काही ब्लॉगवर आपण पाहिलं असेल की एखादी पोस्ट दाखवताना त्या पोस्टच्या वरती ती कोणत्या कॅटेगरीत आहे ती त्या लेखाच्या आधी लिंक करुन दाखवलेली असते. इंग्रजीत - टेक्निकली या प्रकाराला "
ब्रेडक्रंब्स ट्रेल" असं म्हणतात. मला काय म्हणायचय हे समजायला थोडं कठीण आहे आणि मलाही ते सांगायला. पण खाली दिलेला स्क्रीनशॉट पाहुन आपल्याला कळेल, मला काय म्हणाचय ते.
आता हे कशासाठी करायचं? तर - एक तर तुमच्या विजिटर्सना सोपं नेविगेशन व्हावं आणि समजावं की ही पोस्ट - लेख कोणत्या प्रकारातला आहे. शिवाय सर्च इंजिनमध्येही आणखी एकदा त्या वर्गाची आणि शब्दाची गणती होते... आणि ती पोस्ट - लेख जरा वरती लिस्ट व्हायला मदत होते.
तर, ब्लॉगर वर एखादी पोस्ट लिहिल्यानंतर ती पोस्ट ज्या वर्गात मोडते ती दाखवण्यासाठी खाली दिलेली साधी ट्रिक वापरता येईल.
१. ब्लॉगरला लॉगिन करुन "लेऑऊट" आणि नंतर "
Edit HTML" टॅबवर क्लिक करा.
२. नेहमीप्रमाणेच आपल्या टेंप्लेटची बॅकअप घ्या!
३. नंतर "
Expand Widget Templates" पुढे क्लिक करुन कोड एक्सपान्ड करा.
४. आता, ही खाली दिलेली लाईन शोधा.
<b:includable id='post' var='post'>
याच्या खाली, ही खाली दिलेली लाईन शोधा
<div class="post hentry uncustomized-post-template">
किंवा
<div class="post hentry">
५. आता, त्या लाईनच्या लागलीच खाली, हा कोड पेस्ट करा.
<!-- Start breadcrumb trail-->
<b:if cond='data:blog.homepageUrl == data:blog.url'>
<b:else/>
<b:if cond='data:blog.pageType == "item"'>
<div class='breadcrumbsTrail'>
<a expr:href='data:blog.homepageUrl'><data:blog.title/></a> »
<b:if cond='data:post.labels'><b:loop values='data:post.labels' var='label'>
<a expr:href='data:label.url' rel='tag'><data:label.name/></a>
<b:if cond='data:label.isLast != "true"'> » </b:if>
</b:loop>
</b:if> » <data:post.title/>
</div>
</b:if>
</b:if>
<!-- End breadcrumb trail-->
६. आता, "]]>" शोधा आणि त्याच्या लागलीच वरती, हा कोड पेस्ट करा.
.breadcrumbsTrail{
padding:5px 5px 5px 10px;
margin:0;font-size:95%;
line-height:1.4em;
}
७. टेंप्लेट सेव करा आणि एखाद्या पोस्ट वर क्लिक करुन पहा.
८. ती लाईन अशी दिसेल!
ब्लॉगचे नाव »
वर्गाचे नाव » पोस्ट/ लेखाचे नाव
तुमच्या कमेंट्स?