आंबे पूर्णिमा...
11 years ago
From today, painting is dead!
वैयक्तिकः मला तरी हा निकाल तितकासा योग्य वाटला नाही. मला कुणाचीही वैयक्तिक बाजु मांडायची नाही, पण काही मुद्दे असे जसं: व्यावसायिक किंवा फक्त तंत्रज्ञानावरील वेबसाईट्स ऐवजी लेखनामध्ये विविधता असणारे ब्लॉग यांची निवड अधिक असायला हवी होती शिवाय कधीतरी एखादी पोस्ट असणार्या ब्लॉग ऐवजी वारंवारीता असणारे ब्लॉग असायला हवे होते. असो, निकाल तर लागलाच आहे - विजेत्यांचे मन:पुर्वक अभिनंदन!!
स्पर्धेचे स्वरूप-
१. ब्लॉग मराठीतच लिहिलेला हवा (देवनागरी)
२. अठरा वर्षांपुढील कुणीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतं.
३. सर्वोत्तम ब्लॉग निवडण्याचे अधिकार पूर्णत: परिक्षक आणि स्पर्धा संयोजकांकडे असतील. त्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण देण्यास परिक्षक, संयोजक, स्टार माझा बांधिल नसतील. तुमच्या एन्ट्रीज
या तुम्हाला अटी मान्य असल्याच्या निदर्शक असतील.
४. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी blogmajha3@gmail.com या ई-मेल अँड्रेसवर ई-मेल करावा. ज्यात, तुमचे नाव, पत्ता, व्यवसाय, दूरध्वनी क्र, मोबाईल क्र, व ई-मेल द्यावा. ई-मेल अँड्रेस देणं अनिवार्य आहे. याशिवाय, तुमच्या ब्लॉगची लिंक द्यावी.
५. या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही.
६. एकावेळी एका स्पर्धकाला फक्त एकच ब्लॉग पाठवता येईल.
७. ब्लॉग पाठवण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०१०. स्पर्धेचे निकाल ऑक्टोबर २०१०च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होतील. तसेच, संबंधित विजेत्यांना पत्र अथवा ई-मेलद्वारे निकाल कळवला जाईल.
८. यानंतर ‘स्टार माझा’च्या खास एपिसोडमध्ये विजेत्यांचा सत्कार करण्यात येईल व पुरस्कार वितरण होईल.
९. स्पर्धेचे आयोजन, नियमावली, अटी, बक्षीसे यासंदर्भात कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय बदल करण्याचे अधिकार स्टार माझाकडे असतील.
११.ब्लॉगमधला कंटेंट स्वत:चाच असावा. जर अन्य स्त्रोतांकडून माहिती घेतली असेल, तर त्यांचा नाममिर्देश करावा. ब्लॉग या माध्यमाचे महत्व जपावे. ब्लॉग व त्यातील मजकूर आपलाच असल्याचे सिद्ध करणे, ही स्पर्धकाची जबाबदारी आहे.
ता. क.: एन्ट्रीज blogmajha3[@]gmail.com वरच पाठवा.
सदर स्पर्धेसाठीची ऑनलाइन प्रवेशपत्रिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तेंव्हा ६ मार्चपुर्वी आपला अर्ज पाठवा.