Categories

Aeroplanes

Aeroplanes

Showing posts with label राजकारण. Show all posts
Showing posts with label राजकारण. Show all posts

Thursday, 15 March 2012

आळीमिळी -गुपचिळी...

... शिवरायांच स्मारक जमीनीवर उभारण्यास जागा नाही म्हणुन समुद्रात उभाराचे वादे.. १९९५ सालापासुन जनतेला अक्षरशः चुना लावत चाललेलं हे स्मारकाचं राजकारण... हजारो एकरचे ग्रहप्रकल्प करण्यासाठी यांच्याकडे जमीन आहे... नसेल तर बळकवायचीही तयारी... पर्यावरणाच्या गोष्टी फक्त स्मारकासाठीच लागु का?... त्या ग्रह प्रकल्पांसाठी पर्यावरण खात्याची परवानगी मिळवण्यासाठी राजकारण्यांची कामगिरी वाखानण्याजोगी.. मग स्मारकासाठीच का आळीमिळी? आयुष्यभर राजांच्या नावाचं राजकारण करणारे नेमके याच बाबतीत गप्प का?



शिवरायांचे स्मारक, स्मृती आमच्या हृदयात आहे... उगाच राजकारण करु नका... राजकारणी म्हणुन आपण लायक नाहीत हे सर्वांनाच माहिती आहे.. त्याची प्रचितीही आलीच आहे.. मग आता काय 'सर्टीफाय' होण्याची वाट पाहताहात का?


सचिन व त्याच्या कामगिरीची बाराखडीही माहिती नसलेले, उगाचच त्याच्या 'त्या' शतकाची कुचेष्टा करताहेत.. सोशल नेटवर्किंगवरुन आपल्या अकलेचे दिवे पाजळताहेत... का.. कशासाठी..? आपल्या आयुष्यात आपण असे किती दिवे लावलेत ज्यासाठी आपण सचिनच्या रेकॉर्डची वाट पहात आहात...?

Tuesday, 11 August 2009

आपण यांना पाहिलंत का?

आ. मा. पुण्याचे पालन कर्ता/धर्ता - श्री. सुरेश/जी कलमाडी/जी/साहेबजी
आणि त्याच तोडीचे
श्री. अजितदादा/जी/राव पवार/जी/साहेब.

माननीय महोदय,
आपणांस आठवण्यास कारण की वि. वि.

बरेच दिवस झालं, आपणांस लिहिन - लिहिन म्हणत होतो... पण कामांतुन वेळच मिळत नव्हता आणि आता स्वाईन फ्लुच्या टेंशन मुळं कामात लक्ष लागत नाही.... ! म्हटलं लिहावं ...
तर, बरेच दिवस झाले आपलं दर्शन - साक्षात्कार नाही म्हणत हो... न्युजपेपर वगैरे मधुन, झालं नाही. आणि त्यातच स्वाईन फ्ल्युचं तांडव सुरु आहे.... वाटलं विचारपुस करावी.
जिवंत आहात न्हवं?

तसा मी काय पुणेरी नाही... पण गेली दहा वर्षे झाली इथं राहतोय.... दुसर्‍या शहरांत राहण्याच्या - सेटल होण्याच्या आलेल्या संध्या पुण्यासाठीच सोडल्या.... पुणेच आपलं मानलं...त्या पुण्याची हालत आज बघवत नाही हो.. मित्रांच्या घोळक्यात बर्‍याचदा तुमची नावं ऐकलीत... की तुम्ही लोकंच पुण्याचं माय - बाप आहात म्हणे... गार्डियन्स म्हणे.... आज न राहुन मनात प्रश्न आलाच - आपण कुठं आहात?

आम्हाला मान्य आहे की यावेळच्या इलेक्शन मध्ये आपणास भरघोस मताधिक्य मिळालं नाही.... वेबसाइट आणि सो. नेटवर्क ही गेल्या इलेक्शन पासुन अपडेट केलेल्या नाहीत.... का हो - ते काम फक्त हे इलेक्शन ते इलेक्शन असंच होतं का?

मात्र आपल्या वेबसाइट्स - फेसबुक चे प्रोफाइल बघुन हे मात्र कळाले की आपण अगदी २१ व्या शतकातील राजकारणी आहात... त्यामुळे कदाचित आपण लपुन - छपुन नव्या शतकाची वाट बघताहात काय?

फार मोठ्या अपेक्षा नाहित इथं - फक्त एक गार्डियन म्हणुन आपण आपल्या कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शक सल्ला द्या.... दवाखाने - शाळा अशा ठीकांनी कार्यकर्त्यांना पाठवुन जारगुकता करता येते का पहा... किमान तुम्ही आहात - हे तर पुण्याला दाखवुन द्या.
उद्याचं काय सांगावं - व्हिजन २०२० चा आराखडा फार सुंदर आहे... पण त्यासाठी लोकं जगायला हवीत... जगलेल्या लोकांनी तुम्हाला जाणायला हवं... जाणकारांनी मत द्यायला हवं ... आणि तुम्ही जिंकायला हवं!
तुम्हाला तरी काय म्हणायचं! खरं - खोटं देव जाणो!

कळावे,
लोभ असावा/ काळजी घ्या!
मी.

Tuesday, 28 July 2009

जय हो!


तुम्ही गांधीवादी असा अगर नसा.... मात्र.... गेल्या १८ वर्षात - स्टेट आणि सेंट्रल गव्ह. चे अंदाजे ४५० कार्यक्रम - प्रोजेक्टस् हे म. गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि पं. नेहरु यांच्या नावाने आहेत!

इथे अधिक माहिती वाचा...

स्टँप्स योगदान: इंडियापिक्स

Tuesday, 30 June 2009

वांद्रे-वरळी सी लिंक आणि राजकारण!

...राजकारण गेलं चुलीत म्हणतात ते काही खोटं नाही.. एवढा चांगला लिंकरोड झाला... लोकांची सोय झाली.. आणि राजकारण्यांना चेव चढलाय - नामांतराचा!



मला मात्र एक गोष्ट समजत नाही... नामांतरावरुन एवढा गोंधळ का? कशासाठी... ? राजीव गांधी किंवा सावरकरजी - दोघांच्याही नावाचे राजकारण करण्याची गरज नाही. सत्तारुढ पक्षाने "राजीव गांधी" असे नामकरण केले तर विरोधी पक्षाचे आक्षेप.... मात्र हाच पक्ष सत्तारुढ असता आणि सत्तारुढ विरोधी पक्ष असतात तर ही हे प्रकरण असेच रंगले असते.. तेंव्हा हा पक्ष योग्य आणि तो अयोग्य असे होत नाही ना? एखाध्याने चांगलं काम केलं तर त्यात पाय आडवा आणायलाच पाहिजे का? नामकरण ज्यांच्या म्हणण्याप्रमाणे झाले नाही तर असे लोक या रोडचा वापर करण्याचे सोडतील का? किंवा, सावरकरांचे नाव दिले तर सत्तारुढ पक्षाचे नेते या रोडवरुन येणे-जाणे वर्ज करतील.... दोन्हीही प्रश्न्नाचे उत्तर नाही, असेच आहे! मग वाद कशाला?
.... स्वदेस, सिनेमातला तो "मेलाराम" आणि त्याची मोहनला [शाहरुख खान] दिलेली पार्टनरशीपची औफर आठवतीय का.. त्यात तोही "मेलाराम का मोहन ढाबा" किंवा "मोहन का मेलाराम ढाबा" असे सुचवितो! मात्र शेवटी तोच हा विषय सोडुन देतोच ना!

असो... वादावादी कीतीही चालो... आपण मात्र मुंबईला गेलो कि या रोडवरुन एक चक्कर जरुर मारणार! आतापर्यत परदेशात आणि सिनेमातच पाहिलेलं असे रोड आता आमच्या भारतात - मुंबईत ही आहे, असं अभिमानाने सांगण्यासाठी आणि तो अनुभव घेण्यासाठी!

Monday, 8 December 2008

गेले ते दिवस... राहिल्या त्या उचापती ....

.... हा .... तर सांगायचा मुद्दा हा की, राणे सायब सद्ध्या लयच भावात आहेत.. त्यांना म्हणे "बरेच काही" आधीपासुनच माहित होते.... आणि लवकरच ते "ते गुपित" उघडे करणार आहेत.. बरीच एलेक्शनं पाहिली.. बंडखो-या पाहिल्या... पर ह्यांची बंडखोरी ...! स्वतःला "मिडियावाले" संबोधणारे हे साहेब, शेवटची अक्षता पडेपर्यंत नवरीच्या मामासारखे गप्प होते... खुर्ची मिळाली नाही आणि त्यांचातला खरा "मामा" जागा झाला की काय? आरं सायबा... चालु परिस्थितीचा तरी अंदाज असु दे ...!

'चार दिवस थांबा, काय करणार ते सांगतो!'- राणे
नेत्यांचाच दहशतवाद्यांना आसरा
राणेंची 'दादा'गिरी.. म्हणे, 'ताकद दाखवायला लावू नका!'

... बरं ठीक आहे.. आम्हीही तुमच्याच प्रहार/राची वाट बघतोय.... बघु तुम्ही काय मैदान मारताय ते..!


...भुंगा!