आज संध्यकाळी काही औषधे आणण्यासाठी मेडिकल स्टोअर मध्ये गेलो होतो... स्वाईन फ्ल्युच्या भीतीमुळे म्हणा वा आजारी वातावरणामुळे असो, स्टोअर हाऊसफुल्ल होतं..एक बुरखा - म्हणजे चेहर्यावर मुंडासे गुंडाळलेली - घातलेली बाई त्या गर्दीत घुसुन सर्वात पुढे होऊन मास्क घेण्याच्या तयारीत होती... साहजिकच सर्वांचे लक्ष तिच्याकडे लागुन होते.
Image by Getty Images via Daylife
ती: ये मास्क दिखाना...तो: ये लिजिये..
ती: क्या कीमत है?
तो: १० रु.
ती: मेहंगा है..
तो: ... डिस्पोजेबल है, मॅडम
ती: मतलब - युज ऐंड थ्रो..
तो: हां...
......
.........
ती: वो दिखाना... कितने का है?
तो: ३० रु.
ती: बहोत मेहंगा है! ... डिमांड है, इसलिये इतना मेहंगा बेच रहे हो....
तो: नही मॅडम.... हमेंभी तो मेहंगा मिलता है!
....इथपर्यंत सगळं ठीक...
त्या नंतर त्या बाईने, मुंमुडासे खाली ओढुन तो मास्क लाऊन बघितला.... बसतोय असं वाटल्यानंतर, तिने तो परत ठेऊन नविन मास्क घेतला व पैसे देऊ लागली... समोरच्या एकाने तिला विचारले - मॅडम, अगर आपने वो पहले वाला मास्क लगाके देखा है तो वही खरीद लिजिये ना.... वो वैसेही वापस करके आप नया कैसे ले रहे हो...?
आपल्याला अगदीच काही न कळाल्याच्या आव आणत ती त्याला म्हणते, की मैने तो सिर्फ देखा के बैठता है की नही! आणि पैसे देऊन ती बाहेर पडली...!
दुकानदार, त्याला सांगेपर्यंत, तो मास्क इतर मास्क मध्ये मिसळुन परत ठेऊन देतो!!
एकतर स्वाईन फ्ल्यु संसर्गजन्य... त्यात असे लोक... मास्क वापरुन तो परत ठेवुन दुसरा उचलतात... आपण सुरक्षित झालो म्हणजे झालं... दुसर्याचं काय आपल्याला?
कसे लोक असतात ना...? आपण फार सुशिक्षित आहोत हे दाखवण्यासाठी केवढा मुर्खपणा करतात!
5 comments:
अशा लोकांना मराठित येडा बनुन पेढा खाणारे लोकं म्हणतात.. !
avaghad aahe. adnyanacha kahar mhanaycha ani kaay. tumcha observation changla hota baki.
लोक सोशल रीस्पॉन्सिबिलिटी कधी समजणार आहेत देव जाणे! मास्कही - कपड्यांसारखे - ट्राय करुन बघताहेत! धन्य.. धन्य!!
haha :)hight ahe !!
असे लोक कीटकनाशक घेताना काय करत असतील? :-)
Post a Comment