Tuesday, 1 February 2011

सावधान - इंकम टॅक्स रिफंड - फ्रॉड मेल!

टॅक्सपेअर, आपल्याला रु. ३२,७२०.०० इंकम टॅक्स रिफंड मिळणार अशी ई-मेल पाहताच काय आश्चर्याचा धक्का बसतो ना? एक तर टॅक्स भरायची मारामारी, त्यात भरलेल्या टॅक्सवर रिफंड मिळणार.. व्वॉ!


.... तर अशा प्रकारच्या ई-मेल सध्या जोर धरु लागल्यात. मार्च एन्ड जवळ आलाय - टॅक्स सेविंग - फायालिंग या सार्‍या धांदलीत अशीच एखादी ईमेल येते आणि नकळत आपण रिफंडच्या मागणीसाठी तयार होतो.

असाच एक मेल, माझा मित्र सचिनला आला. मात्र यातील बारकावे लक्षात घेवु:
१. हा ई-मेल आलेला ई-मेल आयडी सरकारी खात्याच्या डोमेनवर असल्याचं दिसतं - मात्र असे ई-मेल-एलियास बनवता येतात.
२. "क्लिक हिअर" ही लिंक भलत्याच डोमेनवर जाते. अशा लिंकवर क्लिक करायच्या आधी फक्त माऊस-ओवर केलं तरी - स्टेटस बार मध्ये त्या ती लिंक दिसते. ती लिंक इंकमटॅक्स च्या वेबसाईट्ची नक्कीच नाही.
३. थोडं पुढं जाऊन - क्लिक करुन - पाहिलं तर अगदी इंकमटॅक्स च्या वेबसाईट्ची नक्कल दिसते - मात्र वरती अ‍ॅड्रेस बार मध्ये - लिंकचा पत्ता पहा - तो नक्कीच इंकमटॅक्स च्या वेबसाईट्चा नाही.

.... यापुढच्या स्टेप्स मध्ये आपणाकडुन आपल्या बॅंक खात्यात लॉगिन करवुन घेतलं जातं - हे सगळंही नकलीच - मात्र अगदी खरं भासावं असं!

तर मंडळी - अशा फसव्या ई-मेल पासुन सावधान!

अधिक माहिती - या संकेतस्थळावर आहे.

3 comments:

Aamha Garibala asale fake IT wale Mail suddha yet nahit :P

धन्यवाद .. सावध केल्याबद्दल ..

धन्यवाद ....रोज अश्याच का्ही तरी मेल येतच असतात.