मला वाटतं .... स्वत:चा ब्लॉग असणं आणि त्यांचं डिझाईन स्वत: केलेलं [ कमीत - कमी कस्टमायझेशन तरी ] - ही आता अभिमानाची गोष्ट झालीय. इतर ब्लॉग्ज मध्ये आपला ब्लॉग उठुन दिसण्यासाठी आपण [किमान, मी तरी!] काय काय करतो.. पैकीच एक म्हणजे जरा हटके - डिझाईन. बर्याच जणांचा ब्लॉगचं टेंप्लेट बदलण्याचा विचार असतो..
मात्र 'आपलं लेखन गेलं तर..?' किंवा 'जोडलेली विजेट्स गेली तर..?' असे अनेक प्रश्न असतात. मला आठवतय 'भाग्यश्री' [
भानस] ने एकदा मला असंच विचारलं होतं.... साहजिक आहे.. ! असो.. मुद्दा हा आहे की - आपण आता आपल्या ब्लॉगरवरील ब्लॉगचं डिझाईन अगदी सोप्या पद्धतीनं - आरामात बदलु शकतो.... कसं - हे पहा!
१.
ब्लॉगरच्या ड्रॉप्ट या सेवेला लॉगिन करा. घाबरु नका - हे संकेतस्थळ ब्लॉगरचेच आहे. मात्र नविन - प्रायोगिक असणारे बदल याठीकाणी दिले जातात.
२. "लेआउट" या टॅबवार क्लिक करा आणि पहा - शेवट्ची टॅब "टेम्प्लेट डिझायनर" अशी दिलेल.
३. त्यावर क्लिक करा आणि तयार व्हा - आपल्या ब्लॉगला एक नवं रुप देण्यासाठी.
नविन "टेम्प्लेट डिझायनर" या पानावर तुम्हाला मुख्य अशी चार/ पाच डिझाइन दिसतील व प्रत्येकी २-३ अशी मिळुन एकंदरीत १५ नविन डिझाइन्स मधुन तुम्हाला तुमच्या ब्लॉगचं रुप बदलता येईल. यामध्ये बॅकग्राउंड इमेज ते अक्षरांचा रंग या पर्यंत बरंच काही बदलता येईल... आणि तेही तुमचे विजेट - मुख्य कोड किंवा लेखन यामध्ये कोणताही बदल न होता!
सहीच ना....? तर मग बघा एक प्रयत्न करुन!
[ग्राफिक्सः साभार - ब्लॉगर बझ्]