गुगलचे कॅलेडर आपणास माहितच असेल. बरेच लोक - मी सुध्दा - या कॅलेंडरचा वापर आपल्या दैनंदिन अपाँट्मेंटस् - रिमाइंडर यासाठी करतात. या द्वारे तुम्ही ई-मेल आणि मोबाईलवर देखील एस.एम.एस. च्या स्वरुपात रिमाइंडर सेट करु शकता.
कामाच्या गडबडीमध्ये म्हणा वा लक्षात न राहिल्याने आपण बरेच काही विसरुन जातो... जसे मित्रांचे वाढदिवस ... इंश्युरंस च्या पेमेंट तारखा ... टी.व्ही. वर येणारा एखादा आवडता प्रोग्राम किंवा सिनेमा... येवढेच नाही तर औषधाचे डोस ही! तर तुम्ही अशा गोष्टी न विसरता करु शकता - गुगलचे कॅलेडर च्या मदतीने!
कसे करालः
१. गुगल कॅलेंडरला जीमेलच्या लॉगिन - पासवर्डने लॉगिन करा - किंवा तुमच्या जीमेलच्या डाव्या - वरच्या कोपर्यात दिसणार्या कॅलेडरवर क्लिक करा.
२. कॅलेडर उघडेल.
३. उजव्या - वरच्या बाजुला "सेटिग्ज" या लिंकवर क्लिक करुन "मोबाईल सेटअप" या टॅब मध्ये जा. ही स्क्रीन अशी दिसेल.
४. या ठीकाणी - इंडिया सिलेक्ट करुन त्याखाली आपला मोबाईल नंबर द्या आणि - "सेन्ड वेरीफिकेशन कोड" हे बटन क्लिक करा.
५. तुमच्या मोबाईलवरती सहा अंकी एक नंबर येईल, तो खालच्या वेरिफिकेशन बॉक्स मध्ये टाइप करुन "फिनिश सेटअप" क्लिक करा.
हे झालं - मोबाईल वरती रिमाइंडर येण्यासाठीचे सेट-अप.
आता तुमचे कॅलेडर - असेलच! - नसेल तर "सेटिंग्ज" मध्ये जाऊन - कॅलेंड टॅबमध्ये असणार्या "क्रीएट न्यु कॅलेडर" वर क्लिक करुन त्यात विचारलेली महिती भरा. तुमचे कॅलेंडर तयार!
आत रिमाइंडर सेट करण्यासाठी तारीख निवडा - डाव्या बाजुला दिसणार्या अंकावर क्लिक करा. मग उजव्या बाजुस दिसणार्या योग्य वेळेवरती क्लिक करा आणि त्यात त्या रिमाइंडरचे नाव घालुन इव्हेंट सेव करा. ही स्क्रीन अशी दिसेल.
आता पुन्हा त्या इवेंटवर क्लिक केल्यास तो एडिट करण्यासाठी ओपन होईल.येथे तुम्ही एस.एम.एस. साठी रिमाइंडर सेट करा. ही स्क्रीन अशी दिसेल. उजव्या बाजुला दिसणार्या ऑप्शन्स मधुन एस.एम.एस. किंवा ई-मेल असे रिमाइंडर्स सेट करा.
शिवाय मध्यभागी - कॅलेंडर मध्ये तुम्ही हा इव्हेंट कधी - कधी रिपिट करायचा हे सुध्दा सेट करु शकता. म्हणजे समजा हा इव्हेंत जर तुमच्या मित्राचा वाढदिवस असेल तर त्या रिपिटमध्ये "इयरली" असे सिलेक्ट करा. म्हणजे तुम्हाला हा एस.एम.एस. दर वर्षी येत राहिल - आणि तुम्ही मित्रांचे वाढदिवस विसणार नाही..!
आणि हो, ही सुविधा फ्री आहे. आता अशी सर्विस देणार्या इतर वेबसाइट्स ही आहेतच. त्यामुळे गुगलच का? हा वाद नको!
अधिक माहिती / कोणते मोबाईल सर्विस वाले चालतील?
तुमचे म्हणने?
2 comments:
dosta, mi karto use he.. khup upyogi service aahe. I've imported F1 calendar into google and set alerts, helps a lot
मी पण युज करतोय ही सर्विस, हं तसं मोबाइल मध्येही कॅलेण्डर आहे आणि त्यात रीमाइंडर नोट्स पण लावता येतात, पण गुगल कॅलेण्डर इज जस्ट एव्हसम... आणि सर्व डेटा माहितीजालावर साठविला जात असल्यामुळे आपल्या नोट्स उडून जाण्याची भीतीच नाही..:)
Post a Comment