आदरणीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन.डी. टीवी व "राखी का इंसाफ" मालिकेचे सर्व लोक. सर्वप्रथम मला एका प्रश्नाचं उत्तर द्या - "राखी का इंसाफ" ही मालिका आपल्या घरी - कुटुंबासह - पाहता का?
परवा टी.व्ही. वर कार्यक्रम चाळताना ही मालिका पाहण्याचे अहोभाग्य लाभले. काय ती बया... काय तिचे कपडे...काय ती भाषा अन् काय ती मालिका! एन्.डी.टी.व्ही. सारख्या चांगल्या चॅनलने स्वत:च्या व लोकांच्या आब्रुची अशी लख्तरं काढावीत - खरं नाही वाटलं! मला हेच कळत नाही - नवरा - बायको, प्रेमी-प्रेमिका यांसारखी नाती काय अशी चव्हाट्यावर डिस्कस करावीत ? हां, आता बर्यापैकी हा भाग एक पब्लिसिटी स्टंट असु शकेल, टी.आर.पी. वाढवण्याचे प्रयोगही असतील - नाही असं नाही. मात्र त्या भागातल्या एकांनं आत्महत्या करावी इतपत हे प्रकरण जावं ? तो भाग पाहताना त्यातील एकालाही अक्कल नावाचा प्रकार असल्याचे जाणवले नाही. म्हणे एका बाईने "मामा" विरुध्द बळजबरीची केस केलेली - त्यात तिचा नवरा साथ न देता म्हणे त्रास देत होता. त्यावर बाईसाहेबांची कमेंट - नामर्द - नपुंसक अशी होती. बिचारा - समाजात - पै-पाव्हण्यांत लाजं-काजं नाही जगु शकला - गेला!
ही लोकं - टी.व्ही. वर दिसणार या विचारांनच एवढी हुरळुन जातात की आपणच आपल्या आब्रुची लख्तरं काढतोय याचं जराही भान त्यांना नसतं. भांडणं आहे - अडचणी आहे तर पोलिसांत जा - न्यायालयात दाद मागा - असल्या भिकारड्या कार्यक्रमात कसं काय जाऊ शकता? एकमेकांना शिव्या देत - कुठला इंसाफ वाटला जातो तेच नाही कळत.
न्यायमुर्ती म्हणुन किमान तुम्ही पुर्ण पोषाखात तरी असावं.. भाषा स्वच्छ असावी. टीचभर कापडात आणि अकलेला पत्ताही नसलेल्या व्यक्तिकडुन स्वत:ची अक्कल गहान ठेवुन कसला इंसाफ मागताहात! स्वत:च्या लग्नाचा व लफड्यांचा मोजमाप नसणार्याने - प्रेम - संबंध - लग्न संस्था यांसारख्या विषयांवर काहीही बरळावं? वा रे वा!
आपापसांतील मत-भेद - भांडणावर आधारीत "आपकी कचेरी" नावाचा किरण बेदींचा कार्यक्रम यायचा/ येत असेल. बर्याचदा पाहिलाय. शांतपणे दोन्ही बाजुंची मतं ऐकुन विचारपुर्वक निकाल देणार्या बेदींबद्दल कमालीचा आदरही वाटायचा/ वाटतो.
वकिलांनी ही मालिका बंद करण्याची याचिका दिली तर बाईसाहेब म्हणतात - कदाचित मी त्यांच्या प्रोफेशन मध्ये आले तर म्हणुन वकिलांना असुरक्षितता वाटायला लागलीय!!
अरे वा! असा कुणीही उठ-सुठ वकिल अन् न्यायाधिश होतो काय? काय मस्त जोक मारतात ना, बाईसाहेब?
असो - आपण तर एन.डी.टी.व्ही. ब्लॉक केलाय. गटारीत पडण्यापेक्षा गटार बंद केलेली कधीही चांगली! तुमचं तुम्ही बगा!
8 comments:
टीवी बघत नसल्याचे फायदे मला :) आणि राखी बद्दल काय बोलणार, शब्द नाहीत किवा वाया घालवायची इच्छा नाही...
@सुहास,
बाईसाहेबांबद्दल न बोललेलंच चांगलं! :)
:(
बाईसाहेबांन बद्दल न बोललेच बर.
माझ्यावर एकदा ही मालिका बघण्याची वेळ आली होती. आपण टीव्ही बघत नाही याचा फार आनंद झाला त्या पाच मिनिटांमुळे!
मी तर तिथे जमलेल्या मुर्खांना पाहून लोटपोट होत होतो...
अकलेचा पत्ता नसणारे आपली गार्हाणी एका निर्लज्ज आणि माथेफिरू बाईसमोर मांडतात हे पाहून हसु आवरत नव्हतं...
एका मुलाखतीत बाई (?) म्हणतात, मै दो दिलॊंकॊ जोडुंगी.. ईथे सगळे मारामरी करत एकमेकांच्या उरावर बसतात आणि तिचं वाक्य सत्य ठरतं.. ;-)
Are, kiran bedi ti kiran bedi, konihi tichi jaga kashi ghevu shakel.....aani tila lawyer mhanun tari kon gheyil ka re...dusryachi kadnyapeksha swatachi sambhalavi mhanje zale, nahi tar mahit aahe na, swatache thevave zakun aani dusryache baghave vakun, tyatali gat aahe hi....aani gatar hi upma mala far aavadli aahe...tashi aavadnyasarkhi nahi aahe ti, pan upma changli aahe...
Rajanna pan vatat asel kai hey...bare aahe mi gelo lavkar..nahi tar kai kai baghave lagle aste re.... jagdamb..jagdamb..jagdamb
राखी सावंत....
हिला माय बाप नाहीत असंच वाटत ...हिला समाज म्हणजे काय ते माहित नाही....आणि सर्वांत महत्वाच हिला स्त्री म्हणजे काय हे हि नक्कीच माहित नाही...अतिशय निर्लज्ज, बकवास, उन्मद अस तीच वागणं आहे...
सगळे तिला हसतात आणि तिला असं वाटत कि ती लोकांना आवडते...म्हैस फक्त दूध काढण्या पुरती जवळ असलेली बरी...कायम कोणीही तिला चिटकत नाही...मनुष्य बर का....चिखलातले किडे चिटकता....सेम टीव्ही वाल्यांच आहे...चिखल-किडे- आणि म्हैस याचं नातं कसं असतं...तर हे असं असतं...ह्या नाटकासारखा...
एकदम बकवास कार्यक्रम. राखी ही फालतु बाई आहे. फारशी दखल न घेणेच योग्य.
Post a Comment