या व्हॅलेन्टाईन्स डे ला एकमेकांना काय भेट द्यावं - हा दरवर्षीचा महाप्रश्न! सगळ्यांसमोरचा म्हणत नाही - पण "व्हॅलेन्टाईन" ना नक्कीच पडत असावा. साध्या सोप्या प्रकारात म्हटलं तर - एखादं ग्रिटींग + गुलाबाचं फुल = व्हॅलेन्टाईन्स भेट! नेहमीच्या भेट-प्रकारात अंदाजे खालील गोष्टी असतात:
- तिच्यासाठी फुलांचा गुच्छ + चॉकलेट्स + टेडी बेअर + की-चेन वगैरे
- सोबत सिनेमाला जाणे...
- त्याच्यासाठी वॉलेट किंवा परफ्युम...
- तिच्यासाठी पर्स किंवा परफ्युम...
- संध्याकाळी एखाद्या हॉटेलात जेवण!
मात्र यावर्षी जरासं वेगळं भेट दिलं तर? मी काही जादुचा मंत्र किंवा अफलातुन "आयडियाची कल्पना" देत नाहीये - मात्र जरासं नाविन्य सुचवतोय, एवढंच.
- टी-शर्टः जरासं वेगळंपण असणारे टी-शर्ट "ओकाका" या संकेतस्थळावर पाहिले. मराठीपण मिरवण्याचा हा वेगळा प्रकार खरंच आवडला. यामध्ये आपण त्याच्यासाठी आणि तिच्यासाठी असं दोघांसाठीही टी-शर्ट मागवु शकता.
- पुस्तकः हो, एखादं प्रेमकथा असणार पुस्तक [ उदा. तिच्यासाठी - बकुळा- आणि त्याच्यासाठी - दुनियादारी- ] आपण त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी नक्कीच मागवु शकता. यासाठी फ्लिपकार्ट किंवा रेडिफ या संकेतस्थळावरुन आपणांस "विनामुल्य घरपोच" पुस्तकं मागवता येतील. मराठीतील पुस्तकं रसिक साहित्य किंवा सह्याद्री बुक डेपो वरुनही मागवता येतील.
- गेम्सः गेमाड्या व्हॅलेन्टाईन्स साठी काही परवडणार्या गेम्सही आपण फ्लिपकार्ट वरुन मागवु शकता.
- रोमँटीक गाण्याचा सेटः संपुर्ण रोमॅंटीक गाण्यांचा सी.डी. सेटही एक भेट रोमॅंटीक ठरेल. यामध्ये पंचमदा पासुन सध्याच्या गाण्यापर्यंत आपणांस निवड करता येईल.
- नियतकालिक [मॅगझिन] ची वर्गणी: त्याच्या किंवा तिच्या आवडीनुसार वर्षभरासाठी तुम्ही एखादं नियतकालिक [मॅगझिन] मागवु शकता. यामध्ये इतर नियतकालिकेही असतील - अगदी 'माझी सहेली' ते 'गृहशोभिका'. काही वाचनीय नियतकालिके तुमच्या पेपरवाल्याकडेही मिळतील. त्यातल एखादं बायकोसाठीही मागवता येईल.
- यावर्षी व्हॅलेन्टाईन्स डे - पुढच्या सोमवारी येतोय - म्हणजे एक आठवडा आहे - बघा सोमवारची सुट्टी मिळतेय का.. एखादी मस्त विकेंड-ट्रीप होवुन जाईल - कसं?
याशिवायही तुमच्या काही [ भन्नाट ] आयड्या असतीलच... जमलं तर शेअर करा.. इतरांनाही फायदाच होईल.
यासंदर्भात वाचावं असं काही:
त्याच्यासाठी: महेंद्र कुलकर्णीं लिखित = "रोमॅंटीक आयडीयाज.."
तिच्यासाठी: कांचन कराई लिकित = "रोमॅंटीक आयडीयाज.. माझ्याही"
व्हॅलेन्टाईन्स डे – शुभेच्छापत्रे: = "मराठी ग्रिटींग"
"व्हॅलेन्टाईन्स डे" साजरा करायचा की नाही - यावर वादा-वादी होतेच - दरवर्षी!! मला वाटतं - प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही दिवसाची किंवा अशा सणाची गरज नाही.
4 comments:
दीपक दा....खुप खुप आभार....
>>रोमँटीक गाण्याचा सेट--हे आवडेश...
>>बघा सोमवारची सुट्टी मिळतेय का---सुट्टी कधीच मिळत नाही ती घ्यावी लागते. :) :)
मान्यवर,
फारच उपयुक्त लेख. विशेषतः सीडी सेट भन्नाट.
पण माझ्यासारख्या व्हॅलेंटाईन नसलेल्यांसाठी ’व्हॅलेंटाईन’ मिळवण्याचा आयडीया पण टाका की !!
आज भुंगा फक्त लाल गुलाबावर भिरभिरतोय..क्या बात है...
Happy V Day in advance....
kaka!
chala baghuya tari kaay kaay gaani aahet mhanun me continue karat karat shevati romantic ganychi CD order keli...love marriage asun amhi kadhi 'valentine' kakancha diwas sajara kela nahi...pan ata CD ghetali baykosathi...mazi bayko tula shatashah dhanyawaad deil!
jay 'valentine' baba ki!
Post a Comment