अजुनही बर्याच लोकांसाठी इंटनेट म्हणजे = इंटरनेट एक्सप्लोरर असंच समीकरण आहे. कदाचित त्यांना नविन ब्राऊजर बद्दल माहिती नसावी किंवा ते वापरण्यात थोडीशी कचराई वाटत असावी. हां, मात्र एक वेळच अशी होती की इंटरनेट ब्राऊज करण्यासाठी आय.ई. हाच ब्राऊजर वापरण्यात यायचा. बदलत्या टेक्नॉलॉजीप्रमाणे ब्राऊजरही बदलत गेले. मग नेटस्केप नेविगटर आला, त्यानंतर सफारी, मोझिला, ओपेरा, फायरफॉक्स, फ्लॉक, क्रोम ..... असे बरेच!
आता प्रश्न निर्माण झाला, की तुम्ही तयार केलेली वेबसाईट/ ब्लॉग या ब्राऊजरांबरोबर कंपॅटीबल आहे की नाही हे कुणी पहयचं? बर्याचदा आपण आपला ब्लॉग आपल्या आवडत्या ब्राऊजरमध्येच चेक करतो. आपले क्लाईंट, विजिटर्स वापरत असणार्या ब्राऊजरबद्दल आपण विचारही करत नाही. मात्र कार्पोरेट किंवा वेब दुनियेत असं चालत नाही. तुम्ही बनवलेला ब्लॉग/ डिझाईन, वेबसईट किंव वेब प्रोजेक्ट ब्राऊजर कंपॅटीबल असणं तेवढंच महत्त्वाचं मानलं जातं.
आता त्यासाठी प्रत्येक ब्लॉगर काळजी करेलच असं नाही. करण त्याचे/ तिचेही काही टेक्निकल रिस्ट्रीक्शन्स असतातच. तर अशा वेळी बरेचजण वेबसाईटच्या खाली - फुटर मध्ये - संबधित ब्राऊजर आणि स्क्रीन रिजॉल्युशन बद्दल नोट लिहितात की - हा ब्लॉग/ वेबसाईट "या" ब्राऊजर मध्ये आणि "या" स्क्रिन रिजॉल्युशन मध्ये चांगली दिसेल! पण हा एक तात्पुरता पर्याय होऊ शकेल. तुमचा क्लाईंट/ विजिटर तो ब्राऊजर वापरेलच असं नाही ना! शिवाय त्याला तुमचा आवडता ब्राऊजर डाऊनलोड करण्यासाठी जबरदस्ती नाही करता येत ना!! आणि शेवटी लिहिलेली ही नोट कीती लोक पहातील हाही एक प्रश्नच आहे!
आता दुसरा पर्याय म्हणजे, अशी तुमच्य विजिटरना अशी नोट नजरेस पडेल अशा ठिकाणी दाखवणे. म्हणहे वरच्या - हेडर च्या भागात. पण वारंवार बदलणार्या आणि नविन वर्जन येणार्या ब्राऊजरबद्दल कोण माहिती ठेवणार आणि ती नोट अपडेट करणार? त्यासाठी खालील पर्याय करता येतील.
१. खाली दिलेली स्क्रिप्ट तुमच्या ब्लॉगच्या </head> च्या लगेच वरती पेस्ट करा!
<link href='http://sites.google.com/site/blogstoresite/blogger/pushup.css' rel='stylesheet' type='text/css'/>
<script src='http://sites.google.com/site/blogstoresite/blogger/pushup.js' type='text/javascript'></script>
जर ब्राऊजर लेटेस्ट वर्जनपेक्षा जुना असेल तर वरच्या कोपर्यात उजव्या हाताला तशी नोट दिसेल!
२. विजिटर्सना "ब्राऊजहॅपी" या वेबसाईची सैर करवा.
३. वर्डप्रेस - सेल्फ होस्टेड - हे प्लगिन इंस्टॉल करा.
४. या पेजवर दिलेली स्क्रीप्ट तुमच्या ब्लॉगच्या </head> च्या लगेच वरती पेस्ट करा!
पर्याय कोणता निवडणं हे तुमच्या हातात आहे. फक्त जास्तीत जास्त विजिटरांपर्यंत हा मेसेज मिळावा व त्यांच्याकडे नविन आणि सेफ ब्राऊजर असावा, हीच अपेक्षा!
कांचन कराई - यांच्या कमेंट वरुन -
आय.ई. ६ व ७-८ मधील फरकः
१. टॅब स्ट्रक्चर आय. ई. ७-८ मध्ये आहे - जे ६ मध्ये नाही.
२. आय. ई. ७-८ मध्ये इन-बिल्ट सर्च आहे.
३. फायरफॉक्ससारखे काही अॅड-ऑन, आय. ई. ७-८ मध्ये इन्स्टॉल करता येतात
४. आय. ई. ८ मध्ये इंस्टॉल केलं तर आय. ई. ७ चाही व्ह्युव - कंपॅटीबिलिटी पाहता येते.
शिवाय आय. ई. ८ काही जावास्क्रिप्ट १.५ ला सपोर्ट, काही कडक सिक्युरिटी फिचर्स आहेत. मात्र तरीही आइ. ई. सेफ नाही हे या ठीकाणी वाचा.
आता - कोणता ब्राऊजर श्रेयिस्कर?
माझी पसंती - फायरफॉक्सच! का व कशासाठी हे लिहिणं फार मोठं होईल. त्यामूळे आपणच हे फीचर्स पहा.
टेक्निकली बोलायचं तर - वेब डिझायनर - डेव्हलपर्सचीच ही जबाबदारी असते. मात्र आपल्या ब्लॉगच्या बाबतीत सर्व काही आपणच आहोत, नाही का?
13 comments:
अतिशय उपयुक्त माहिती.
धन्यवाद भुंगा.
खूपच महत्त्वाची माहिती दिलीत. शिवाय कॉर्पोरॆट आणी हॅबिच्युअल ब्लॉगमधला फरकही कळला. सल्ला अंमलात आणण्यासारखा नक्कीच आहे. फक्त लेखाचं शिर्षक खटकलं. लेख ’आपलं लेखन इतर ब्राउजर्स मधे दिसण्याच्या सुविधेबद्दल आहे’ पण शिर्षकामुळे IE आणि इतर ब्राउजर्सची तुलना याबद्दल लेख लिहिला आहे असं वाटतं.
@आनंद,
आपणास माहिती उपयुक्त ठरली - लिखानाची पोच मिळाली. प्रतिक्रियेबद्दल आभार!
@कांचन,
खरं तर मला आय.ई. च्या जुन्या वर्जन्स बद्दलच सांगायचं होतं की, अजुनही कित्येक लोक आय. ई. ५.+ किंवा ६ वापरतात, ज्यांच्यासाठी डिझाईन कंपॅटीबल करताना आमची कसरत होते :)
जुन्या आणि नव्या IE च्या आवृत्तीमधील फरक व IE पेक्षा कोणता ब्राऊजर श्रेयस्कर हेही लिहा. मीदेखील IE च वापरते आहे. फायरफॉक्स वापरण्याचा प्रयत्न एकदा केला होता पण जमलं नाही. त्यामुळे जुनंच बरं असं वाटू लागतं. शिवाय फायरफॉक्समुळे संगणकाच्या इतर सॉफ्टवेअर्सना तर काही त्रास होणार नाही ना, अशी भिती वाटल्याने, आहे तेच बरं असं ठरवलं.
2कांचन,
पोस्ट जरा अपडेट केली आहे - शेवटचा पॅरा. पहा.
आत्ताच पोस्ट पाहिली. छान अपडेट्स दिले आहेत. मी त्या लिंक्सवर जाऊन पाहिन. म्हणजे नवीन माहितीसुद्धा मिळेल. ऋणनिर्देशासाठी आभार!
मला माहित नाही मी बोलतेय ते बरोबर आहे की नाही पण मला वाटतं IE वापरण्याचाच हा दुष्परिणाम असावा की तो मधेच बंद होतो. संगणक रिफॉरमॅट करायच्या आधी तर विंडोच बंद होत असे. आता मात्र, नवीन AVG टाकून झाल्यावरही, IE stopped working असा मेसेज येतो पण विंडो बंद होत नाही. फायफॉक्स वापरायचाय पण त्याचे फिचर्स पूर्ण माहित करून घ्यायचे आहेत.
धन्यवाद. चांगली माहिती.
मी माझ्या ब्लॊगची चाचणी आय ई ७/८, फायरफॊक्स ३.५ व क्रोमवर केली होती. पुन्हा इतरांवरही करेनच :)
बाकी "मात्र तरीही आइ. ई. सेफ नाही हे या ठीकाणी वाचा." ह्यातील जे आयई बद्दल लिहिले आहे त्यावरून आयई आज सुरक्षित नाही असे म्हणणे एवढे योग्य वाटत नाही. कारण ती सर्व लिखाणे २००४ मधील आहेत व त्यानंतर मायक्रोसॊफ्टने अपडेट्स दिले होतेच आणि त्याच्या २ नवीन आवृत्त्या निघाल्या आहेत.
तरी मी माझा आंतरजालावरील वावर ह्या तीनही न्याहाळकांमधून करत असतो :)
@देवदत्त,
हां, कदाचित लेटेस्ट आय.ई.च्या बाबतीत ही विधाने खरी असतीलच असं नाही. मात्र अजुनही आय.ई. ५+/ ६+ वापरणार्यांनी - इतर ब्राऊजरचा जरुर विचार करावा!
far chan lekh lihila ahe. aapala blog farch chan sajavala ahe.
@techmr - अक्षय,
प्रतिक्रियेबद्दल आभार!
R.I.P. IE6 .. welcome IE8 or firefox ..
mast lihila ahet .. jara bara watala !
@विरेंद्र,
मी तर सर्वांना 'फायरफॉक्स'च वापरायला सांगतो! आय.ई. ६ वापरण्यात काही अर्थ नाही हेच खरं!
Post a Comment