दैनंदिनी: ९ सप्टें. २००९
दोन वर्षांपुर्वी याच महिन्यात रायरेश्वर आणि केंजळगडचे ट्रेक केले होते. पंकजच्या रायरेश्वरची पोस्ट वाचुन रायरेश्वरची आठवण झाली...! रायरेश्वरच्या आठवणी जाग्या केल्यास.... आमचा ट्रेकही मस्त झाला होता... मात्र पायवाटेने पुर्ण राउंड मारायच्या ऐवजी आम्ही मधुनच वर चढलो आणि सोपा ट्रेक अवघड करुन टाकला होता. रायरेश्वर, खरंच स्वर्गाची अनुभुती देणारा आहे.. आता स्वर्ग पाहिलाय कुणी, पण ठामपणे सांगावे वाटते - यापेक्षा सुंदर नसावाच.
शिवाय केंजळगडचा बुलेट ट्रेकही भन्नाट झाला होता. तो वरती बोर्ड आहे ना, तिथंपर्यंत मी बुलेट चढवली होती... हा हा..! आणि हो - या बुलेट ट्रेक ची स्टोरी "रॉयल इनफिल्ड" च्या वेबसाइट ला सबमिट केली होती. त्यांनी ती प्रकाशित केली आणि मला "रॉयल इनफिल्ड" टी शर्टही मिळाला!! त्यामुळे केंजळगड चा ट्रेक खास महत्वाचा!
आज ०९/०९/०९ आहे... सकाळी ०९.०९ पहायचे राहिले.. म्हणुन रात्रीचे ०९.०९ चा आलाराम[!] लाऊन वेळेची आठवण केली!
उद्या - गुगलच्या एनालॅटिक्स वर लिहितोय... तेंव्हा ती पोस्ट जरुर वाचा...
जाता - जाता:
बर्याचदा मी विजिटर्सना, मराठी ब्लॉग्जवरती इंग्रजीतुन किंवा इंग्रजीमिश्रित मराठीतुन कमेंटस देताना पाहतो. आता प्रत्येकाकडे मराठीसाठी दुसर्या साइटवर [गुगल इंडिक - गमभन] जाऊन लिहिण्याचा वेळ नसतो. अशांनी कॄपया ही - "कोणत्याही वेबसाईट्वर भारतीय भाषेत लिहा" पोस्ट वाचुन त्यावर झटपट तोडगा करावा!
चला, उद्या भेटुच! शुभ रात्री!
0 comments:
Post a Comment