आ. मा. पुण्याचे पालन कर्ता/धर्ता -
श्री. सुरेश/जी कलमाडी/जी/साहेबजीआणि त्याच तोडीचे
श्री.
अजितदादा/जी/राव पवार/जी/साहेब.
माननीय महोदय,
आपणांस आठवण्यास कारण की वि. वि.
बरेच दिवस झालं, आपणांस लिहिन - लिहिन म्हणत होतो... पण कामांतुन वेळच मिळत नव्हता आणि आता स्वाईन फ्लुच्या टेंशन मुळं कामात लक्ष लागत नाही.... ! म्हटलं लिहावं ...
तर, बरेच दिवस झाले आपलं दर्शन - साक्षात्कार नाही म्हणत हो... न्युजपेपर वगैरे मधुन, झालं नाही. आणि त्यातच स्वाईन फ्ल्युचं तांडव सुरु आहे.... वाटलं विचारपुस करावी.
जिवंत आहात न्हवं?
तसा मी काय पुणेरी नाही... पण गेली दहा वर्षे झाली इथं राहतोय.... दुसर्या शहरांत राहण्याच्या - सेटल होण्याच्या आलेल्या संध्या पुण्यासाठीच सोडल्या.... पुणेच आपलं मानलं...त्या पुण्याची हालत आज बघवत नाही हो.. मित्रांच्या घोळक्यात बर्याचदा तुमची नावं ऐकलीत... की तुम्ही लोकंच पुण्याचं माय - बाप आहात म्हणे... गार्डियन्स म्हणे.... आज न राहुन मनात प्रश्न आलाच - आपण कुठं आहात?
आम्हाला मान्य आहे की यावेळच्या इलेक्शन मध्ये आपणास भरघोस मताधिक्य मिळालं नाही.... वेबसाइट आणि सो. नेटवर्क ही गेल्या इलेक्शन पासुन अपडेट केलेल्या नाहीत.... का हो - ते काम फक्त हे इलेक्शन ते इलेक्शन असंच होतं का?
मात्र आपल्या वेबसाइट्स - फेसबुक चे प्रोफाइल बघुन हे मात्र कळाले की आपण अगदी २१ व्या शतकातील राजकारणी आहात... त्यामुळे कदाचित आपण लपुन - छपुन नव्या शतकाची वाट बघताहात काय?
फार मोठ्या अपेक्षा नाहित इथं - फक्त एक गार्डियन म्हणुन आपण आपल्या कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शक सल्ला द्या.... दवाखाने - शाळा अशा ठीकांनी कार्यकर्त्यांना पाठवुन जारगुकता करता येते का पहा... किमान तुम्ही आहात - हे तर पुण्याला दाखवुन द्या.
उद्याचं काय सांगावं - व्हिजन २०२० चा आराखडा फार सुंदर आहे... पण त्यासाठी लोकं जगायला हवीत... जगलेल्या लोकांनी तुम्हाला जाणायला हवं... जाणकारांनी मत द्यायला हवं ... आणि तुम्ही जिंकायला हवं!
तुम्हाला तरी काय म्हणायचं! खरं - खोटं देव जाणो!
कळावे,
लोभ असावा/ काळजी घ्या!
मी.