Monday, 28 September 2009

स्टार माझा - ब्लॉग माझा स्पर्धा.

नमस्कार,........!
'ब्लॉग माझा' स्पर्धेचं हे दुसरं वर्ष. गेल्या वर्षी 'स्टार माझा'नं ही स्पर्धा सुरू केली. मुळात ब्लॉगिंगसारख्या नव्या माध्यमाबाबत त्यातही मराठी ब्लॉगिंगसंदर्भात विशिष्ट वर्तुळातच चर्चा, उपक्रम होताना दिसतात. म्हणूनच ब्लॉगिंगचा प्रसार व्हावा, नवे ब्लॉग निर्माण व्हावेत, सध्या जे मराठी ब्लॉगर्स आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं; या हेतूने मराठी ब्लॉगर्ससाठीची अशी ही स्पर्धा पहिल्यांदाच 'स्टार माझा'नं आयोजित केली आहे.
- स्टार माझा - वरुन, मराठी ब्लॉगर्सच्या माहितीसाठी.

ब्लॉग मराठीतच लिहिलेला हवा
ब्लॉग पाठवण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २००९.
अधिक माहिती = ब्लॉग माझा स्पर्धा

7 comments:

माहितीबद्दल धन्यवाद... मागच्या वर्षीची स्पर्धा बघितली होती स्टार माझावर, पण त्यावेळी माझा ब्लॉग नव्हता...! खुप उत्सुकता होती, आता नक्कीच प्रयत्न करणार... या माहितीबद्दल पुनः एकदा आभार तुझे दादा...

हो रे .. जमल तर मला सुद्धा भाग घ्यायचा आहे.. पण त्यासाठी ब्लॉग मस्त सजवायला हवा. शिवाय कंटेंट सुद्धा चांगले हवे.

अरे एकदम भन्नाट डिजाईन केले आहेस.Fantasic....रंग संगतीची प्रसंशा करावी तितकी थोडीच आहे.किती वेळ जरी ते blogs आणि डिजाईन पाहिले तरी असे वाटत राहते की अजुन काही तरी पहायचे राहिले आहे,वाचायचे राहिले आहे.
आणि आम्ही अजुन (dil mange more) ची मागणी करतो :) .....
आमच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या बरोबर आहेतच .

धन्यवाद विशाल, रोहन आणि सचिन,
लॉग विकेन्ड चा थोडा वेळ कामी लावला... शिवाय "ब्लॉग माझा" साठी निवेदनही पाठवलयं ;) बघु या... उद्या निकाल आहेत!

खूपच छान माहिती आहे. वाचून आनंद झाला.

अरे वाह

खूपच छान माहिती धन्यवाद

भाग घ्यावा म्हणतोय तेवढाच एक वेगळा अनुभव अशी स्पर्धा मराठी ब्लॉगसाठी होईल असे वाटत नव्हते

स्टार माझाचे हि धन्यवाद
तसेच तुमच्या ब्लॉगलाहि शुभेच्छा

लवकरच आपणाला स्टार माझा वर पारितोषिक घेताना पाहू अशी आशा करतो

@विक्रम,
जरुर भाग घे. मीही जरा नविन ग्राफिक्स टाकलेत. तेवढंच नविन लुक!
शुभेच्छांबद्द्ल अनेक आभार! बघुया, उद्या निकाल आहेच!