दैनंदिनी. ७ सप्टें. २००९.
चार दिवसांच्या सुट्टीनंतर ऑफिस... ९४ ई-मेल.. बर्याच एफ्.वाय.आय. च्या... कामाच्या फारच कमी.. चहाच्या कपाबरोबर सगळ्या वाचल्या... आणि कामाच्या बाजुला करुन कामाला प्रायारीटीनुसार सुरुवात.
खतरों के खिलाडी - भाग दोन:
संध्याकाळी, खास "खतरों के खिलाडी - भाग दोन" बघण्यासाठी वेळ काढुन ठेवलेला... १४ पोरी.. माफ करा - बायका - सगळ्याच काही ओळखीच्या नाहीत मात्र काही चेहरे जाने पेहचाने -आणि त्यांचे पार्टनर [१२]... सुरुवात तर चांगली झालीय.. विषेशतः गांडुळांनी भरलेल्या भांड्यातुन गांडुळे तोंडाने काढुन दुसर्या बॉक्स मध्ये - पार्टनरच्या डोक्यावर टाकणे जरा किळसवाणेच होते... ही ही ही! पण मज्जा आली असेल.. मला तर आली - बघायला...!
.. कलर चॅनलवरती मध्येच अमिताभची नविन "बिग बॉसची" जाहिरात पाहिलीत का? अच्छा, मला वाटतं यावेळच्या बिग बॉसमध्ये हे लोक असतील:
अमिताभ बच्चन, रेखा, दारासिंग, धर्मेंद्र, हेमा मालिनी, डॅनी, सुरेश ओबेरॉय, रीमा लागु
... अजुन काही तुम्हाला आठवताहेत?
विषेशतः "रेखाला कणीक मळताना" आणि हेमाजींना "कपडे धुतानाची" टास्क दिल्यावर काय होईल .... अमिताभ आणि धरमजी "शोले" च्या आठवणी बद्द्ल बोलताना काय काय सांगतील...अमिताभ - रेखा चोरुन भेटायचा प्रयत्न करतील का... धरम - हेमा पुन्हा जुळतील का? दारासिंग कीती तुप खायचे हे सांगतील का? सुरेश ओबेरॉय जुन्या आठवणींत काय सांगतील? डॅनी शोलेतील गब्बर असता तर? हे पाहताना - ऐकताना मज्जा येईल, नाही? ... उगाच माझं आपलं इमॅजिनेशन!
... तर, खके-२ च्या आजच्या भागात- शोनाली - चंदन [?] ची जोडी बाद - घरी परत! उद्याचा खेळ - उद्या पाहुच! शुभ रात्री!