Sunday, 16 March 2008

तुम्ही तुमचे बँक खाते अपडेट करुन किती दिवस झाले...?

खास काही नाही... म्हणजे तुमचा बँलन्स विचारत नाही... पण असलेला बॅलन्स व्यवस्तित आहे याची खात्री करायला सांगतोय... आजकाल इंटरनेट बँकिंगमुळे ते काही फ़ार अवघड राहिले नाही ... तरीपण आपले बँक खाते आणि त्यातील जमा - वजा रक्कम यांचा ताळमेळ वरचेवर पाहणे गरजेचे बनले आहे...

सांगायचा मुद्दा हाच की गेले दोन - तीन महिने माझ्या खात्यातुन "सर्विस चार्ज" या नावाने दरमहा ५०० रु. कापले जात होते... आज बँकेला फ़ोन करुन आणि तशी मेल पाठवुन चांगलाच जाब विचारला... या आधीही तसा जाब विचारला होताच.... तर उत्तर की माझे "सॅलरी अकाउंट" बंद झाले असुन ते आता "सेव्हींग्ज अकाउंट" मध्ये रुपांतरीत करण्यात आले आहे व ते चालु ठेवण्यासाठी मला रोजचा बॅलन्स १०,००० रु. ठेवणे गरजेचे आहे.... गेल्या महिन्यातील तक्रारीच्या उत्तरादाखल माझे खाते "झीरो बॅलन्स" करण्यात आल्याचे लेखी उत्तर - ईमेल - त्यांनी पाठवला.... आणि तरीपण या महिन्यात पुन्हा पैसे कापले... च्या *** !

नोकरपेशा माणसाला दहा हजाराचा बॅलन्स ठेवुन कसे चालेल... माझे घर आणि खर्च काय यांचा ब** देणार काय? आणि एकदा "झीरो बॅलन्स अकाउंट" करुनही पुन्हा पैसे कापण्याचे कारणच काय..?

... असा तसा सोडणार नाय काय... चांगलाच फ़ैलावर घेतो - सुक्काळीच्यांना ॥!

दि : २६ मार्च 2008
... नाहीच सोडले ...!
..... हा हा हा ... "त्या बँकेकडुन" झालेल्या चुकिबद्दल "लिखित माफीनामा " " पुन्हा अशी चुक होणार नसल्याची खात्री " दोन्ही मिळवले ....! झक्कास ..!!

चला ... बघू आता ..!

...भुंगा!


0 comments: