आंबे पूर्णिमा...
11 years ago
From today, painting is dead!
हाय...!ट्रेकिंग - पिकनिक च्या वेळी काळजी घेणं आणि सामाजिक - नैतिक जबाबदारी निभावणं या दोन्ही वेगवेगळया गोष्टी [दिसत - वाटत] असल्या तरी त्या आपल्याच कर्त्यव्याचा एक भाग आहेत, हे विसरुन चालणार नाही, हो ना?
पाऊस मुक्कामी आलाय! पण काही म्हणा, आपल्या शहरांतल्या पावसाला गर्दीचा एक तक्रारखोर आवाज असतो. इथे तो भेटतो तेव्हा लेट झालेल्या ट्रेनच्या गर्दीत शिव्या खात असतो किंवा रस्ते तुंबवून गुडघाभर साचलेल्या पाण्यात रिपरिप करत आपल्याला चिडवत राहतो...या पावसाला सरळ टांग मारायची. वीकेण्डला सॅक पाठीवर टाकायची. कॅमेरा लटकवायचा. रेनीवेअर अडकवायचं, कंपूला फोनाफोनी करायची, लोकलच्या वेळा नीट बघायच्या, नाहीतर सरळ गाडी काढायची आणि पावसाला भेटायला रानात जायचं....अस्साच प्लॅन करताय ना? पण मंडळी, या मान्सून पिकनिकपूर्वी लेट मी शेअर वन थिंग.
- प्रगती बाणखेले

विकटगडचा ट्रेक, खरं तर माथेरान च्या जरा खाली, लाइन नं. १३२ किंवा "वौटर पाईप" या ठीकाणी सुरु होतो.. मात्र आम्हाला १३२ नं. - न सापडल्यामुळे आम्ही माथेरानच्या मुख्य एन्ट्री तुन आत गेलो. चालत जाताना मिनिरेल्वेचा ट्रॅक जिथं लागतो, तिथुन उजव्या हाताला वळलं की नं १७८ पासुन, त्या पटरीबरोबर नं. १५७ [अंदाजे] पर्यंत त्याच ट्रॅक वरुन - धबधब्यांच्या बाजुने चालत रहायचं. थोड्याशा पावसानेही सगळं शिवार कसं हिरवंगार झालं होतं.. मधेच येणारे धुक्याचे ढग... छोटे - छोटे धबधबे.. वा! मस्तपैकी फोटो काढत आम्ही चालत होतो.. सतत पडणारा पाऊस मात्र फोटो काढायला अडथळा आणत होता.... पण तशातही आमची कलाकारी चालुच होती...!नं. १५७ च्या जवळ एक छोटीशी कमान आहे.. म्हणजे या ट्रेकची सुरुवात... कमानीवरची ती छोटी घंटी वाजऊन आम्ही ट्रेकला सुरुवात केली... येथुन खाली उतरावे लागते... पावसामुळे वाट घसरडी झाली होती... त्यामुळे अगदी हळु.. अंदाज घेत आम्ही खाली उतरुन विकटगडाकडे आगेकुच सुरु ठेवली!
दत्त पादुकांच्या पाठीमागे एका लोखंडी पोलवर भगवा आहे. हेच गडावरचे उंच ठीकाण. येथुन दिसणार्या निसर्गाचे - सभोवतालचे वर्णन शब्दांत करणे शक्य नाही... हिरव्या गार डोंगरांच्या रांगा.. धुक्यांचे ढर..... काही डोंगरावर पडलेले ऊन आणि काहींवर ढग.... अप्रतिम - अदभुत - अवर्णनिय !! येथुनच माथेरानच्या मिनि-ट्रेनचे ही दर्शन झाले.. सध्या पावसामुळी ही गाडी प्रवाशांसाठी बंद आहे... मात्र आम्हाला तिचे दर्शन झालेच.... कदाचित रुटीनचा भाग - किंवा ट्रॅक चेकिंग असावे.
तुम्ही जर गडावरुन खाली उतरत असाल तर तुम्हाला उजव्या बाजुला खाली उतरायचे आहे - नेरळच्या बाजुला.... हे चांगलं लक्षात ठेवा.... सरळ जाणारा रस्ता पुढे बंद होतो.... मी स्वत: चेक केलाय... आणि डाव्या हाताला पनवेल! आता हे मी सांगु शकतोय - कारण आम्ही डाव्या बाजुनेच खाली उतरलो!!!! नेरळच्या बाजुने चढत असाल तर अडचण नसावी. मात्र माथेरान च्या बाजेने चढुन - नेरळच्या बाजुला उतरत असाल तर हा - उजवा - रस्ता पक्का लक्षात ठेवा!डाव्या हाताला दिसणार्या त्या विजेच्या खांबावर भरोसा ठेऊन डाव्या बाजुने खाली उतरायला सुरुवात केली... रस्ता अगदीच सरळ होता.. मात्र छोटासा आणि निसडाही! त्या मोठा विजेच्या खंबाच्या खालुन चालत आम्ही वळणा-या वाटेने सुमारे एक दिड तासाने खाली उतरलो... अंदाजे ७ वाजता! सुरुवातीलाच काही घरे लागली... एक माणुस जवळच भेटला... म्हटले चला... नेरळचा रस्ता विचारु! आणि.. आणि.. त्याने सांगितले की - आम्ही नेरळच्या बाजुने नाही - तर - पनवेलच्या बाजुने खाली उतरलो आहोत...हे "सत्ती" नावाचे गाव आहे! नेरळकडे जाण्यासाठी वरच्या त्या छोट्या चौकात आम्ही उजव्या बाजुने खाली उतरायला पहिजे होते!!! अगदी विजेचा झटका लागल्या सारखे झाले.... म्हणजे आता परत जंगलातुन त्या पहिल्या विजेच्या खांबापर्यंत वरती जायचे??? नाही...s s s s s s s s s s s s!!!
बसच्या ठीकाणी पोहोचलो.... तर कळाले की... आजुन बसच आली नाही.. म्हटले चला.. अजुनही होप आहे... पण आमची ही होप जास्त वेळ नाही टिकली... आज बसच येणार नसल्याचे समजले! आता? सगळ्यांचा मनात एकच - वी आर लौस्ट - मुझे इस जंगल से बचावो... वगैरे - वगैरे...!एव्हाना.... सगळ्यांनाच चहाची तलफ झाली होती.... वहानाची वाट बघत - चहाची सोय होते का ते विचारले... तर कोरा चहा - ब्लॅक टी - मिळेल असे सांगितले... दुधाचा का नाही - तर - सगळा गावच असा कोरा चहा पितो असं कळालं! चला - कोरा तर कोरा.... गरमा - गरम चहा तर मिळाला - यावरच आम्ही हुरळुन गेलो! आता चर्चा सुरु झाली... पुढे काय... ? येथुन जवळचे ठीकाण म्हणजे - पनवेल - १२ कि.मी.... पण... पनवेलला कसे पोहोचायचे?.. की या गावातच मुक्काम करायचा?
ज्यो आणि ललित साठी तर हा प्रकारही ट्रेकिंग इतकाच नविन होता... जंगल.. ट्रेक... रस्ता चुकणे... कोरा चहा.... सिक्स सीटरच प्रवास...! सर्वच..!!पण दोघांची काहीही तक्रार नव्हती.... एंजाय करतोय असं त्यांचं मत होतं!अंदाजे ९ वा. आम्ही पनवेलला पोहोचलो.... गाडी येण्यास अजुन एक तास तरी लागणारच होता.. तोपर्यंत - "विनम्र" मध्ये खाऊन घेण्याचे ठरले... मस्तपैकी चिकन कोल्हापुरी खाल्ले...गौरवने मात्र व्हेज मागवले... नंतर समजले - चतुर्थी आहे...! असो... आमच्या देवाला चालते म्हणुन मस्त खाऊन घेतले... १०.३० ला गाडी पनवेलला पोहोचली... विशाल - उपेन्द्रजींना बाय-बाय करुन आमची सोमु [सुमो!] पुण्याच्या मार्गाला लागली....!
दुसरे जातात म्हणुन मलाही जायचे आहे, म्हणुन " उठला अन् ट्रेकला सुटला " असं मात्र करु नका....!!सर्वांना सोडत - सोडत मला घरी पोहोचायला रात्रीचे २ वाजले.... थोडसं तेल अंगाला चोळुन .. मस्त गरमा - गरम पाण्यात अंघोळ केली अन् अंथरुणात घुसलो...!
- ट्रेकला जाण्यासाठी आधी तयारी करा...ट्रेकिंगचे शुज [एक्शन्चे ट्रेकिंग शुज चांगले आहेत.] असणे हे फार महत्त्वाचे!... दोर - रोप नेहमी जवळ ठेवा.
- ट्रेकिंगच्या जागेची पुर्ण माहिती मिळवा... त्या जागेचे महत्त्व ... इतिहास जाणा..
- गडांवर मस्तीसाठी जाऊ नका... मोठमोठ्याने ओरडणे.. गाणी लावणे हे टाळा... त्यासाठी स्वत:चे घर किंवा पब्स आहेतच ना!
- आपण बरोबर नेलेला कचरा.. प्लीज.. प्लीज आपल्या बरोबरच खाली आणा!
- गडांवरील बरीचशी ठिकाणं काळाच्या ओघात जीर्ण झाली आहेत... तेंव्हा अशा ठीकाणी खेळ आणि पळापळ करुन उगाचच रिस्क घेऊ नका...!
- ट्रेकिंगच्या ठीकाणी असलेल्या झाडांना - फुलांना जपा...!