Monday, 17 November 2008

नमस्ते लंडन...

..... या विकेंडला लंडनला जाऊन आलो...... ही वारीसुध्दा मस्त झाली .. नाही म्हणजे पाठीमागची वारी जरा खासच होती... पहिली-वहिली होती ना...! यावेळी... लंडन सोबत - विंम्बली स्टेडियमला पण जाऊन आलो....
या शिवाय नेस्डेनच्या स्वामी नारायण मंदिरातही ... जगप्रसिध्द आणि गिनिज बुक मध्ये रेकौर्डस असलेले हे मंदिर इकडे सायाबाच्या देशात ....वा!

... नेहमीप्रमाणे काही छायाचित्रे इथे आहेत ..


...भुंगा!

5 comments:

लंडन नं! मस्त आहे!!

@ प्रभास ..
लंडन मस्त आहे ... आणि लंडनवासी सुध्दा ;)

पण ... आपला देश ... आपला गाव.... अल्टीमेट आहे ..!!

हो, आपला गांव, देश तर अल्टीमेट आहेच! प्रश्नच नाही!!

पण मला तिथल्या लोकांचा शिस्तबद्धपणा फार भावतो. (हा, काही चुकीचे गुणपण असु शकतात. पण ’ढग काळा ज्यातुन फिरला नाही.. नभ ऐसे मी अद्याप पाहिले नाही..’) आपल्यावर त्यांनी १५० वर्षे राज्य केले, पण त्यांचा अतर्गत कारभार सगळा शिस्तीचा होता. त्या गुणाचं कौतुक करायलाच हवं आपण. नाही का?

बाकीच्या गोष्टी आत्ता उगाळत बसण्यात अर्थ नाही, कारण आता आपण स्वतंत्र आहोत, आणि तिथुन पुढे बरीच प्रगतीसुद्धा केलेली आहे. :)

हां.... बरोबर ... त्यांची शिस्त आणि 'मॅनर्स' अगदी कौतुक करण्यासारखे, यात अजिबात दुमत नाही! ... आणखी म्हणजे .. कामाचं 'ऍप्रिशिएशन' करणं ... 'सौरी - थॅक्स' .... दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांचं - ड्राइव्हिंग ... काय काळजी घेतात राव दुस-यांची -आणि पायी चालणा-यांची ...! .. वाहतुकीचे नियम वगैरे .. सही ..! इकडे गाडी चालवण्यातला आणि आपल्याकडे पुण्यात गाडी चालवण्यात अगदीच जमिन-आकाशाचा फरक आहे... नियम तेच आहेत .. फक्त आपल्याकडे आपण पाळत नाही... आणि इथे पाळताच..!

हम्म... बाकी तुझ्या म्हणण्याशी सहमत ..
[बाकीच्या गोष्टी आत्ता उगाळत बसण्यात अर्थ नाही, कारण आता आपण स्वतंत्र आहोत, आणि तिथुन पुढे बरीच प्रगतीसुद्धा केलेली आहे.]

’गांव बदलला की पाणी बदलतं’
इकडंतर आख्खा देशच बदलतोय!