गेलं वर्ष काही चांगल्या आठवणींपेक्षा वाईट अनुभवातच जास्त गेलं. या वर्षातल्या माझ्या काही आठवणी...
ऑगस्ट २००८:
- ऑफिसचा "फाउंडेशन डे" आनंदा व्हॅली या ठीकाणी निसर्गाच्या सान्निध्यात साजरा.
- गणपती बाप्पा मोरया!
- केंबोर्नच्या गेस्ट हाऊसमध्ये दिवे लाऊन साजरी केलेली "शांत" दिवाळी - अविस्मरणीय!
- कॅब्रिजचे फायरवर्कः या वर्षीच्या हुकलेल्या दिवाळीची मजा आम्हीं इथे भरुन काढली...!
- लंडन सोबत - विंम्बली स्टेडियमला पण जाऊन आलो. या शिवाय नेस्डेनच्या स्वामी नारायण मंदिरातही ... जगप्रसिध्द आणि गिनिज बुक मध्ये रेकौर्डस असलेले हे मंदिर इकडे सायबाच्या देशात ....वा!
- मुंबईवरच्या त्या दहशतवादी हल्ल्याचं लाईव्ह प्रक्षेपण केंबोर्न मधुन पाहणं... टि.व्ही. वरच्या त्या मुर्खांना आतघुसुन मार मार मारावं असं वाटणारं... आतुन आक्रोश करणारं मन... भरलेले डोळे... सारं कसं सुन्न करणारं. ती काळी रात्र तशीच जागुन काढलेली... ! त्या वीर शहीदांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण श्रद्धांजली...!
- यु. के वरुन परत. मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यानंतरचं एअरपोर्टवरचं वातावरण, अफवा यांनी लोकांना जीव मुठीत घेऊन - चुपचाप बाहेर पडताना पाहणं त्या दहशतवादी हल्ल्याची जाणीव वारंवार करुन देत होतं
जानेवारी २००९:
- छोकरीच्या शाळेच्या दाखल्यासाठी बिशप स्कुलमध्ये हजर राहणे आणि इंटरव्ह्युव देणे... नोकरीच्या वेळीही आलं नव्हतं तेवढं टेंशन होतं!
- मनात नसतानाही पुन्हा यु.के. ला जावं लागलं. छोकरीच्या शाळेचं/ दाखल्याच टेंशन आणि राहुन राहुन उठणार्या आतंकवादी हल्ल्याच्या अफवांचं वेगळंच टेंशन!
- लक्ष्मणराव देशपांडे यांचे निधन. लंडन मधेच असल्याने त्यांच्या "वराड निघालय लंडनला" नाटकाच्या आठवणी ताज्या झाल्या... ऑफिसमधुन येऊन - रात्री जागुन तो व्हि.डि.ओ. पुन्हा पाहिला.
- कॅबोर्नचा स्नो-फॉल मस्तच होता!
- केंबोर्न मध्ये मी साजरा केला - मराठी चित्रपट सप्ताह!
- यु.एस. मध्ये लिलावात काढलेल्या गांधींच्या काही वस्त बोली जिंकुन परत मिळवल्याबद्दल विजय मल्ल्यांचे फार कौतुक वाटले... मंड़ळ आपले आभारी आहे!
- एकाच वेळी चार प्रोजेक्टस वरती काम करणं ? मात्र रिजल्टस अपेक्षेपेक्षा चांगले होते.. अगदी टॉप मॅनेजमेंटने नोंद घेऊन खास "थॅक्स" मेल लिहिली होती!
- यु.के. वरुन परत आल्यानंतर - मुंबई एअरपोर्टवर स्वाईन फ्ल्यु ची टेस्ट न होता केवळ नाव - पत्ता लिहुन जायलासांगणे - अगदीच सरप्राइजिंग होतं!
- फॅमिलीसहितची लाँग पेंडिंग कोंकण यात्रा चांगली झाली
- पंढरपुरला जाणार्या पालखीच्या मार्गात तीन तास बसुन होतो. मात्र पालखीचे दर्शन - विठ्ठलाच्या दर्शनाइतकेच जिवंत!
- स्वत:चाच अपघात घडताना पाहणे - अहो आश्चर्यम!
- पॉप संगिताचा बादशाह मायकल जॅक्सनचे गुढ निधन.
- कारगिलच्या शहिदांना आदरपुर्वक श्रद्धांजली.
- मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये जिवंत खलनायक उभा करणारे निळु फुले यांचे निधन.
- संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या "आयुष्यावर बोलु काही" चा ५०० वा भाग [टि.व्ही वर] बघताना डोळे भरले होते.. कदाचित मीही काहीतरी मीस् केलं होतं.. करत होतो!
- स्वाईन फ्ल्यु चा भारतातला पहिलाच बळी पुण्याचा... कुणाची चुक, काय कारणं.... अनेक अनुत्तरीत प्रश्न!
अरे हां, तुम्ही म्हणाल - हे कोणतं वर्ष मधेच उद्भावलं ?
तर - काल माझा वाढदिवस होता.. आणि वरच्या आठवणी ऑगस्ट २००८ ते ऑगस्ट २००९ या वर्षाच्या आहेत!
7 comments:
Belated Happy Birthday....
Happy B'Day!!!
@महेंद्रजी, मनमौजी,
आपल्या शुभेच्छांबद्दल अनेक आभार!
सगळा overview मस्त घेतलाय.
वाढदिवसाच्या विलंबित (म्हणजे वरातीमागून घोडे शैलीत) शुभेच्छा...
@पंकज,
... आभार :)
Saheb aamhala maf karave aamhi aapula vadhdivas visarlo, kshama aasavi
@विशाल,
काही हरकत नाही, भाऊ.. !
Post a Comment