Categories

Aeroplanes

Aeroplanes

Wednesday, 3 June 2009

कोंकण यात्रा...

गेल्या आठवड्यात फॅमिलिसह कोंकण - तरकारली बीच - सिंधुदुर्ग - यशवंत गड - अंबोळगड आणि गगनगड [बावडा] [श्री. गगनगिरी म. आश्रम] - अशी यात्रा केली.. ! मस्त झाली.. कामाचा क्षीण घालवण्यासाठी अगदी हवी-हवी असणारी सुट्टी अशी कारणी लावली ;)

नेहमीप्रमाणे फोटो [भरपुर!] काढले.. अन् काही निवडक आल्बम खाली दिलेत..

Monday, 1 June 2009

कोणत्याही वेबसाईट्वर भारतीय भाषेत लिहा..!

१. वेबसाइटवर किंवा ब्लौग वर मराठी - भारतीय भाषेत कसे लिहता येईल? माझ्या ब-याच मित्रांनी मला ब-याचदा विचारलेला प्रश्न!
उत्तर सोपे आहे.. अगदी काहीच इंस्टाल न करता गमभन या वेबसाइटवर तुम्हाला मराठी - बांगला - गुजराथी - पंजाबी - कन्नड - मल्यालम - उडिया - तमिल - तेलगु - उर्दु या भाषांमध्ये लिहिता येईल.
त्या साइटवर टाइप करा आणि तुमच्या ब्लौग वर कौपी-पेस्ट करा.. शिवाय ब्लौगरच्या पोस्टींग मध्ये मराठी - हिंदी टायपिंगची सोय आहेच!

२. कोणत्याही वेबसाइटवर मराठी किंवा हिंदीमधुन प्रतिक्रिया - कमेंटस् कशा देता येतील?
यासाठी वरील पर्याय आहेच, शिवाय हे बौक्स - मराठी - हिंदी - फायरफौक्स ब्राऊजरच्या बुकमार्कस बार वर ड्रॅग - ड्रोप करा. मग ज्या साइटवर तुम्हाला कमेंट द्यायची असेल त्या साइटवर जाऊन ते बटन एकदा दाबा - ट्रान्सलेशन सक्रिय होइल आणि मग तुम्ही इंग्रजी मधुन शब्द लिहित जा.. स्पेस बार दाबला की तो शब्द मराठी किंवा हिंदी मध्ये रुपांतरीत होइल..!

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हीडिओ पहा...! [संदर्भ - डिजिटल इंस्पिरेशन]

Monday, 27 April 2009

काय लाईफ आहे.....

Wednesday, 1 April 2009

पुणे - वाढते ट्राफिक - प्रदुषण आणि नॅनोचे आगमन!

नॅनो येतेय - येतेय म्हणता आलीच की हो! मात्र वाहनांनी अन वाहन चालकांनी पुण्याची काय वाट लावलीय ते आपल्यासमोरच आहे... आणि त्यात नॅनो ची भर! मला फक्त नॅनोच टार्गेट करायची नाही .. तर सांगायचे आहे की.. आमचे रस्ते आणि स्वतः आम्हीही उद्याच्या वाढत्या वाहतुकीच्या अन् प्रदुषणाच्या समस्येसाठी तयार आहोत का?

हुम्म! 
आता करायचे तरी काय?
आलीया भोगासी, असावे सादर |
भार देवा [टाटा?] वरी ठेवुनिया ||


का... खालील मुद्दे लक्षात घेऊन आम्ही काही संकल्प करु?

१. गाडीचा वापर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीच करा.
... म्हणजे - कीमान अंतर १५-२०  की.मी. - एक मार्गे - असेल तर स्वतःचे वहानाने जा.

२. शक्यतो 'लिप्ट द्या - घ्या' - मात्र स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन!
... हो, म्हणजे तुम्हाला तुमच्या गाडीचे कौतुक सांगण्यासाठी कुणी तरी सापडेलच ना :)

३. खासगी वाहनांपेक्षा, बस किंवा शेअर्ड वेइकल चा वापर करा.
... आता हे म्हणजे - शाळा - औफिस - सिनेमा - फिरायला जाताना शक्यतो एकाच गाडीतुन जा.. कसं?

४. पुण्यातील आणि त्या अनुषंगाने - जागतिक प्रदुषण कमी करण्यासाठी मदत करा.
... आपल्या गाडीची वेळेवर सर्विसिंग वगैरे करुन.. शांत हौर्न बसवुन - गरज असेल तरच वाजवुन - गाडीतील डेकचा आवाज स्वतःला ऐकु येइल एवढाच ठेवा.. हा.. आम्हाला माहिती आहे, तुमच्या गाडीतला डेक लय झॅक वाजतो.. पण आमच्याकडेही आहे, हे लक्षात घ्या!

५. वाहतुकिचे नियम पाळा आणि दुस-यालाही - प्रसंगी - ते पाळण्यास भाग पाडा.
...सिग्नल तोडणे... नो-पार्किंग - वन-वे मध्ये घुसने... बस्स करा ना...  कुठे आपल्या आकलीचे तारे तोडता...?

६. मुलांना शक्यतो शाळेच्या बसनेच जाऊ द्या !
... हो.. समजले - तुम्हाला आपल्या मुलाच्या - मुलीच्या सुरक्षिततेबद्दल जरा जास्तच काळजी वाटते - म्हणुन तुम्ही स्वतः त्याला/ तिला सोडायला आणि आणायला जाता.. हो न्? पण तुम्ही सावधपणे चालवत असाल हो.. पण समोरच्याचं काय? तेंव्हा.. सबुरीनं आणि धिरानं घ्या!

कठीण प्रश्न आहेत?.. तुम्हाला वाटत असेल ना..

मला काय त्याचे.. ?
.... मग कुणाला? सध्याची परीस्थिती अशी आहे.. विचार करा - पुढच्या पिढीसाठी आपण हेच ठेवणार आहोत का?

रस्तेच ठीक नाहीत...!
.... म्हणुन काय तुम्ही गाडी चालवणं सोडलं नाही... ;)

सगळेच नियम तोडतात मग मीच नियम पाळायचा काय ठेका घेतलाय का?
... हां तर ठेका घ्या ना.. म्हणजे नियम पाळा... समोरच्याने नियम मोडला की राग येतोच ना..! किंवा एखाद्याची औनेस्टी बघुन 'मनातल्या मनात' तरी थँक्स म्हणावे वाटतं ना? तुम्ही ही तो "समोरचा औनेस्ट" बना ना!

आम्ही तु कोण रे आम्हांला सांगणारा?
... मी? तुमच्यातलाच एक... नियम पाळणारा ... पुण्याबद्द्ल.... अन् तुमच्याबद्दलही -  तळमळ वाटणारा ... माझ्यासाठी काय केलं यापेक्षा मी काय केलं - करु शकतोअसं विचारणारा ... कदाचित वरती म्हटल्या सारखा - समोरचा औनेस्ट [?]

आठवतयं?
कोईभी देश परफेक्ट नहीं होता... उसे परफेक्ट बनाना पडता है!


अजुन काय राहिलं का? ..मग सांगा ना!....
याच विषयांवर अजुन एक पोस्ट सापडली.. तिही वाचा!

Thursday, 26 March 2009

बाजार !

तुम्हाला आठवतंय?

कधी कधी मला माझ्या जुन्या आठवणी एक वेगळाच आनंद देऊन जातात.. नाही म्हटलं तर थोडा का होईना - एक फ्रेश मुड.... तुम्हाला आठवतयं:

१. तो दुरदर्शनचा गोल-गोल फिरत येणारा लोगो
२. दुरदर्शनचा तो पट्ट्या-पट्ट्याच स्र्कीनसेव्हर
३. मालगुडी डेज
४. देख भाई देख
५. रामायण
६. मिले सुर मेरा तुम्हारा
७. टर्निंग प्वाइंट
८. भारत एक खोज
९. आलिफ लैला
१०. ब्योमकेश बक्षी
११. तहकीकात
१२. ही मॅन
१३. सलमा सुलताना - ती दुरदर्शनवरची न्युज रीडर
१४. विको टरमरिक, नहीं कौस्मेटीक.... विको टरमरिक आयुर्वेदिक क्रीम
१५. ट्वँ.........ग!
वाशिंग पाउडर निरमा.. वाशिंग पाउडर निरमा.
दुध सी सफेदी, निरमा से आयी...
रंगीन कपडेभी खिल-खिल जायें!
१६. आय ऐम कौम्प्लॅन बौय [शाहिद कपुर] आणि आय ऐम कौम्प्लॅन गर्ल [आयेशा टाकिया]
१७. "सुरभि" वाले रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ
१८. आणि त्यानंतरचे - "मुंगेरीलाल जे हसिन सपने", करमचंद, विक्रम वेता़ळ आणि असे बरे........च!

८० आणि ९० सालचा काय काळ होता तो!
नो सिटबेल्टस् ... नो एअरबॅग्ज .... ट्रकच्या मागच्या 'फाळक्यात' बसणेही एक मेजवाणी असायची!
लहाण मुलांच्या त्या रंगबिरंगी "बाबा-गाड्या" ... "टॅपरप्रुफ बौटल टौप्स" चा आता-पता ही नाही!

सायकलच्या मागच्या चाकाला कार्डबोर्डचा तुकडा लाऊन त्याचा फटरररररार - मोटार सायकल सारखा - आवाज करत तासन् तास फिरायचे.. त्या सायकलच्या शर्यती... नो सेप्टी हेल्मेट्स, नो क्नी / एल्बो पॅड !

तहाण लागली की नळालाच तोंड लाऊन पाणी पिणे.. बौटल्ड वौटर - एक रहस्यच होते!

ते पोष्टाची तिकीटं... काडीपेटीचे कव्हर्स आणि बरंच काही जमा करण्याचा आणि जोपासण्याचे छंद!

सुट्टीच्या दिवशी, दिवसभर उनाडक्या - खेळ.. मात्र अंधार व्हायच्या आत घरी, ब-याचदा अगदी जेवणाच्याच वेळी!

खेळाच्या नादात अनेकदा पडलेले दात, खरचडले हात - पाय ... मात्र कुणीही तक्रार करायची नाही!

मित्रांसोबत चालत शाळेत जाणं... मोबाईलशीवायही आम्ही एकमेकांना नेहमीच शोधुन काढत असू! कसं? काही माहित नाही..!

खाण्यात अगदी केक, ब्रेड, चौकलेटस्, निंबुपाणी, साखरेचा तो आले-पाक... सगळं चालायचं... नो डायट - नथिंग!!

मित्रांना खेळायला बोलवाची ती ट्रीक - बेल न वाजवता अगदी चुपचाप मागच्या रस्त्याने जाणं...

बॅटच्या जागी ते लाकडी फळीचे क्रीकेट, त्या आट्या-पाट्या, सुरपारंब्या... डौक्टर - डौक्टर, लपाछपी ... असे किती तरी खेळ....

परीक्षेत नापास झालो तरी त्याच ग्रेडवर - वरच्या वर्गात ढकलला - अशी सोय..... नो नीड टु विजिट सायकॅट्रिस्ट, सायकोलोजिस्ट वा कौन्सेलर्स...

..... काय दिवस होते ते...!

स्वातंत्र्य, यश, अपयश , जबाबदा-या ... आणि या सर्वांसोबत एकमेकांबद्दल कमालीचा आदरही द्यायला अन् घ्यायलाही शिकलो..

................
.........................
................................

तुम्ही ही याच 'कालखंडातील' आहात का? .. हो..! तर मग मित्रांनाही याचा उल्लेख करा.... काय सांगावे कदाचित हे वाचुन तुम्हाला - तुमचा अन् मित्रांचा थोडा स्ट्रेस कमी होईल... नाहीच झाला तर वाढणार नाही हे मात्र नक्की... :)

[मला आलेल्या एका इ-मेलवर आधारीत - ही माझी मराठीतील आवॄत्ती]

Wednesday, 25 March 2009

माझा पती - करोडपती!

२८ मार्च : बत्ती गुल्ल!

मंडळी, २८ मार्चला जागतिक अर्थ - अर २००९  साजरा होतोय. अर्थात या दिवशी जगभरातील सुमारे ८५ देशातील ८०० पेक्षा जास्त शहरातील लोक या दिवशी दिवे न लावता "ग्लोबल वार्मिंग" कमी करायचा प्रयत्न करतात. दिवसभर ना सही, पण तुम्ही तुमचा "अर्थ - अर" तुमच्या पध्द्तीनेही साजरा करा... काही कल्पना या ठीकाणी आहेत. अधिक माहिती - इंग्रजीमध्ये - खाली आहे. तुम्ही स्वतःला या ठीकाणी रजिस्टर करु शकता!

For the first time in history, people of all ages, nationalities, race and background have the opportunity to use their light switch as their vote – Switching off your lights is a vote for Earth, or leaving them on is a vote for global warming. WWF is urging the world to VOTE EARTH and reach the target of 1 billion votes, which will be presented to world leaders at the Global Climate Change Conference in Copenhagen 2009.

This meeting will determine official government policies to take action against global warming, which will replace the Kyoto Protocol. It is the chance for the people of the world to make their voice heard.

Earth Hour began in Sydney in 2007, when 2.2 million homes and businesses switched off their lights for one hour. In 2008 the message had grown into a global sustainability movement, with 50 million people switching off their lights.

Tuesday, 24 March 2009

लिलाव !

कार पार्किंग!

Monday, 23 March 2009

२३ मार्च, हौतात्म्यदिनी शहिद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना सादर वंदन!


आमच्या विरुद्ध इंग्लंडचे बादशाह पाचवे जॉर्ज यांच्या विरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप ठेवण्यात आला होता आणि न्यायालयने आम्हाला त्या साठी फाशीची शिक्षा ठोठावली आहे. तेव्हा इंग्लंड नि हिंदुस्थान या दोन राष्ट्रात युद्ध सुरू आहे आणि आम्ही युद्धबंदी आहोत हे उघड होते. आमच्या काही पुढार्‍यांना सवलती देउन तुमच्या सरकारने आपल्या बाजुला ओढले नि त्यांनी तरुणांचा विश्वासघात केला याची आम्हाला चिंता नाही. ज्या स्त्रियांनी आपल्या सर्वस्वाची आहुती दिली आहे, पतीचे बलिदान दिले, भावाचा बळी दिला नि स्वत:चाही होम केला त्या आमच्या पार्टीच्या सदस्य आहेत म्हणून त्यांना त्या ’हिंसेवर विश्वास ठेवतात’ असे सांगुन हे राजकिय पुढारी आपल्या शत्रू समजतात. त्याचेही आम्हाला दु:ख नाही. पण तरीही हे युद्ध सुरुच राहील. स्वतंत्र आणि समाजवादी प्रजासत्ताक राज्य स्थापित होईपर्यंत हे युद्ध भडकतच राहील. आमचे बलिदान जतिंद्रनाथ नि भाई भगवतीचरण यांच्या बलिदानाने उज्ज्वल केलेल्या इतिहासाचा अध्याय मोठा करील. आपण आम्हाला फासावर लटकाविण्याचा निश्चय केलेला आहे, व तसे करणारच! आम्ही कधी आपलयाला विनंती केली नाही किंवा दयेचे भीक मागीतली नाही.

आम्हाला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे ती अशी की तुमच्या न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आम्ही युद्ध पुकारले होते व म्हणुनच आम्ही युद्धबंदी आहोत. तेव्हा आम्हाला युद्धाबंद्यांप्रमाणेच वागविण्यात यावे अशी आमची मागणी आहे. तुमच्या न्यायालयाने जे म्ह्टले तेच तुम्हाला मनापासून म्हणायचे होते हे सिद्ध करणे आणि ते कृतिने सिद्ध करणे हे आता तुमच्याच हाती आहे! आमची तुम्हाला अगदी मनापासूनची एक विनंती आहे आणि तुम्ही ती मान्य कराल अशी आशा आहे की, तुम्ही आपल्या सैनिकी विभागाला एक सैन्यपथक वा बंदूकधारी पथक पाठवुन आम्हाला गोळ्या घालुन सैनिकाप्रमाणे मारण्याचे आदेश द्यावेत. - शहिद भगतसिंग 


निशब्द अन् नतमस्तक,
भुंगा!

Friday, 20 March 2009

माणुस म्हणुन जगण्यासाठी....