Monday, 28 December 2009

मग.. तुमचा नविन वर्षाचा "निग्रह" - रिझॉल्युशन - काय आहे?

दरवर्षी या वेळेला, म्हणजे वर्षाच्या शेवटी जवळ जवळ सारेचजण नविन वर्षासाठी काही ना काही प्लान करतात. काहीतरी नविन करण्याचा... काही असं जे आत्तापर्यंत/ यावर्षी करायचं राहून गेलं असं... आणि एक लिस्ट बनते.. [कदाचित] त्यालाच "न्यु ईअर रिझॉल्युशन" म्हणतात!



तसं मी ही काही अपवाद नाही. आतापर्यंत बरीच रिझॉल्युशन्स केली आणि थोडीच पुर्ण करण्यात धन्य पावलो. काही हरकत नाही, बाकीच्या पुढच्या वर्षासाठी! तर, आतापर्यतच्या लिस्टवरुन बनवलेली ही काही कॉमन रिझॉल्युशन्स!


१. व्यसन मुक्ती [स्मोकिंग / दारु]: अगदी सार्‍याच स्मोकर्सचं हे पेटेंट रिझॉल्युशन्स! वर्षभर सिगारेट लोढल्यानंतर जेंव्हा कधी मनात ती सोडण्याचा विचार येतो, तेंव्हा ३१ डिसेंबरची वाट पाहिली जाते. १ जानेवारी पासुन सिगारेट सोडण्याचे शपथेवर सांगितलं जातं. एक - दोन दिवसांतच हे रिझॉल्युशन्स पुढच्या वर्षापर्यंत 'तहकुब' करण्यात येतं! तेच दारुच्या बाबतीत म्हणता येईल. दारु सोडण्याआधी ३१ डिसेंबरला - गटारी करायची - मनसोक्त प्यायची आणि मग सोडायची असं एकंदरीत टार्गेट असतं!
दोस्त, चांगली आणि योग्य गोष्ट करायला नविन वर्षाची वाट कशाला पहायला हवी. कदाचित पुढचं वर्षच तुझ्यासाठी नसलं तर? रेमेंम्बर, स्मोकिंग किल्स!

२. फॅमिली बरोबर अधिक वेळ घालवणारः हां, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात जिथं जेवायलाही वेळ नसतो तिथं फॅमिलीसाठी वेळ मिळणं कठीणच, नाही का?
लगेच हो म्हणु नका... आपण जे सगळं करताहात ते फॅमिलीसाठी असं जरी असलं तरी त्या फॅमिलीला आपण आणि आपली सोबतही हवी आहे हे विसरु नका म्हणजे झालं!

३. व्यायाम करणारः हसु नका... खरं तेच सांगतोय! पोटाचा वाढलेला तंबु नेहमीच व्यायाम करण्याबद्दल खुणावर असतो. त्यात घरचे - विशेषत: बायको - जरा जास्तच हटकत असते. किमान सकाळी वॉकला जाण्याबद्दल तरी तिची हक्काची मागणी असते. तसं आम्ही सुरुवात करतो, पण दोन-तीन दिवस, आठवडयानंतर आमची अवस्था - पालथ्या घड्यावर पाणी अशी होते.
सकाळी / संध्याकाळी वॉकला जाण्यासारखा व्यायाम नक्कीच करता येण्यासारखा आहे. किमान जेवणानंतर 'शतपावली' करा हवं तर!

४. दुसर्‍यांना मदत करणार - डोनेशन्स वगैरे: काही जण सोशल होण्यासाठीही नविन वर्षाची वाट पाहतात. दुसर्‍यांसाठी काहीतरी करायचय.. काय ते नक्की माहित नाही... मात्र इतरांकडुन ऐकुन/ वाचुन असंच काहीतरी करण्याची हुकी येते.. चांगलं आहे.. !
पण मित्रा, त्यासाठी कशाची आणि कुणाची वाट पहायतोय? रेमेंम्बर - देअर इज नो राँग टाईम टु डु अ राईट थिंग!

५. वजन कमी करणारः पुन्हा एक नविन चॅलेंज. ऑफिसमध्ये - ए.सी. मध्ये बसुन म्हणा किंवा चटर-पटर खाऊन म्हणा, पोटाचा नगारा वाढतोच, पण त्याचबरोबर वजनही. शिवाय व्यायामाच्या नावाने शंखच असल्याने वाढत्या वजनावर कंट्रोल ठेवणे अवघड जाते. मग हा प्वाँईंट या यादीत जातो.
स्नॅक्स, चटर-पटर खाण्यावर हळु-हळु का होईना पण अंकुश ठेवणे गरजेचं आहे. नाहीतर वजनवाढीबरोरच - बी.पी आणि हार्ट अटॅकलाही आमंत्रण आहेच!

६. काहीतरी नविन शिकणारः पण काय ते नक्की नाही.. कदाचित गिटार किंवा तबला वाजवायला शिकायचय! टेक्निकली नविन काही शिकेन... पोहायला?... की नविन भाषा शिकु.. जापनिज - जर्मन सध्दया चांगल्याच फार्मात आहेत!
भाऊ, काहीही शिक.. शिक्षण/ कला कधी वाया नाही जात. फक्त शिकायचंय म्हणुन लिस्टवर नको सोडु, एक प्रामाणिक प्रयत्न कर!

७. कर्ज 'निल' करणारः हम्म.. पर्स्नल लोन, कार लोन, होम लोन अशी बरीच "लोनची" लफडी मागे असतात. पुढच्या वर्षी यातील एकाचा तरी निकाल लावायचाच!
कितीही ईजी इंस्टालमेंट्स असल्या तरी कर्ज हे कर्जच असतं. थोडीशी बचत करुन, थोडीशी काटकसर करुन हे कर्जाचं भुत उतरवायलाच हवं!

८. एक लाँग हॉलिडे: फॅमिलीला वेळ देत नाही असे टोमणे ऐकुन किंवा स्वत:साठीही थोडा चेंज आणि आराम म्हणुन बरेच लोक हा प्लान करतात. आता काहींना सुट्टी मिळते, काहींना मिळत नाही. काही प्लान परदेशातला सुट्टीचा बनवतात तर काही भारतातच.
प्लान मस्त आहे! छोटा असला तरी चालेल, पण फॅमिली बरोबर ठरवला असेल तर तो पुर्ण "कौंटुबिकच" असावा. त्यात सोबत लॅपटॉप.. मग मेल चेकिंग.. शेअर मार्केटवर नजर अशा गोष्टी जरावेळ दुरच ठेवा!

९. प्रमोशन / नविन नोकरी: बस्स यार.. खुप दिवस झाले, आता नविन नोकरी शोधु.. आय नीड अ चेंज असं वाक्य बर्‍याचदा ऐकण्यात येतं. मग पुढच्या वर्षी नविन नोकरी बघायचीच असा मनसुबा बनतो.
हां, चेंज इज लाईफ हे सर्वांनाच माहिती आहे, मात्र असा काही प्रकार करु नका ज्याने लाईफ चेंज होईल.

१०. पुढच्या वर्षी 'प्रेमात पडायचं!': माफ करा, कदाचित - 'गर्लफ्रेंड बनवायचीच' असा प्लान असेल.. कदाचित 'बाबा ... लगिन!' असं आई-वडिलांना रेमाइंड करायचं.... एकंदरीत - जीवनसाथी सोधायचा... बस्स झालं एकटं - बॅचलर लाईफ!
प्लान मस्त आहे, शुभेच्छा!

हां, तर असेच काही प्लान्स/ रिझॉल्युशन बनतात. कदाचित यापेक्षाही जास्त असतील.... तुम्ही सांगालच ना? थोडक्यात - देअर विल अलवेज बी अ ३१स्ट डिसेंबर! आणि हो, ३१ डिसेंबरला मी तर घरीच असणार आहे... तुमचा काय प्लान आहे?

मुळ ग्राफिक्स.

19 comments:

रेजोल्युशन नं. ७ आणि १० सोडले तर कधी ना कधी प्रत्येक रेजोल्युशन ट्राय केले आहे... :)
या वर्षी, पुरेशी झोप घेणे आणि आरोग्याची काळजी घेणे हेच रेजोल्युशन आहे, १ जानेवारी पासुन नाही तर महेंद्र्जीच्या एका लेखावरुन मी सुरुवात केली. http://kayvatelte.wordpress.com/2009/11/20/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95/

kay resolution karnar te nakki nahi
pan
gelya varshiche resolution
100% varshbhar palale lift na vaparnyache
cheers.....!

@आनंद,
महेंद्रजींचा तो 'वर्कोहोलिक' लेख वाचला... आणि त्यावरुन तुझं "पुरेशी झोप" घेण्याचं रिजॉल्युशन .. सहीच!

@विनायक,
अरे वा! एक वर्ष - लिप्ट वापरली नाही.. वा! मला नाही पाळता येणार - माझं ऑफिसच चौथ्या मजल्यावर आहे ;)

मी कधीही असे डे पाहून रिजॉल्युशन ठरवत नाही

पण जे ठरवतो ते करण्याचे परिपूर्ण प्रयत्न करतो
काही जमत काही नाही जमत चालायचं

बाकी रिजॉल्युशनएकदम सही आहेत यातील बहुतेक सगळी ऐकून आहे आणि फेल हि झालेली पाहिली आहेत हा हा

मस्त पोस्ट आहे भुंग्या....अगदी गुणगुण गुणगुणच म्हणुया...:)
आणि ते क्रमांक ८ ची तळटीप लय भारी आहे...सगळ्या आय.टी. वाल्या जोडप्यांनी (म्हणजे आमच्यासारख्यांनी रे) जास्त लक्षात ठेवलं पाहिजे...मी तसं काही रिझोल्युशन करणार नव्हते खरं पण ८ चा विचार करायला हरकत नाही...:)

>>> दादा, खुप मजेशिर पोस्ट आहे. सर्व रीझोल्युशन्स ग्रेट! क्रमांक - ६वं रीझोल्युशन मी प्रत्येक क्षणालाच करतो(ठरलेलं नाही, की ३१ डिसेंबरलाच करायचं म्हणून!)... हे वर्ष(२००९) तर माझ्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले, या वर्षात मी एवढ्या गोष्टी शिकलो(ज्या माझ्यासाठी पुर्णपणे नविन होत्या), यापुर्वी मी कधीच असं अनुभवलं नव्हतं... ५ महिन्यांपुर्वी मला एचटीएमएल ची एक टॅगसुद्धा मदत नव्हती, पण आता सी, सी प्लस प्लस या सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग लॅंग्वेजेस व्यतिरिक्त सीएसएस अन पीएचपी बद्दल पुरेसं नॉलेज तरी आलयं (अजुन तर खुप बाकी आहे...) पण ग्रेट इयर(माझ्यासाठी तरी...! ;) )
>>> तुझी अन महेंद्र काकांची मदत तर मी कधीच विसरणार नाही, अन पुढच्या वर्षी पण असचं काही ना काही मदत मागण्याचं थांबवणार तर बिल्कुलच नाही... ;)
>>> पुढील वर्षी अजुन काही नव-नविन शिकण्याव्यतिरिक्त मला गुंतलेले विषय काढण्यावर अन पुन्हा असं होऊ नये, यावर मला लक्ष केंद्रित करावे लागणार, आणि त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन, तू वर लिहिल्याप्रमाणे...
>>> धन्यवाद!

- विशल्या!

मागच्या ४-५ वर्षात केलेली रिजॉल्युशन पूर्ण करण्याचे रिजॉल्युशन केले आहे या वेळी :P

वर्षअखेरीसाठी असे बरेच संकल्प सोडले होते, एकही पूर्णत्वास गेला नाही. तेव्हापासून ठरवलं, ’जेव्हा मनापासून वाटतं - अमूक एक गोष्ट करायची किंवा नाही करायची’ तेव्हाच ते सुरू करावं. नाही म्हणायला माझा टॉकींग बुक ब्लॉग १ जानेवारीला प्रकाशीत करायचा विचार होता पण वेळेअभावी ते लांबणीवर पडलंय म्हणून ’मोफु’ वरच एक नवीन प्रेमकथा प्रकाशीत करतेय. दुसरं काय नाय बा!

@विक्रम,
हां, "चांगली आणि योग्य गोष्ट करायला नविन वर्षाची वाट कशाला पहायला हवी." असंच ना?

@अपर्णा,
हो, अगदी मी ही त्याला काही अपवाद नाही.. बर्‍याचदा या एक्स्ट्रा गोष्टींमुळे सुट्टीचा बट्ट्याबोळ होतो. तेंव्हा हे सारं पाठीमागे ठेऊनच सुट्टीचा आनंद घ्यावा!

@विशाल,
अरे वा, बरंच शिकला म्हणायचं! पण आपण आयुष्यभर शिकतच असतो आणि ते कधीच वाया जात नाही... म्हणुन - शिका आणि शिकवा!

@अभिजीत,
सही रे.. हे मात्र नविनच रिझॉल्युशन!

@कांचन,
हो, तुमच्या कथा भन्नाटच असतात! शिवाय त्यांचं ई-बुक करता आलं तर पहा.. अगदी ऑफलाईन वाचता येतील :)

२००९ ह्या वर्षा साठी मी एक संकल्प केला होता, की माझ्या ऑर्कुट प्रोफाईल च्या अल्बम मध्ये रोज एक मी काढलेले नवीन चित्र टाकायचेच आणि आता दोनच दिवस राहीले आहेत.... ते मी पुर्ण करीत आणलेही आहे ! सोयीसाठी मी दर महिन्याचा वेगळा अल्बम केलेला आहे. हे सर्व आपणास कधीही पहाता यावे त्या साठी ही लिन्क देत आहे.

http://www.orkut.co.in/Main#AlbumList?uid=10244071533962838322

१ जानेवारी पासून हा संकल्प बंद करीत आहे, बघुया त्यावेळी काही नवीन सुचते का ते ?

१७ जानेवारीला एक वर्ष पुर्ण होतंय ब्लॉग ला , तेंव्हा १७ नंतर पोस्ट्स ची वारंवारीता थोडी कमी होईल. कारण नंबर..२
:) आता थोडा कंटाळा पण आल्यासारखा झालाय.. हे पण तितकंच खरं..

मी येत्या वर्षात ब्लॉगसाठी कमी वेळ देणार आहे आणि जास्त लक्ष कामात ठेवणार आहे. :-)
बघु किती दिवस टिकेन.

श्री. सुरेश पेठेजी,
मला "जी" म्हणु नका... एकेरी हाकच हक्काची वाटते.. नाहीतर उगाच अवघडल्यासारखं होतं :) मी आपले आल्बम्स पाहिले. एकापेक्षा एक सुंदर रेखांकन आहेत!
नविन रिझॉल्युशन: कदाचित तीच रेखांकने - रोज एक या हिशोबाने नविन ब्लॉगवर टाकता येतील!

@महेंद्रजी,
हो, फॅमिलीसाठी वेळ हवाच... मीही तोच विचार करतोय ;)
बाकी तुमच्या ब्लॉगचे "एक वर्ष" आणि "एक लाख विजिटर्स" हेच नविन वर्षाचं गिप्ट म्हणायचं!

@अजय,
आयडिया मस्त आहे... पण टिकवुन ठेवणं जरा कठीण वाटतंय... कारण ब्लॉगसाठी एखादा विषय मिळाला रे मिळाला की त्याबद्दल लिहिपर्यंत चैन नाही पडत! हवं तर दर सोमवारी नविन पोस्ट असं ठरव!

नवीन वर्षाचा संकल्प म्हणजे दरवर्षी जागणारी नवी उमेद. लहानपणी १-२ वेळा डायरी लिहण्याचा संकल्प केलेला पण तो २-३ दिवस चालला. बाकी कधी कसला संकल्प करण्याच्या भानगडीत नाही पडलो. इंजिनियरिंगला असताना मुंबई यूनिवर्सिटीच्या कृपेने ३१ डिसेंबरला हमखास परीक्षा असायची. त्यामुळे संकल्प वैगरे गोष्टींचा विचार करणे देखील चैनीचा भाग होता.
ह्या वर्षी अचानक जून महिन्यात नव्या वर्षाची वाट न पहाता ब्लॉगिंग सुरू केले. सध्या तरी आवड टिकून आहे आणि जमेल तसं लिहण्याचं ठरवले असल्याने सुरळीत सुरू आहे.
बाकी तुम्हा सर्वांचे प्रॉब्लेम्स, ईडा-पीडा तुमच्या नव वर्षाच्या संकल्पा इतक्याच टिकोत. नववर्षाच्या शुभेच्छा.

@सिद्धार्थ,
काही काळ मीही डायरी लिहायचा प्रयत्न केला होता... अगदी बंधास्त डायरी लिहिली - पण काहीच दिवस. मग टेंशन वाढु लागले... ती कुणाच्या हातात पडली तर!! म्हणुन एक दिवस सारी पाने फाडुन टाकली... वरेच वर्षांनी मग ब्लॉग लिहायला सुरुवात केली... तो अजुनही चालु आहे. डायरी लिहिण्यापेक्षा ब्लॉग लिहिणं सोयिस्कर वाटतं!

बाकी ईडा-पिडा टळोत आणि सर्वांना नविन वर्ष आनंदमयी जावो हीच शुभेच्छा !

मी हे असे काही ठरवतच नाही कॉलेज सूटल्यापासून ... :D जे जसे येईल तसे वागायचे ... तसे जगायचे ... :)

@रोहन,
हे लय भारी... मी पण असंच करतो ;)

Resolution = "Re Solution" to same problems ;) त्यामुळे तेच तेच RESOLUTION ची परत परत निश्चिती होते !!

@जयेश,
सही अर्थ लावला, रिझॉल्युशन्स चा ;)