Sunday, 14 March 2010

ब्लॉगर टेंप्लेट डिझायनरः ब्लॉगरची नवी सुविधा!

मला वाटतं .... स्वत:चा ब्लॉग असणं आणि त्यांचं डिझाईन स्वत: केलेलं [ कमीत - कमी कस्टमायझेशन तरी ] - ही आता अभिमानाची गोष्ट झालीय. इतर ब्लॉग्ज मध्ये आपला ब्लॉग उठुन दिसण्यासाठी आपण [किमान, मी तरी!] काय काय करतो.. पैकीच एक म्हणजे जरा हटके - डिझाईन. बर्‍याच जणांचा ब्लॉगचं टेंप्लेट बदलण्याचा विचार असतो..


मात्र 'आपलं लेखन गेलं तर..?' किंवा 'जोडलेली विजेट्स गेली तर..?' असे अनेक प्रश्न असतात. मला आठवतय 'भाग्यश्री' [भानस] ने एकदा मला असंच विचारलं होतं.... साहजिक आहे.. ! असो.. मुद्दा हा आहे की - आपण आता आपल्या ब्लॉगरवरील ब्लॉगचं डिझाईन अगदी सोप्या पद्धतीनं - आरामात बदलु शकतो.... कसं - हे पहा!

१. ब्लॉगरच्या ड्रॉप्ट या सेवेला लॉगिन करा. घाबरु नका - हे संकेतस्थळ ब्लॉगरचेच आहे. मात्र नविन - प्रायोगिक असणारे बदल याठीकाणी दिले जातात.
२. "लेआउट" या टॅबवार क्लिक करा आणि पहा - शेवट्ची टॅब "टेम्प्लेट डिझायनर" अशी दिलेल.
३. त्यावर क्लिक करा आणि तयार व्हा - आपल्या ब्लॉगला एक नवं रुप देण्यासाठी.

नविन "टेम्प्लेट डिझायनर" या पानावर तुम्हाला मुख्य अशी चार/ पाच डिझाइन दिसतील व प्रत्येकी २-३ अशी मिळुन एकंदरीत १५ नविन डिझाइन्स मधुन तुम्हाला तुमच्या ब्लॉगचं रुप बदलता येईल. यामध्ये बॅकग्राउंड इमेज ते अक्षरांचा रंग या पर्यंत बरंच काही बदलता येईल... आणि तेही तुमचे विजेट - मुख्य कोड किंवा लेखन यामध्ये कोणताही बदल न होता!

सहीच ना....? तर मग बघा एक प्रयत्न करुन!
[ग्राफिक्सः साभार - ब्लॉगर बझ्]

7 comments:

याच विषयावर १३ तारखेलाच मी एक व्हिडीओ प्रकाशित केला आहे. तुम्हाला ही तो यात जोडता येउ शकतो. लोकांना अजून माहिती मिळेल. ही माझ्या लेखाची लिंक.
http://netvidyarthi.blogspot.com/2010/03/blog-post_13.html
तिथून तुम्ही youtube वरील व्हिडीओ इथे शेअर करू शकता .

दिपक,मी अजूनही घाबरून आणि सारे विजेट-कोड सेव्ह करा, पुन्हा टाका या कटकटींमुळे माझे टेम्प्लेट बदललेले नाही. पण आता मात्र इतकी चांगली सोय उपलब्ध झाल्यामुळे उत्साह आला. अनेक धन्यवाद. काही अडलेच तर विचारीनच.:) ही सुविधा खूपच अपिलींग आहे आणि सोपीही.

भुंगेश,
तुम्ही आम्हा वर्डप्रेस वाल्यांसाठीपण लिहित जा ओ ... :)
जाताजाता, तुमच्या साईटवर 'मराठी ब्लॉग/ब्लॉग रोल; मधे ब्लोच्.ग दाखवण्यासाठी काही अटी आहेत काय किंवा लिखाणाचे 'स्टॅंडर्डस्' ? आणि मी‌ माझ्या रोलमधून तुम्झा लिन्क दिली‌तर् चालेल का ?

ते सगळं छान आहे पण माझ्यासारखे कलाकारीचं अंग जवळजवळ नसलेले लोक तरी काय करणार?? हे हे हे...तरी नशीब ब्लॉगचं विजेट कोड रेडिमेड बनवुन मिळालंय...अर्थात त्यासाठी भुंगादादांचे आभार..आता ते आमच्यासारख्यांना तुमच्यासारखाच छान हेडर डिझायनिंगला पण मदत करणार का?? (याला म्हणतात बोट पकडायला दिलं की हात पकडायचा...)

कसा आहेस दिपक ... :) आपली भेट तशी घाईतच झाली रे... :(

आणि हो सर्व ब्लोग्सचा वाढदिवस होता ना हल्लीच मग सर्वांना नवीन कपडे केले आहेत बघ... :) ब्लोगर्स टेम्पलेट डिझाइन वरुन घेतले नवीन कपडे ... :D

@विरेंद्र,
तुझ्या कमेंटमधेच ती - अधिक माहितीची - लिंक आहे. तशीच पब्लिश केलीय.

@भाग्यश्री,
आता तरी एक प्रयत्न करुन बघ... जमेल तुला..!

@सोमेश,
स्टॅडर्ड्स... नाही रे भाऊ! तु तुझ्या ब्लॉगचे विजेट पाठवुन दे.. मी जोडतो.. :)आणि हो... माझा ब्लॉग ओ.सो. आहे... लिंक/ रेफ. चालेलच!

@अपर्णा,
हो.. मदत करेनच ना... तुम्ही टेंप्लेट बदलुन तर पहा!

@रोहन,
मी ठिक... अरे भेट झाली ते महत्त्वावं.. गेल्या वर्षीपासुन चाललं होतं :).. तुझे सारे ब्लॉग पाहिले.. त्यांचं नविन रुप सॉलिड आहे!

@मनमौजी,
मी नशिबवान म्हणायचा... सर्वांना माहिती उपयोगी वाटली :)

भुंगोबा धन्यवाद!
ब्लॉग टेंप्लेट बदलले आहे, खुपंच सोप्प केलयं.