.... नविन वर्षातील ऑफिसमधला पहिला दिवस: गेला पुर्ण आठवडा सुट्टीवर असल्यामुळे आजचा पुर्ण दिवस इ-मेल चेक करण्यातच गेला ... शिवाय, काल राहिलेल्यांना व एस्.एम.एस. न मिळालेल्यांना फोन करुन नव-वर्षाच्या शुभेच्छाही द्यायच्याच होत्या की... काही लोग मस्त गोव्याला जाऊन मजा करुन आले ... तर काही मित्रांबरोबर पार्टी करुन आले होते...राहिलेले - [ आमच्यासारखे ?] आपापल्या घरच्यांबरोबर नविन वर्ष साजरा करुन आलेले...! ... एकंदरीत ऑफिसमध्ये गप्पांना चांगलाच जोर होता....!!
नविन ऑनलाइन गाण्याची वेब-साइट सापडली ... नाव आहे -
धिंगाणा ..! ... जाऊन बघाच... मस्त गाणी आहेत.. मराठी ,हिंदी आणि पंजाबी सुद्धा .. आपल्याला तर जाम आवडली साइट.. नाही तर आजकाल मराठी गाणी सापडणे दुर्मिळच झालय ना..! .. आणि काम करत-करत गाणी ऐकण्याची [किंवा गाणी ऐकत-ऐकत काम करण्याची म्हणा ..] मजाही काही औरच असते ..!
अरे हो, सांगायचा मुद्दा हाच की ... एकंदरीत दिवस ठीक होता.. हा.. हा .. हा ..!!
चला... भेटु नंतर.. तोपर्यंत काम करत-करत गाणी ऐका ..!
...भुंगा!