Wednesday, 30 December 2009

नविन वर्षाची काही शुभेच्छापत्रे - तुमच्यासाठी!

नविन वर्षाची एक छोटीशी भेट. नेटवरुन काही फ्री-ग्राफिक्स एकत्र करुन काही[= ११] मराठी शुभेच्छापत्रे बनवलीत. तुम्हाला तुमच्या मित्रांना पाठवता यावीत - ब्लॉगवर टाकता यावीत म्हणुन!

समोरच्या गिफ्टवर क्लिक करुन झिप फाईल डाऊनलोड करुन पहा, एखादं आवडलं तर?
प्रत्येक कार्डावर एकच मेसेज आहे - नविन वर्ष सुखाचे, भरभराटीचे जावो!

कार्डाबरोबर तुम्ही तुमचा संदेश लिहा :)

डाऊनलोड्स:
मंडळी,
मराठी शुभेच्छापत्रे पाठविण्यासाठी मराठीग्रिटींग्ज.नेट हे संकेतस्थळ नुकतेच कार्यरत झाल्याचे पाहिले. मराठीग्रिटींग्ज वरुन मराठीमधुन शुभेच्छापत्रे पाठवु शकता शिवाय मराठी वॉलपेपर्स, मराठी संदेश व ब्लॉग ग्राफिक्स ही डाऊनलोड करता येतात. आपणही याचा फायदा जरुर घ्यावा.

17 comments:

सर्व शुभेच्छा पत्र छान आहेत!!! नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!!!

@मनमौजी,
अरे वा! आपल्याला आवडली तर? आनंद झाला!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

मस्त आहेत शुभेच्छा पत्र. नविन वर्षाच्या शुभेच्छा.

मोठं काम केलंत.. आता सगळे डाउनलोड करतो आणि प्रिंट घेतो..

@सिध्दार्थ,
धन्यवाद! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

@महेंद्रजी,
प्रिंट चांगले येईल की नाही माहित नाही.. कारण मी वेबसाठी म्हणुन तयार/ सेव केली होती = लो रिजोल्युशन!
हां मात्र ब्लॉग आणि ई-मेल साठी उपयोगी पडतीलच :) .... नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छा पत्र छान आहेत. आम्हाला उपलब्ध करुन दिल्याबद्दल, मंडळ आपले आभारी आहे.

नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
नविन वर्ष सुखाचे, समृध्दीचे आणि भरभराटीचे जावो.
आपल्या सर्व मनोकामना पुर्ण होवोत.

(गुडघेदुखी तुन मुक्तता होवो.)

@कॅनवास,
"गुडघेदुखी तुन मुक्तता होवो." - हीच खरी शुभेच्छा दिलीत - समस्त 'भूंगा मंडळ' मनापासुन लय आभारी हाये!
आपणांस नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

धन्यवाद भुंगा...खुपच मदत झाली...

@आनंद,
आपणांस नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

भुंग्या आभारी आहे रे, वापर केला तर रॉयल्टी तर नाही ना?

शुभेच्छा पत्र छान आहेत.

नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

@अनिकेत,
रॉयल्टी वगैरे काही नाही रे.. असंच..!
जरा मराठी भेटकार्डे शोधायला अवघड जातं म्हटलं आपणच थोडा प्रयत्न करावा!

@विक्रम,
आवडले.. सही.. या पुढेही असंच उपयोगी पडणारं काही तरी दयायचा प्रयत्न करु! नविन वर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.

लय भारी... आवडले सगळे...
दादा, तुला अन तुझ्या फॅमिलीला नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

- विशल्या!

तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

@विशाल, @देवेंद्र,
धन्यवाद! तुम्हाला ही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!