२०२३ साली चीनचे सैनिक तिबेटमध्ये घुसले अणि अनेक मंदिरांचा, गूढ ठिकाणांचा त्यांनी विध्वंस आरंभला. त्या मोहिमेत त्यांच्या हाती लागलं संस्कृतमधलं एक प्राचीन हस्तलिखित. हरियाणा विद्यापिठाकडुन त्यांनी त्या हस्तलिखिताचा अनुवाद करुन घेतला आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटले! कारण त्या हस्तलिखितात लिहिलं होतं, भारतात एका गुढ ठिकाणी अशी एक वस्तू आहे की जी हाती लागली तर तिच्या सहाय्याने संपुर्ण विश्वाची रह्स्यं उघडतील.माणुस संपुर्ण विश्वावर ताबा मिळवू शकेल! कर्मधर्मसंयोगानं त्या वस्तूचा ठावठिकाणा चिनी लोकांना लागला आणि मग सुरु झाला एक जीवघेणा पाठलाग! एक गट निघाला ती वस्तू मिळवायला तर दुसरा त्या वस्तूचे विसर्जन करायला - बिंदुसरोवरात. कुठे आहे ते बिंदुसरोवर? कोणती रहस्यं दडली आहेत त्यात?
वास्तवाकडुन अदभुततेकडे नेणारी आणि प्रतिक्षणी उत्कंठा वाढवणारी सर्वस्वी अनोखी कादंबरी!
नावः बिंदुसरोवर
लेखकः राजेन्द्र खेर
किंमतः रु. १६०/-
ऑनलाइन खरेदी: रसिक किंवा मायबोली
..... तुम्ही काय वाचताय?
5 comments:
कादंबरीबद्दल लिहून तुम्ही उत्सुकता वाढवलीत, भुंगा. आता तर ही कादंबरी विकत घ्यायलाच हवी.
@आदिती,
कादंबरीची ही प्रस्तावना पाठीमागच्या पानावर आहे... आत्ताच कादंबरी हातात पडलीय... लगेच मोबाइल वर फोटो क्लिक केला आणि पोस्ट लिहिली..!
या कादंबरी बद्दल मी चांगलंच एकलंय... तेंव्हा आपणही जरुर वाचा!
आभार!
झाली कादंबरी वाचुन??
@प्रभास,
नाही आजुन, १३ प्रकरणे झालीत.. मस्त आहे! आज संपवायचा विचार आहे!
झाली कादंबरी वाचुन!! बर्याच दिवसांनी असं थ्रिल वाचण्यात आलं.. झक्कास.. बघा वाचुन!
Post a Comment