तुम्ही कोणता ब्राउजर [वर्जन सहित] वापरता? फायरफॉक्स [३.५+]... आय.ई. [७ - ८]... सफारी [३+]... ओपेरा [९.५].. गुगल क्रोम [२.०]...फ्लॉक [२.५]... की आय. ई ६? तसा हा जरा टेक्निकल प्रश्न / मुद्दा आहे.. कारण, ब्राउजर अपडेट करणे किंवा आय.ई. सोडुन इतर कोणताही ब्राउजर आहे / वापरणे हे बर्याच लोकांना माहित नसते. म्हणजे सगळेच काय नेट सॅव्ही असतात असं नाही..! बरं काही लोकांना तर इंटरनेट म्हणजेच आय.ई. असं समिकरण माहित आहे! त्याचं कारण पण आहे. आय.ई. ने अनेक वर्षं ब्राउजर्सच्या दुनियेत राज्य केलं आहे. फार इतिहास सांगत नाही... पण जवळ-जवळ २००४ - २००५ पर्यंत जो पर्यत फायरफॉक्स ब्राउजर आला नव्हता तो पर्यंत तरी आय.ई. चीच चलती होती. तसा नेटस्केप, मोझिला हे होतेच... असो. सांगायचा मुद्दा हा आहे की, तुम्ही जर अजुनही आय.ई.६ वापरत असाल तर - इट्स टाइम टु स्विच टु न्यु वन!
आय.ई. ६ च्या नंतर आय.टी. [ब्राउजर्स टेक.] मध्ये बराच बदल झालाय.. तो अॅक्सेप्ट करणं आय.ई. ६ मध्ये बर्र्याच अंशी शक्य नाही.. त्यामुळं आय.ई.६ वायरस, सिक्युरीटी थ्रेट्स वगैरे साठी अधिकच प्रोन आहे. बर्याच वेबसाइटवर याबद्द्ल माहिती मिळेल. इव्हन, त्याचं आयुष्यही काही महिनेच राहीलंय! खाली लिंक्स देतोय, वाचुन बघा आणि आय.ई. ६ ला तिलांजली द्या!
नविन ब्राउजर्सची नावं वरती दिलीच आहेत... तुमच्या आवडीचा ब्राउजर डाउनलोड आणि इंस्टाल करा... तसा प्रत्यक ब्राउजरचा आपले - आपले प्लस - मायनस प्वांटस आहेत...!
तुम्ही जर आय.ई. वरतीच राहु इच्छित असाल तर किमान नविन वर्जन [७ किंवा ८] इंस्टाल करा!
मी तर फायरफॉक्स [३.५.१] च वापरतो... त्यासाठी बरीच कारणे आहेत.. जसं ओपन सोर्स... टॅब्स [आता आय.ई. आणि इतर ब्राउजर्स मध्येही आहेत].. फास्ट... सेक्युअर.... आणि अनेक कारणे!
सफारीचा एक खास वर्ग आहे... मॅक वाले... सध्या विंडोजसाठीही मिळतो म्हणे.. मस्त ब्राउजर आहे!
ओपेरा ही मस्त फास्ट ब्राउजर आहे.
आणि गुगल क्रोम तर काय सांगावे - त्याची "इनकाग्निटो" प्रायव्हेट ब्राउजिंग सुविधा मस्त आहे! मात्र सध्या ती फायरफॉक्स [३.५+] मध्येही आहे!!
फ्लॉक - एक सोशल ब्राउजर आहे.. त्यात ब्लौगिंग, सोशल नेटवर्किंग , फोटो - मिडिया मॅनेजमेंट, इ-मेल मॅनेजमेंट असे बरेच फिचर्स आहेत.
बर्याच वेबसाइट्सनी आय.ई. ६ ला मुठमाती दिली आहे.. जर युजर आय.ई. ६ वापरत असेल तर वेबसाइटवरती - अपडेट दाखवणारे मेसेज दाखवतात. असाच एक मेसेज माझ्या या ब्लौगवरतीही आहे.... तुम्ही जर आय.ई. ६ वापरत असाल तर तुम्हाला तो नक्किच बघायला मिळेल.... किंवा तुमच्या वापरात असलेल्या ब्राउजरचे नविन वर्जन असेल तर एक छोटासा मेसेज अगदी वरच्या हाताला - उजव्या बाजुला दिसेल!
असे काही अपडेटस - मेसेज जर तुम्हालाही तुमच्या वेबसाइट / ब्लौग वर - दाखवायचे असतील तर ही पोस्ट वाचा!
एवढं सगळं सांगण्यामागे अजुन एक कारण आहे - ते म्हणजे एक डेवलपर म्हणुन एखादी वेबसाइट / वेब प्रोजेक्ट आय.ई. ६ कंपॅटिबल करताना आमचे कसे !@#$%^&* होतात ते आम्हालाच माहिती आहे. इंटरेस्टिंगली आमच्या कार्पोरेट साइटचे २४% विजिटर्स आय.ई.६ वापरतात...आता बोला!
7 comments:
मी सुरुवातीला नेटस्केप वापरायचॊ. पण नंतर नेटस्केप मायक्रोसॉफ्ट ने टेक ओव्हर केल्यावर मात्र आय ई वापरणं सुरु केलं . एकदा एका मित्राच्या मशिनवर मोझिला बघितलं, आणि टॅब ब्राउझिंगची सुविधा मनापासुन आवडली.. केवळ या एका गोष्टी साठी मोझिला वापरणं सुरु केलं ते आज पर्यंत बदललेलं नाही. सध्या मोझिला ३.१ वापरतो. मस्त आहे ब्राउझर.. एकदा ऑपेरा पण ट्राय करायचं आहे.
फ्लॉक हा ही मस्त ब्राउजर आहे... या मध्ये ब्लौगिंग साठी मस्त सुविधा आहेत... मी ब्लौगिंग आणि इतर - मेल - मिडिया साठी शक्यतो - फ्लॉक वापरतो!
आभार!
मी मोझिला फायरफोक्स ३.५ वापरतो.फ्लॉक नाही वापरल कधी.मोबाइल मध्ये ऑपेरा आहे. मोझिला फायरफोक्सने सरळ सरळ मात दिली आहे इंटरनेट एक्सप्लोररला.एकावेळी
८५% वापर होत असलेल्या इंटरनेट एक्सप्लोररचा वापर आता फ़क्त ४०% लोक करत आहेत.सुरुवातीला मोझिला
चा वापर फ़क्त २ ते ३ % लोक करत होते.तेच आता ४७% यूज़र्ससह टॉपला आहे.खुपच मोठी वाटचाल आहे ही मोझिलाची.गुगलच्या गूगल क्रोम चा वापर ६% लोक करतात. (वरील डेटा जून -२००९ मधील आहे )
नमस्ते देवेंद्र.
अगदी बरोबर - मोझिला फायरफॉक्स अल्टीमेट ब्राउजर आहे. मोबाइल मध्ये मीही ओपेराच वापरतोय. फ्लॉक [मोझिला बेसड्]मस्त आहे, कारण त्या मध्ये ब्लौगिंग वगैरे अगदी सोपं करुन दिलय.. एक ट्राय मार.. नक्कीच आवडेल!
आभार!
खरंय तुमचं.
६, ७ असो का ८ आय.ई सक्स.
मी क्रोमचा लेटेस्ट बीटा व्हर्शन आणि फाफॉ ३.५ वापरतो...
तरी क्रोमसारखी फंक्शनॅलिटी कशातच नाही.
वा ! तुमची आणि आमची आवड व व्यवसाय एकच दिसतो .. मी सुद्धा फायरफॉक्स चा भक्त आहे. पण मला सफारी व फ्लोक पण आवडत. मोबाईल वर मी बोल्ट आणि ओपेरा अस दोन्ही मधून सर्फिंग करतो.
मी ही या विषयावर एक लेख माझ्या ब्लॉग वर लिहिला आहे. एक नजर टाका .. :)
शुभेच्छांसह ..
वीरेन्द्र
@आल्हाद,
आय.ई. च्या बाबतीत सहमत!
प्रतिक्रियेबद्दल आभार!
@वीरेंद्र,
तुझ्या ब्लौगवरेचे काही पोस्ट वाचले... चांगली माहिती दिली आहे!
आभार!
Post a Comment