फार दिवसांपुर्वी एका मित्राची अशीच आशयाची इंग्रजी मेल आली होती. आज एका मित्राचा एस.एम.एस. आला. म्हटलं.. हेच मराठीत लिहुन बघावं... आठवणींना भावनांचा बांध घालण्याचा प्रयत्न!
... जेंव्हा "निष्पापपणा" हा स्वाभाविक असायचा...
... जेंव्हा "पिणे" म्हणजे फक्त रसना असंच माहित होतं...
... जेंव्हा "बाबा" हे एकमेव हिरो वाटायचे..
... जेंव्हा "प्रेम" म्हणजे आईची ती मिठी/ झप्पी असंच माहित होतं...
... जेंव्हा "बाबांचे खांदे" म्हणजे जगातील सर्वात उंच गोष्ट वाटायची...
... जेंव्हा "वाईट - शत्रु" म्हणजे आपली खट्याळ भावंडं वाटायची...
... जेंव्हा "ड्रामा" फक्त नाटकातच होतो असं वाटायचं...
... जेंव्हा "वाया गेला" असं कुणी म्हणायचं तेंव्हा "वेळ" हेच अभिप्रेत असायचं...
... जेंव्हा "औषध" म्हणजे फक्त खोकल्यावरच असतं असं वाटायचं...
... जेंव्हा "तोडा - तोडी" व्ह्यायची ती फक्त खेळण्यांची...
... जेंव्हा "दुखणारी गोष्ट" म्हणजे ते फुटलेले गुडघे असायचे...
... जेंव्हा "गुडबाय" फक्त उद्यापर्यंत असायचा...
... जेंव्हा "गेटींग हाय" म्हणजे झुल्यावर/ झोक्यावर झुलणे असंच माहित होतं...
... जेंव्हा "युद्ध - लढती" फक्त खेळातच असतात असं वाटायचं...
आयुष्य कीती सरळ - सोप्पं होतं... आणि - मला मोठं व्हायचं होतं!
[ मुळ लेखक - कवी: अनामिक ]
आंबे पूर्णिमा...
9 years ago
12 comments:
वाह मस्तच
लहापनीच्या आठवणी ताज्या झाल्या :)
ह्म्म ! गेले ते दिन गेले
एकदम सहीच!
वा !!! अप्रतिम... खुपच विचार करायला लावणारं !!
खुपच मस्त.........
खरंच सारंच किती सोप्पं होतं....
लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला... अतिशय विचारपूर्वक लिखान आहे. इंग्रजीमधून अगदी सोप्या भाषेत मराठीमध्ये भाषांतर केलंय..!
- विशल्या!
खुप मस्त लेख लिहला आहे आवडला
खरंय रे अगदी. मस्तच
मस्त वाटला, लंडन मध्ये अगदी पुण्यात असल्या सारखा वाटला.. कसला सुंदर ब्लोग आहे मस्त केला आहे कोरीव काम अंड रंग काम.. फिदा आहे तुझ्या रंगकामाच्या स्किल वर . जिंकलास मित्रा
किती छान आहे तुमचा ब्लॉग! मनाला सैर करून गेला.इथून जाऊ नये वाटते.गडबडीत आहे.पुन्हा निवांत येणार.आणि नियमीत भेटी देणार.लिह्त राहा....Bharati
very touching.... missing those golden days
Post a Comment