Categories

Aeroplanes

Aeroplanes

Thursday, 27 November 2008

भावपूर्ण श्रद्धांजली...!




"शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा"
- मिर्जा ग़ालिब.

..... त्या वीर शहीदांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण श्रद्धांजली...!


BGImage: yoshiko

Monday, 24 November 2008

गेला आठवडा....!

.... आजकाल दिवस जरा मोठे झालेत काय हो... जसा जसा परतायची वेळ जवळ येतेय... दिवस जातच नाही.... :( .. कदाचित परतायची ओढ जरा जास्तच लागलीय ... असो... ! आठ्वडा नेहमीप्रमाणेच कामात गेला....!

... हा ..... शनिवार मस्त लोळत काढला... इकडे टी.व्ही. वर भारतीय कार्यक्रमांचा जरा दुष्काळच आहे... त्यामुळे तेलगु मधला "गजनि" लॅपटौपवरच बघितला.... काय बोलताहेत हे समजत नव्हतं , मात्र एकंदरीत स्टोरी समजण्यासाठी फार त्रास झाला नाही....मस्त वाटला सिनमा.... आता डायलौग्ज आणि गाणी यासाठी अमिर दादांचा सिनमा बघायचा .. !

रविवारी मात्र आम्ही इकडे भल्या पहाटे ९.०० वा. उठुन अभ्यंगस्नान केले.... दोन मैतर लंडन वरुन आले होते.. त्यांना केंब्रिज - केंब्रिज खेळायचे होते - म्हणजे पहायचे होते.. गाडी काढली आणि सरळ केंब्रिज.. !
फेमस कौलेजेस आणि फोटोग्राफिनंतर ते फित्सविलियम म्युझिअम पाहता - पाहता मस्त २-३ तास गेले.... मग थोडा वेळ सिनेवल्ड मध्ये गेम्स पाहण्यात घालवला... आणि नान्डो'ज मध्ये मस्त चिकन वर ताव मारला.. [शाकाहारी लोकांनी कृपया - व्हेज बर्गर आणि फिंगर चिप्स असे वाचावे..!]...

बस्स.... बाकी काय... सातच्या आत घरात ...!

...भुंगा!

Monday, 17 November 2008

नमस्ते लंडन...

..... या विकेंडला लंडनला जाऊन आलो...... ही वारीसुध्दा मस्त झाली .. नाही म्हणजे पाठीमागची वारी जरा खासच होती... पहिली-वहिली होती ना...! यावेळी... लंडन सोबत - विंम्बली स्टेडियमला पण जाऊन आलो....
या शिवाय नेस्डेनच्या स्वामी नारायण मंदिरातही ... जगप्रसिध्द आणि गिनिज बुक मध्ये रेकौर्डस असलेले हे मंदिर इकडे सायाबाच्या देशात ....वा!

... नेहमीप्रमाणे काही छायाचित्रे इथे आहेत ..


...भुंगा!

Saturday, 8 November 2008

केंब्रिज सिटी सेंटर , किंग्ज कौलेज आणि थोडे आसपासचे फोटो ......


... नेहमीप्रमाणे काही छायाचित्रे इथे आहेत ..

...भुंगा!

Friday, 7 November 2008

केंब्रिजचे फायरवर्क - आतिषबाजी...


.... परवा नोव्हेंबरला केंब्रिजचे फायरवर्क - आतिषबाजी - पहायला गेलो होतो... वा! मस्त मजा आली.. मागच्या ट्रीपच्या वेळी [२००६] पण हा इव्हेंट मी पाहिला होता... फार मोठा कार्यक्रम होता राव तो... या वर्षी स्पौसररस मिळाल्यामुळे थोडासा फरक जाणवला.... काही का असेना.. या वर्षीच्या हुकलेल्या दिवाळीची मजा आम्हीं इथे भरुन काढली...!
दरवर्षी ५ नोव्हे. ला केंब्रिज, यु.के. मध्ये आतिषबाजी केली जाते... अंदाजे १९५० च्या आसपास ही रीत सुरु झाली आणि पहिली ३० वर्षे काही लोकल फॅमिलिजनी मिळुन हा गेट-टुगेदर सारखा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली. नंतर १९८० मध्ये टोनी हौब्स यांनी हा पुर्ण कार्यक्रम आपल्या हाती घेतला... आज केंब्रिज फायरवर्क्स एक परिपुर्ण ट्रेडिंग कंपनी म्हणुन कार्यरत आहे ..!
... नेहमीप्रमाणे काही छायाचित्रे इथे आहेत ..

...भुंगा!

Thursday, 6 November 2008

मामला मार्केटचा ....



Img: © http://www.kaltoons.com

...भुंगा!


भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोफत सौफ्टवेअर्स - सौजन्य - मायक्रोसौफ्ट

Image representing Microsoft as depicted in Cr...Image via CrunchBase
मंडळी, बिल गेट्स साहेबांच्या कॄपेने भारतीय विद्यार्थ्यांसाठी, ड्रीमस्पार्क [DreamSpark] योजनेअंतर्गत काही सौफ्टवेअर्स मोफत - म्हणजे - फुकट देण्यात येत आहेत.
यामध्ये आहेतः
  • Windows Server,
  • Microsoft Visual Studio,
  • Expression Studio,
  • Virtual PC
आणि इतर काही ....

सौफ्टवेअर्स कसे मिळवालः
... अगदीच सोप्प आहे. कोणत्याही एनआयआयटी [NIIT] किंवा ऍपटेक [Aptech] ट्रेनिंग सेंटमध्ये जा.
आपल्या कौलेज चे ओळखपत्र दाखवा आणि सौफ्टवेअर्स घेऊन जा..

अधिक माहिती : http://www.dreamsparkindia.com/dreamspark/GetDreamTools.aspx?Tab=1


...भुंगा!


Reblog this post [with Zemanta]