गेल्या शनिवारी अशीच लहर आली आणि अचानक लोणावळयाचा लौंग-ड्राईव्हचा प्लान झाला ... नविन [?] मुंबई - पुणे महामार्गावर झालेल्या अपघातामुळे जुन्या मार्गावर चांगलेच ट्राफिक जाम झाले होते... आम्ही मात्र त्यातही मार्ग काढत लोणावला गाठले ..! टु - व्हीलर असण्याचे [आणि त्यातल्या त्यात बुलेट!] असे काही फायदेही असतात ..!
लोणावण्यात "लायन्स प्वाईंट" बघितला आणि रणरणत्या उन्हात स्विमिंगचा प्लान बनला.. मग काय .. चलो पवना धरण. २-३ तास मस्त पोहुन झाल्यावर एका ढाब्यावर जेवण करुन बॅक टु पुणे ..!
भागीदार: मी, सुभाष, व समर ... सोबत अलोक, सतीश, आणि कुणाल ....
** पवणा धरण एक दिवसाच्या ट्रीपसाठी फार छान जागा आहे... स्विमिंग आणि बोटिंगचा अनुभव ॥ वा!
समोरच तुंग/ तुंगी, डाव्या बाजुला तिकोणा तर उजव्या हाताला लोहगड आहे!
काही फोटो येथे आहेत.
...भुंगा!