दैनंदिनी: ४ सप्टें. २००९.
पुन्हा एक सुस्त दिवस! मात्र सुरुवातच टेलिमार्केटिंग च्या कॉलने झाली! त्यानंतरचा 'क्राय' चा डोनेशन्साठीचा फोन. त्यानंतरचे काही सेल्सचे एस.एम.एस.! ही ऑफर - ती ऑफर. मी माझा मोबाईल - डी.एन.डी. साठी २००७ मध्ये रजिस्टर केलाय.. तरीही हा पिछा काही अजुनतरी सुटला नाही. कॉलपेक्षा आजकाल - मेसेजेसच फार येतात!
अरे हां, तुम्हाला जर तुमचा मोबाईल डी.एन.डी. साठी रजिस्टर्ड झाला आहे किंवा नाही हे चेक करायचे असेल तर ही लिंक पहा!
दुपारी छोकरीबरोबर पेंटींग केली... तारे जमिन पर - स्टाइल. एक मात्र खरं - ही चित्रकला कोणाच्याही हातचं काम नाही.. मला वाटतं माझ्यापेक्षा माझी मुलगीच चांगलं पेंटींग करते. मात्र मला खुष करण्यासाठी - "बाबा, तुझं पेंटींग छान झालयं हां, मला आवडलं", असं म्हणायला विसरत नाही!
@शिनुचं नविन टेंप्लेट अपडेट झालेलं दिसतयं - मीही खुष!
..... बाकी उद्या बोलु - शुभ रात्री!
आंबे पूर्णिमा...
9 years ago
2 comments:
डी. एन. डी ची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद!
मीही माझा मोबाईल त्यावर रजिस्टर केला होता. तेव्हापासून कॉल फ़ारसे आले नाहीत, पण अजूनही रोज मेसेजेस येतात. त्यामुळे माझे रजिस्ट्रेशन ऍक्टिव्ह आहे की परत नव्याने करावे लागेल याबद्दल मी साशंक होते. तुम्ही दिलेल्या लिंक मुळे माझे रजिस्ट्रेशन ऍक्टिव्ह आहे याची शहानिशा करू शकले.
टेलेमार्केटींग करणार्या कंपन्या डि. एन. डी. च्या नियमांमधून काहीतरी पळवाटा शोधतात आणि मग त्यांचे कॉल्स येतात. त्यावर प्रभावी उपाययोजना होण्यासाठी अजून थोडा काळ जावा लागेल, असे दिसतेय.
मी तर जाम खुष :)
Post a Comment