु शकता. बरेच फोटोग्राफर्स पिकासापेक्षा फ्लिकर निवडतात. आता त्यांचे अनुभव/ कारणे त्यांनीच द्यावीत. असो!!
पिकासा चे आल्बम्स कसे दाखवाल?१.
पिकासा मध्ये तुमच्या जी मेलच्या आ.डी. ने लॉगिन करा. एक आल्बम बनवा. हा आल्बम मात्र पब्लिक असावा. त्यात तुमचे फोटो अपलोड करा.
२. ब्लॉगर वरती एक नविन पोस्ट - "माझे फोटो" नावाने तयार करा.
३. त्या पोस्टच्या HTML टॅब मध्ये जाऊन हा कोड पेस्ट करा किंवा ब्लॉगरमध्ये - नविन HTML गॅजेट टाका आणि त्यात हा कोड पेस्ट करा.
<script type="text/javascript">username = 'YourPicasaID';</script>
<script type="text/javascript" src="http://sites.google.com/site/blogstoresite/Home/BBpwa2.js"></script>
YourPicasaID = तुमची पिकासा / जी'मेल आय.डी. = फक्त नाव/ आय.डी. @gmail.com लाऊ नका!
४. पोस्ट पब्लिश करा किंवा गॅजेट सेव करा... झाले!
आता या पोस्टमध्ये तुमचे सारे पब्लिक आल्बम दिसु लागतील.
फ्लिकर चे काय?आता फ्लिकर / पिकासा साठी एक सुविधा आहे.
१. "
पिक्टोबिल्डर" या साइटवर जा
२. तुमचा पिकासा किंवा फ्लिकरचा आय.डी. द्या आणि त्यानंतर सेट्स, टेग्ज किंवा ग्रुप सिलेक्ट करा.
३. नंतरच्या सेटींग मध्ये तुम्हाला पाहिजेत ते बदल करा, तुमचा आल्ब्म तयार!
४. वरती सेटिंग्जच्या बाजुला असणार्या "Get HTML Code" वरती क्लिक करा.
५. ब्लॉगरमध्ये - नविन HTML गॅजेट टाका आणि त्यात हा कोड पेस्ट करा.
झाले!
उदाहरणः
माझी फोटोगिरीतुमचे प्रश्न - कमेंट्स?